एक्स्प्लोर
Advertisement
रणवीर आणि आलियाचा 'गली बॉय' ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीतून बाहेर!
21 सप्टेंबर रोजी झोया अख्तर दिग्दर्शित 'गली बॉय'ची ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून अधिकृत निवड करण्यात आली होती. समीक्षक आणि प्रेक्षकांनी चित्रपटाचं भरभरुन कौतुक केलं होतं. त्यामुळे 'गली बॉय'कडून भरपूर अपेक्षा होत्या.
मुंबई : रणवीर सिंह आणि आलिया भट यांची प्रमुख भूमिका असलेला 'गली बॉय' चित्रपट ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅण्ड सायन्सकडून परदेशी विभागात शेवटच्या दहा चित्रपटांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. या अंतिम दहा चित्रपटांच्या यादीत 'गली बॉय'चा समावेश नाही. ऑस्करच्या 92 व्या अकॅडमी अवॉर्डससाठी भारताकडून अधिकृतरित्या 'गली बॉय'ची निवड करण्यात आली होती.
द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅण्ड सायन्सने नऊ विभागातील 92व्या अकॅडमी पुरस्कारांची यादी जाहीर केली. यामध्ये डॉक्युमेंटरी फीचर, डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट, इंटरनॅशनल फीचर फिल्म, मेकअप अॅण्ड हेअर स्टायलिंग, म्युझिक (ओरिजनल स्कोअर), म्युझिक (ओरिजनल सॉन्ग), अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म, लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म आणि व्हिज्युअल इफेक्ट्स या विभागांचा समावेश आहे. मात्र 'गली बॉय' यापैकी कोणत्याही विभागाच्या यादीत नाही.
21 सप्टेंबर रोजी झोया अख्तर दिग्दर्शित 'गली बॉय'ची ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून अधिकृत निवड करण्यात आली होती. समीक्षक आणि प्रेक्षकांनी चित्रपटाचं भरभरुन कौतुक केलं होतं. त्यामुळे गली बॉयकडून भरपूर अपेक्षा होत्या. परंतु परदेशी चित्रपट विभागाच्या यादीत 'गली बॉय'चा समावेश न झाल्याने भारतीय प्रेक्षकांची निराशा झाली आहे. या विभागात झेक रिपब्लिकचा द पेंटेड बर्ड, इस्टोनियाचा ट्रूथ अॅण्ड जस्टिस, फ्रान्सचा लेस मिजरेबल्स, हंगेरीचा दोज हू रिमेन्ड, नॉर्थ मॅसेडोनियाचा हनीलॅण्ड, पोलंडचा कोर्पस क्रिस्टी, रशियाचा बीनपोल, सेनेगलचा अटलांटिक्स, दक्षिण कोरियाचा पॅरासाईट या चित्रपटांचा समावेश आहे. 'गली बॉय' चित्रपटाची कहाणी एका रॅपरची आहे, जो स्वत:ला आंतरराष्ट्रीय स्तरावर परफॉर्म करताना पाहू इच्छितो. या चित्रपटात रणवीर सिंहने मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या मुराद नावाच्या एका तरुणाची भूमिका साकारली आहे. वैयक्तिक आयुष्यात सुरु असलेल्या चढउतारातून बाहेर पडत तो कशाप्रकारे स्वत:ला यशस्वी रॅपरमधून प्रस्थापित करतो, याची कहाणी म्हणजे 'गली बॉय'.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement