एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जून 2020 | शुक्रवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जून 2020 | शुक्रवार
- भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेही सहभागी https://bit.ly/30XkxfD
- मुंबईतील मोनोरेलसाठीचं चिनी कंपन्यांना दिलेलं कंत्राट MMRDA कडून रद्द, BHEL आणि BEML या भारतीय कंपन्यांना कंत्राट देण्याबाबत चर्चा सुरू https://bit.ly/2NeumOd
- आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनचा पाय आणखी खोलात, चीनसोबत व्यापारिक संबंध तोडण्याचा अमेरिकेचा इशारा https://bit.ly/2CnUV1q
- चीनच्या तावडीतून भारताच्या 10 जवानांची सुटका! सरकारचं मात्र घटनेवर मौन https://bit.ly/3fR0Zy3 तर कोणताही भारतीय सैनिक ताब्यात नसल्याचे चीनकडून स्पष्ट, भारतानंतर चीनकडूनही 'त्या' बातमीचं खंडन https://bit.ly/3eg5i5j
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 13 ते 15 जुलै 2019 दरम्यान घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर https://bit.ly/3fG89Fe
- बीए,बी.कॉम, बीएससीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची घोषणा, प्रोफेशनल कोर्सच्या परीक्षा घेण्याची तयारी https://bit.ly/2AUaE7Q
- कोरोनासाठी 'मुंबई मेगा लॅब'ची संकल्पना https://bit.ly/3hIaYav एक ते दीड महिन्यात सर्व मुंबईकरांची चाचणी करण्याचे आव्हान https://bit.ly/3da5bag
- शिवसेनेसोबत झालेल्या राजकारणाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून वर्धापनदिनानिमित्त समाचार, शिवसेना पक्षप्रमुख लाचार होणार नसल्याचा पुनरुच्चार https://bit.ly/3hJ4VCB
- मुंबईमधील सर्व शाळांच्या शिक्षकांना 30 जूनपर्यंत वर्क फ्रॉम होम, पालिका शिक्षणाधिकाऱ्यांची सूचना, 833 कंटेन्मेंट झोनमुळं शाळा सुरू होणं शक्य नाही https://bit.ly/2Nbv8LV
- पुण्याच्या कोथरुडमध्ये चार महिन्याच्या सोडून दिलेल्या चिमुकलीची आई सापडली, मानसिक तणावातून कृत्य केल्याची माहिती https://bit.ly/2NdY7yU
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
व्यापार-उद्योग
क्रीडा
Advertisement