एक्स्प्लोर

Ahmednagar News: मोठी बातमी : मांजरीला वाचवताना 6 जण बायोगॅसच्या 200 फूट खोल खड्ड्यात बुडाले, नगर हादरलं

Ahmednagar news: अहमदनगरमध्ये 200 फूट खोल विहिराचा वापर बायोगॅस प्रकल्पासाठी केला जात होता. या खड्ड्यात एक मांजर पडली होती. तिला वाचवताना सहाजण बायोगॅसच्या खड्ड्यात बुडाले. या सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न.

अहमदनगर: एका मांजरीचा जीव वाचवताना अहमदनगरमध्ये सहा जण बायोगॅसच्या खड्ड्यात बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, नेवासा तालुक्यातील वाकडी परिसरात ही घघटना घडली आहे. याठिकाणी एक मांजर बायोगॅसच्या खड्ड्यात पडली होती. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून एकजण मांजरीला बाहेर काढण्यासाठी बायोगॅसच्या खड्ड्यात (Biogas Pit) उतरला होता. हा खड्डा पूर्णपणे शेणाने भरला होता. मांजरीला वाचवताना हा व्यक्ती खड्ड्यात पडला. ही गोष्ट आजुबाजूच्या लोकांच्या लक्षात येताच ते संबंधित व्यक्तीला वाचवण्यासाठी धावले. मात्र, त्याला वाचवण्याच्या नादात आणखी 5 जण बायोगॅसच्या खड्ड्यात पडले. याठिकाणी असलेल्या 200 फूट खोल विहिरीचे रुपांतर बायोगॅस प्रकल्पात करण्यात आले होते. त्यामुळे या खड्ड्यात बुडालेल्या लोकांना बाहेर काढणे, मोठे आव्हान आहे. या सहा जणांना खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी सध्या प्रयत्न सुरु आहेत. या घटनेबद्दल समजताच पोलीस आणि तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. 

सध्या बायोगॅसच्या खड्ड्यात बुडालेल्या या सहा जणांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. या सहा लोकांच्या प्रकृतीविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हा खड्डा शेणाने भरलेला असल्याने बुडालेल्या लोकांच्या नाकातोंडात शेण गेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. 

बायोगॅस खड्ड्यात बुडालेल्या सहा लोकांची नावे खालीलप्रमाणे 

1. माणिक गोविंद काळे 
2. संदीप माणिक काळे 
3. बबलू अनिल काळे 
4. अनिल बापूराव काळे 
5. बाबासाहेब गायकवाड
6. एक अज्ञात

आणखी वाचा

'या' गावातल्या प्रत्येक घरात मोफत बायोगॅस, वाचा गावाचं कल्याण करणाऱ्या 'गगनदीप'ची गाथा 

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar news: अमरापूर-शहाजापूर परिसरातील सामाजिक चळवळीचा दीपस्तंभ हरपला; माजी उपसरपंच बाबासाहेब शिंदे यांचे निधन
अमरापूर-शहाजापूर परिसरातील सामाजिक चळवळीचा दीपस्तंभ हरपला; माजी उपसरपंच बाबासाहेब शिंदे यांचे निधन
श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन
श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar: 'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget