Video : साप पकडण्याच्या प्रयत्न जीवावर बेतला, सर्पदंशाने 40 वर्षीय सर्पमित्राच्या दुर्दैवी अंत; थरारक व्हिडीओ व्हायरल
Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरातील सावेडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिथे सर्पमित्र समीर इंगळे (Sameer Ingale) यांचा साप पकडण्याच्या प्रयत्नात सर्पदंशाने (Snakebite) दुर्दैवी मृत्यू झालाय.

Ahilyanagar News : अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील सावेडी (Savedi) परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिथे सर्पमित्र समीर इंगळे (Sameer Ingale) यांचा साप पकडण्याच्या प्रयत्नात सर्पदंशाने (Snakebite) दुर्दैवी मृत्यू झालाय. साप पकडताना त्यांच्या हाताला साप चावल्याचा एक थरारक व्हिडीओ व्हायरल झाल्याची माहिती समोर आली आहे. सावेडी भागात साप दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर समीर इंगळे नेहमीप्रमाणेच मदतीसाठी पोहोचले होते. साप पकडण्याचा प्रयत्न करत असताना, सापाने त्यांच्या हाताला दंश केला. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. समीर इंगळे हे शहरात एक परिचित आणि अनुभवी प्राणीमित्र म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या या अनपेक्षित निधनामुळे संपूर्ण परिसरात आणि प्राणीप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
गणपतीपुळे (Ganpatipule) समुद्रात बुडून मुंबईच्या (Mumbai) एका तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर दोघांना वाचवण्यात यश आले आहे. प्रफुल्ल दिनेश त्रिमुखी (Prafulla Dinesh Trimukhi) असे मृत तरुणाचे नाव आहे. समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने हे तरुण समुद्रात खेचले गेले, ज्यामुळे ही दुर्घटना घडली. मुंबईतील पाच तरुण देवदर्शनासाठी आले असता त्यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. स्थानिक वॉटर स्पोर्ट्स (Water Sports) व्यावसायिक आणि जीवरक्षकांनी (Lifeguards) प्रसंगावधान दाखवत तिघांना बाहेर काढले, मात्र त्यातील प्रफुल्लचा दुर्दैवी मृत्यू झाला. भीमराज आगाळे (Bhimraj Agale) आणि विवेक शेलार (Vivek Shelar) या वाचलेल्या दोन तरुणांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पर्यटनस्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
Mumbai Crime : वृद्ध व्यक्तीची सायबर गुन्हेगारांनी केली मोठी फसवणूक; 75.50 लाख रुपये उकळले
मुंबईतील (Mumbai) बीडीडी चाळीत (BDD Chawl) राहणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीची सायबर गुन्हेगारांनी मोठी फसवणूक केली आहे, ज्यात त्यांनी दिल्ली पोलीस (Delhi Police) अधिकारी असल्याचे भासवले. 'तुमच्या खात्याचा मनी लॉन्ड्रिंगमध्ये वापर झाला असून दिल्ली पोलीस तुम्हाला अटक करतील', अशी धमकी देऊन या सायबर चोरांनी त्यांच्याकडून 75.50 लाख रुपये उकळले. पीडित व्यक्तीला 22 ऑगस्ट रोजी एक फोन आला, ज्यामध्ये त्यांच्या बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) खात्याचा वापर 2.83 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात झाल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर, पोलीस गणवेशातील एका व्यक्तीने व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल (WhatsApp Video Call) करून स्वतःचे नाव पोलीस निरीक्षक गोपेश कुमार (Gopesh Kumar) सांगत बनावट कागदपत्रे दाखवली आणि जामीन रक्कम भरण्यास सांगितले. या धमकीमुळे घाबरलेल्या वृद्ध व्यक्तीने आपले 18 लाखांचे म्युच्युअल फंड (Mutual Fund) आणि बोरिवलीमधील (Borivali) घर विकून 75.50 लाख रुपये जमा केले आणि ते पैसे चोरांना दिले.
ही बातमी वाचा:
























