एक्स्प्लोर
दीपिका पादुकोणचा फोटो पाहून रणवीर म्हणाला, 'मार दो मुझे'
दीपिका पादूकोणने काही दिवसांपूर्वी आपला फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. जो तिच्या अनेक फॅन्सला फार आवडला. पण दीपिकाच्या फोटोवर कमेंट करणाऱ्या सर्व फॅन्समध्ये एका खास फॅनचाही समावेश होता. तो म्हणजे, रणवीर सिंह.
मुंबई : बॉलिवूडचं सर्वात हॉट कपल म्हणजे, रणवीर सिंह आणि दीपिका पादूकोण. एवढंच नाहीतर सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटींच्या यादीतही दीपिका आणि रणवीर दोघांचाही समावेश होतो. दोघांचेही चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतात. याव्यतिरिक्त दोघेही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावरही त्यांचे फॅनफॉलोअर्सही खूप आहेत. अशातच दीपिका पादूकोणने काही दिवसांपूर्वी आपला फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. जो तिच्या अनेक फॅन्सला फार आवडला. पण दीपिकाच्या फोटोवर कमेंट करणाऱ्या सर्व फॅन्समध्ये एका खास फॅनचाही समावेश होता. तो म्हणजे, रणवीर सिंह.
दीपिकाने नुकताच तिचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यावर तिच्या अनेक फॅन्सच्या लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडला आहे. त्यावर रणवीर सिंहनेही एक कमेटं केली आहे. दीपिकाने शॉर्ट हेअर लूकमधील आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. फोटो शेअर करताना दीपिकाने 'ताडा' असं कॅप्शन दिलं होतं. याच फोटोला रणवीरने 'मार दो मुझे' अशी कमेंट केली आहे.
रणवीर सिंह व्यतिरिक्त इतरही सेलिब्रिटींनी दीपिकाच्या फोटोवर कमेंट केली आहे. यामध्ये आलिया भट्ट आणि आयुषमान खुराना यांचा समावेश आहे. आलियाला दीपिकाची नवी हेअर स्टाइल फार आवडली. तिने 'ओएमजी! ब्युटी!!!' अशी कमेंट केली आहे तर आयुषमानने हार्ट असलेला इमोजी पोस्ट केला आहे. एवढचं नाहीतर दिग्दर्शक फराह खाननेही दीपिकाच्या फोटोवर कमेंट केली आहे.View this post on Instagram
दरम्यान, दीपिकाचा मचअवेटेड चित्रपट 'छपाक'चं शुटिंग पूर्ण झालं आहे. मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होईल. या चित्रपटात दीपिकासोबत विक्रांत मेसी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement