एक्स्प्लोर

अहमदनगर, शिर्डी लोकसभेतून कोण उधळणार गुलाल? 14 टेबलवर मतमोजणी होणार!

Lok Sabha Election 2024 : अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 14 टेबलवर मतमोजणी होणार आहे. अहमदनगर आणि शिर्डीतून कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) मंगळवार दि.४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघ (Ahmednagar Lok Sabha Constituency) व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी (Shirdi Lok Sabha Constituency) मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, एमआयडीसी, नागापूर, अहमदनगर येथे सकाळी ८ वाजेपासून सुरू होणार आहे. या मतमोजणीसाठी सुमारे एक हजार पाचशे अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून मतमोजणीसाठी सर्व निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) आणि महाविकास आघाडीकडून निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यात लढत आहे. तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) आणि महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) यांच्या लढत आहे. अहमदनगर आणि शिर्डी लोकसभेतून कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

मतमोजणीसाठी निवडणूक शाखेने सर्व यंत्रणा सज्जता केली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ हे स्वतः सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गोदाम क्र. १ येथे तर शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गोदाम क्र.3 मध्ये होणार आहे.

 एका विधानसभा क्षेत्रासाठी 14 टेबलवर मतमोजणी 

अहमदनगर लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. त्यात  शेवगाव पाथर्डी, राहुरी, पारनेर, अहमदनगर शहर, श्रीगोंदा व कर्जत जामखेड असे सह विधानसभा मतदारसंघ आहेत. तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघात अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपुर व नेवासा असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील मतांची मोजणी करण्यासाठी 14 टेबल लावण्यात आले आहेत.

मतमोजणी फेऱ्या पुढीलप्रमाणे

विधानसभा मतदार संघ निहाय असणाऱ्या व मतदान केंद्रनिहाय होणाऱ्या मतमोजणी फेऱ्या याप्रमाणे असतील. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अकोले 307 मतदान केंद्र 22 फेऱ्या, संगमनेर 278 मतदान केंद्र 20 फेऱ्या, शिर्डी 270 मतदान केंद्र 20 फेऱ्या, कोपरगाव 272 मतदान केंद्र 20 फेऱ्या, श्रीरामपुर 311 मतदान केंद्र 23 फेऱ्या तर  नेवासा 270 मतदान केंद्र 20 फेऱ्या होणार आहेत. 

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील शेवगाव पाथर्डी 365 मतदान केंद्र 27 फेऱ्या, राहुरी 307 मतदान केंद्र 22 फेऱ्या, पारनेर 365 मतदान केंद्र 27 फेऱ्या, अहमदनगर शहर 288 मतदान केंद्र 21 फेऱ्या, श्रीगोंदा 345 मतदान केंद्र 25 फेऱ्या तर कर्जत जामखेड 356 मतदान केंद्र 26 फेऱ्या होणार आहेत.  

अशी आहे सुरक्षा व्यवस्था

मतमोजणीसाठी नियुक्त प्रत्येक कर्मचारी, मतमोजणी प्रतिनिधी, निवडणूक प्रतिनिधी, उमेदवार यांना ओळखपत्र देण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्राची कडक अशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. संपूर्ण मतमोजणी केंद्रावर सीसीटीव्हीद्वारे निगराणी होत आहे. मतमोजणी केंद्रात मोबाईल व पेन घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. 

आणखी वाचा

Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरला स्ट्राँगरुममध्ये घुसखोरीचा प्रयत्न, निलेश लंकेंच्या आरोपावर जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण; म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget