एक्स्प्लोर
दीपिका पादुकोण वाढदिवस स्पेशल - दीपवीरची लव्ह स्टोरी
1/11

रणवीरला 2013 मध्ये डेंगू झाला होता. ज्यामुळे त्याला दोन आठवडे रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यानंतर त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 'मला डेंगू नाही तर लव्हेरिया झाला आहे'. त्यावेळी तो दीपिकाच्या प्रेमात अखंड बुडाला होता.
2/11

एबीपी माझाकडून दीपिका पादुकोणला वाढदिवसाच्या शुभेच्छा
3/11

मागील वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात दीपिका आणि रणवीर विवाहबंधनात अडकले.
4/11

रणवीर नेहमी दीपिकासोबतच्या आपल्या प्रेमाबद्दल जाहीररित्या सांगत होता.
5/11

संजय लीला भंसालीचा चित्रपट 'बाजीराव मस्तानी' मधून पुन्हा ही जोडी दिसली. पुन्हा एकदा प्रेक्षकांनी या जोडीला डोक्यावर घेतलं. तसेच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चालला.
6/11

अखेर 2015 मध्ये आयफा अवार्डच्या कार्यक्रमामध्ये रणवीरने मंचावर जाहीरपणे आपल्या प्रेमाची कबुली दिली.
7/11

रणवीरसोबतच्या प्रेमाबद्दल जेव्हा दीपिकाला विचारलं तर तिने आपल्या प्रेम संबंधाची कबूली दिली नाही. मात्र रणवीरची प्रशंसा करायला ती विसरली नाही.
8/11

रामलीला हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला आणि या दीपवीरची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. या चित्रपटाने रणवीरला स्टार बणवलं. त्यासोबतच दिपवीरची जोडीही एकमेकांच्या प्रेमात गुंतली होती. मात्र दोघांनी आपल्या नात्याबद्दल जाहीरपणे सांगितलं नव्हतं.
9/11

दिग्दर्शक संजय लीला भंसाली यांच्या रामलीला या चित्रपटातून पहिल्यांदा ही जोडी मोठ्या स्क्रिनवर दिसली. या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान या दोघांमध्ये डेटिंग सुरु झाली होती.
10/11

दीपिका आणि रणवीरची भेट पहिल्यांदा 2011 मध्ये झाली होती. रणवीर त्याच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबियांसोबत एका रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेला होता. तिथे दीपिकाला त्याने पहिल्यांदा पाहिलं होतं.
11/11

अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचा आज 33 वा वाढदिवस आहे. अभिनेता रणवीर सिंहसोबतच्या लग्नानंतर तिचा हा पहिलाच वाढदिवस आहे.
Published at : 05 Jan 2019 07:04 PM (IST)
View More























