दाक्षिणात्य चित्रपटाच्या इतिहासात कबालीने सर्वात जलद 200 कोटी कमावण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. कबालीने हा टप्पा तीनच दिवसात पूर्ण केला होता. बाहुबलीला 213 कोटींचा टप्पा पूर्ण करण्यासाठी पाच दिवस लागले होते.
2/6
कबालीने दक्षिण भारतात सर्वात जलदगतीने 100 कोटींचा टप्पा गाठला. बाहुबली या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर दोनच दिवसात वल्डवाईड कलेक्शनमध्ये 135 कोटींची कमाई केली होती, तर कबालीने तब्बल 150 कोटींची कमाई करून नवा विक्रम प्रस्थापित केला.
3/6
कबालीने बाहुबलीचा अमेरिकेत सर्वात जलदगतीने 1 मिलियन डॉलर्सची कमाई करण्याचा विक्रम मोडीत काढला आहे.
4/6
रजनीकांतचा सुपरहिट चित्रपट कबालीने प्रदर्शनानंतरचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. यातील जवळपास सर्वच विक्रम कबालीच्या पूर्वी प्रदर्शित झालेल्या बाहुबली या चित्रपटाचे होते.
5/6
अमेरिका, नॉर्वे, यूएई, मलेशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये कबालीने अव्वल स्थान कायम राखले आहे. कबालीने रजनीकांतच्या पूर्वीच्याच सर्व चित्रपटांसोबत बाहुबलीचे विक्रम मोडीत काढले.
6/6
आंतरराष्ट्रीय बाजारातही कबालीची जादू पाहायला मिळाली. चित्रपटाने ओव्हर्सिज कलेक्शन मार्फत 259 कोटी कमावले. तर बाहुबलीने फक्त 75 कोटी कमाई केली होती.