Plastic Ban : 93 प्रतिष्ठानांवर कारवाई; 4.80 लक्ष रुपयांचा दंड वसूल
शहरात प्लास्टिक बंदीचा पार्श्वभूमिवर मनपातर्फे आतापर्यंत 93 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 4.80 लक्ष रुपये दंड वसुल करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून उपद्रव शोध पथकाद्वारे कारवाईचा धडाका सुरु होता.
नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी 13 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 75 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात धंतोली, नेहरुनगर, गांधीबाग, सतरंजीपूरा, आशिनगर आणि मंगलवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली असून 55,000/- रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. प्लास्टिक बंदीचा पार्श्वभूमिवर मनपातर्फे आतापर्यंत 93 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 4.80 लक्ष रुपये दंड वसुल करण्यात आले आहे.
धंतोली झोन अंतर्गत मानेवाडा रोड येथील नवदुर्गा साडी सेंटर आणि जुना बाबुलखेडा येथील पदमावती किराणा स्टोअर्स यांच्याविरूध्द प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसुल केला. नेहरुनगर झोन अंतर्गत ज्ञानेश्वर नगर येथील गजानन डेली निडस यांच्याविरूध्द प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला. गांधीबाग झोन अंतर्गत नंगा पुतला चौक, गांधीबाग येथील बोडे खाद्य भंडार तसेच विकास क्लॉथ शॉप आणि शहिद चौक, इतवारी येथील हुडीया ट्रेडर्स यांच्याविरूध्द प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसुल केला.
सतरंजीपूरा झोन अंतर्गत मस्कासाथ येथील महेन्द्र किराणा ॲण्ड जनरल स्टोअर्स आणि राऊत चौक येथील शैलेन्द्र किराणा ॲण्ड कंपनी यांच्याविरूध्द प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसुल केला. आशिनगर झोन अंतर्गत कमाल चौक येथील राजपुत रेस्टॉरेंट यांच्याविरूध्द प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला. मंगलवारी झोन अंतर्गत मंगलवारी बाजार, सदर येथील साई फ्रुट सेंटर आणि माँ वैशनवी फ्रुट सेंटर यांच्याविरूध्द प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसुल केला.
त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत नॉर्थ अंबाझरी रोड येथील Singh Builders यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरवून ठेवल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसुल केला. तसेच आशिनगर झोन अंतर्गत लष्करीबाग कमाल चौक येथील Aradhana The Fashion Mall यांच्याविरुध्द परवानगीशिवाय विद्यूत खांबावर फलक/ होर्डिंग्ज लावल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड वसुल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
या प्लास्टिक वस्तुंवर बंदी
केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाच्या निर्देशानुसार ३० सप्टेंबर २०२१ पासून ७५ मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. तर ३१ डिसेंबर २०२२ पासून १२० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या सर्व प्रकारचे प्लास्टिक प्रतिबंधीत करण्यात आले आहे. कचरा व नर्सरीसाठी उपयोगात येणा-या पिशव्या वगळता सर्व कम्पोस्टेबल प्लास्टिकसह पकड असलेल्या व नसलेल्या सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या (कॅरी बॅग), डिश बाउल, कंटेनर (डबे) आदींना प्रतिबंधित करण्यात आले आहे. याशिवाय सजावटीसाठीचे प्लास्टिक व पॉलिस्टीरिन (थर्माकोल), प्लास्टिकचे आवरण असलेले मिठाईचे बॉक्स, निमंत्रण पत्रिका, सिगारेटची पॉकिटे यावर सुद्धा बंदी असेल. यासोबतच प्लास्टिकच्या कांड्यासह कानकोरणी, फुग्यांना लावण्यात येणा-या प्लास्टिक कांड्या, प्लास्टिकचे झेंडे, आईसक्रीम कांड्या, प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी – जसे : काटे चम्मच, चाकू, स्ट्रॉ, ट्रे इ. आणि १०० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर हे सर्व प्रतिबंधित करण्यात आले आहे.
Before You Go
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा






















