एक्स्प्लोर
राष्ट्रीय कृषी विमा योजनेतून शेतकऱ्यांना 893 कोटी रुपयांची नुकसान भरपाई

प्रातिनिधिक फोटो
मुंबई : रब्बी हंगाम 2015-16 मधील 8 अधिसूचित पिकांकरिता राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत राज्यातील 26 लाख 88 हजार शेतकऱ्यांना 893 कोटी 83 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. लातूर विभागात सर्वाधिक सुमारे 13 लाख शेतकऱ्यांना 402 कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप करण्यात येणार आहे. बँकांकडून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. रब्बी हंगाम 2015-16 मध्ये अधिसूचित करण्यात आलेली 8 पिकं :
- हरभरा
- ज्वारी (बागायत व जिरायत)
- करडई
- सुर्यफुल
- गहु (बागायत व जिरायत)
- कांदा
- उन्हाळी भुईमुग
- उन्हाळी भात
- नाशिक विभाग - 32 लाख 22 हजार 923
- पुणे विभाग – 107 कोटी 36 लाख 32 हजार 918
- कोल्हापूर विभाग – 10 कोटी 28 लाख 53 हजार 542
- औरंगाबाद विभाग – 340 कोटी 57 लाख 5 हजार 480
- लातूर विभाग – 402 कोटी 84 लाख 87 हजार153
- अमरावती विभाग – 31 कोटी 76 लाख 84 हजार 537
- नागपूर विभाग – 66 लाख 76 हजार 627
आणखी वाचा























