एक्स्प्लोर

शिक्षण दहावी, शेतीतून उत्पन्न IAS अधिकाऱ्यापेक्षा जास्त !

कोल्हापूर : सध्या मिरचीच्या दरानं ग्राहकाला जरी ठसका लागत असला, तरी याच तिखट मिरचीनं कोल्हापूरच्या सचिन पाटोळे या शेतकऱ्याच्या जीवनात मात्र गोडवा आणला आहे. यंदा त्यांना या मिरचीतून रेकॉर्डतोड उत्पन्न मिळालं आहे.  त्यांनी मिरची शेतीतून तब्बल 20 लाखाचं उत्पन्न मिळवलं आहे.   कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील शेतकरी सचिन पाटोळे  हे मिरचीची शेती करतात. दहावी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर सचिन यांनी वडिलोपार्जित शेतीत लक्ष घालायला सुरुवात केली.  १० एकरापैकी ८ एकरात ऊसाचं  पीक घेतलं जात होतं. त्यांनी ऊसाला फाटा देत भाजीपाला पिकाकडं वळण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही वर्षापासून सचिन या जमिनीत आलटून पालटून टोमॅटो, वांगी, मिरची, फ्लॉवर, कोबी अशी पिकं घेत आहेत. यंदाही त्यांनी इथल्या ७० गुंठे जमिनीत मिरचीची लागवड केली आहे. शिक्षण दहावी, शेतीतून उत्पन्न IAS अधिकाऱ्यापेक्षा जास्त ! गेल्या डिसेंबर महिन्यात सचिन यांनी या जमिनीत मेढ्याचे कळप बसवले. आणि त्यानंतर जमीन चांगली नांगरुन घेतली. रोटाव्हेटरच्या मदतीनं साडे चार फुटांच्या सरी पाडल्या. रासायनिक खतांच्या बेसल डोस दिला. त्यावर ठिबकच्या लॅटरल आणि ३० मायक्रॉनचा मल्चिंग पेपर अंथरला. फेब्रुवारी महिन्यात ३५ गुंठ्यात व्हीएनआर ३३२ आणि ३५ गुंठ्यात व्हीएनआर १०९ या जातीच्या मिरचीच्या रोपांची लागवड केली. ७० गुंठ्यासाठी त्यांनी मिरचीची १५ हजार ५०० रोपं लागली.   लागवडीनंतर किडनाशक आणि बुरशीनाशकांच्या फवारण्य़ा घेतल्या. दर २१ दिवसांनी ठिबकमधून विद्राव्य खतं दिली. रोपं ३० दिवसांची झाली असतांना त्यांना तारकाठीच्या मदतीनं आधार दिली. लागवडीनंतर ३०व्या दिवशी फुलकळी दिसू लागली तर ४५ व्या दिवशी मिरची तोडणीस तयार झाली. शिक्षण दहावी, शेतीतून उत्पन्न IAS अधिकाऱ्यापेक्षा जास्त ! *आतापर्यंत या ७० गुंठ्यातून ३५ टन मिरचीचं उत्पादन मिळालं आहे   * सचिन ही मिरची जयसिंगपूर, कुरुंदवाड आणि सांगलीच्या बाजारात ५० ते ७५ रुपये किलोप्रमाणे विक्री करतात   *यातून त्यांना अंदाजे १७ लाख ५० हजार रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे.   *यातून रोपं, ठिबक, खतं, किडनाशकं, मजुरी, वाहतूक असा साडे चार लाखांचा खर्च वजा जाता त्यांना १३ लाखांचा निव्वळ नफा झाला आहे.   *अजून या प्लॉटमधून २० टन मिरचीच्या उत्पादनाची अपेक्षा असून यातून खर्च वजा जाता ७ लाखांचं उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे.   *म्हणजेच या ७० गुंठ्याच्या प्लॉटमधून यंदा त्यांना २० लाखांचं निव्वळ उत्पन्न मिळेल शिक्षण दहावी, शेतीतून उत्पन्न IAS अधिकाऱ्यापेक्षा जास्त ! आपल्याकडील पोषक वातावरण आणि बाजाराची मागणी ओळखून सचिन यांनी ऊसाला भाजीपाल्याचा पर्याय दिला, पाण्याच्या बचतीसाठी ठिबकचा वापर केला. ज्यामुळं त्यांना कमी कालावधीत अपेक्षित नफा मिळाला आहे. व्हिडीओ चंद्रशेखर खोले, एबीपी माझा, कोल्हापूर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Parmar : आठ दिवसांपूर्वी ईडीची छापेमारी, उद्योजकाचा पत्नीसह शेवट; चिट्टीत उल्लेख, ईडी अधिकारी म्हणाला, भाजपमध्ये असता, तर केसच झाली नसती!
आठ दिवसांपूर्वी ईडीची छापेमारी, उद्योजकाचा पत्नीसह शेवट; चिट्टीत उल्लेख, ईडी अधिकारी म्हणाला, भाजपमध्ये असता, तर केसच झाली नसती!
Uddhav Thackeray : ठाकरेंकडून हिंदुत्वाचा मुद्दा दाखवण्याचा प्रयत्न, शिंदे गटाच्या नेत्याचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना लाथ मारली...
ठाकरेंकडून हिंदुत्वाचा मुद्दा दाखवण्याचा प्रयत्न, शिंदे गटाच्या नेत्याचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना लाथ मारली...
इलेक्ट्रीक पोलला धडकली बस, 28 प्रवासी जखमी; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
इलेक्ट्रीक पोलला धडकली बस, 28 प्रवासी जखमी; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
Virat Kohli : तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Allu Arjun get 14 Days Judicial Custody : अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीABP Majha Headlines : 04 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : 13 December 2024 : सुपरफास्ट बातम्या : ABP MajhaPriyanka Gandhi Lok Sabha Speech : प्रियांका गांधींचं लोकसभेतील पहिलं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Parmar : आठ दिवसांपूर्वी ईडीची छापेमारी, उद्योजकाचा पत्नीसह शेवट; चिट्टीत उल्लेख, ईडी अधिकारी म्हणाला, भाजपमध्ये असता, तर केसच झाली नसती!
आठ दिवसांपूर्वी ईडीची छापेमारी, उद्योजकाचा पत्नीसह शेवट; चिट्टीत उल्लेख, ईडी अधिकारी म्हणाला, भाजपमध्ये असता, तर केसच झाली नसती!
Uddhav Thackeray : ठाकरेंकडून हिंदुत्वाचा मुद्दा दाखवण्याचा प्रयत्न, शिंदे गटाच्या नेत्याचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना लाथ मारली...
ठाकरेंकडून हिंदुत्वाचा मुद्दा दाखवण्याचा प्रयत्न, शिंदे गटाच्या नेत्याचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना लाथ मारली...
इलेक्ट्रीक पोलला धडकली बस, 28 प्रवासी जखमी; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
इलेक्ट्रीक पोलला धडकली बस, 28 प्रवासी जखमी; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
Virat Kohli : तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
Navneet Rana : जनाब उद्धव ठाकरे, मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा घणाघात
जनाब उद्धव ठाकरे, मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा घणाघात
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तार आता मुंबईऐवजी नागपुरात; समोर आलं राज'कारण'
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तार आता मुंबईऐवजी नागपुरात; समोर आलं राज'कारण'
... अखेर तो आरोपी डॉ. बाबासाहेबांच्या फोटोसमोर नतमस्तक; रुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल
... अखेर तो आरोपी डॉ. बाबासाहेबांच्या फोटोसमोर नतमस्तक; रुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल
Priyanka Gandhi : नेहरूंनी काय केले? अहो, वर्तमानाबद्दल बोला, सर्व जबाबदारी नेहरूजींची आहे का? प्रियांका गांधींचा पहिल्याच भाषणात रद्रावतार!
नेहरूंनी काय केले? अहो, वर्तमानाबद्दल बोला, सर्व जबाबदारी नेहरूजींची आहे का? प्रियांका गांधींचा पहिल्याच भाषणात रुद्रावतार!
Embed widget