![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Good Luck Jerry Review : जिगरबाज जान्हवीचा 'गुड लक जेरी'
Good Luck Jerry Review : 'गुड लक जेरी' या सिनेमात जेरी नावाच्या मुलीच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या दाखवण्यात आल्या आहेत.
![Review by Manjiri Pokharkar on Janhvi Kapoor Good Luck Jerry Movie Good Luck Jerry Review : जिगरबाज जान्हवीचा 'गुड लक जेरी'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/30/f540b0e4a3e2b1b0e7d01c26dcf7756f1659180333_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिद्धार्थ सेन
जान्हवी कपूर, दीपक डोबरियाल, सुशांत सिंह, नीरज सूद
Good Luck Jerry Review : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा (Janhvi kapoor) 'गुड लक जेरी' (Good Luck Jerry) हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे. या सिनेमात जान्हवीनं जेरी हे पात्र साकारलं आहे. सिद्धार्थ सेन यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
'गुड लक जेरी' या सिनेमात जेरी नावाच्या मुलीच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या दाखवण्यात आल्या आहेत. या समस्यांचा जेरी कसा सामना करते? या प्रश्नाचे उत्तर 'गुड लक जेरी' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मिळते. एका मुलीचा संघर्ष या सिनेमात दाखवण्यात आला आहे. त्यामुळेच या सिनेमाचे नाव 'गुड लक जेरी' असे ठेवण्यात आले आहे.
जेरीला कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जेरीच्या आईला फुफ्फुसाचा कर्करोग झालेला असतो. त्यामुळे जेरी कुटुंबाची जबाबदारी उचलते. जेरी ड्रग्ज पेडलर म्हणून काम करायला सुरुवात करते. ड्रग्ज पेडलर म्हणून काम करताना जेरीच्या आयुष्यात अनेक अडचणी येतात. पण जेरी या सर्व अडचणींवर मात करते.
'गुड लक जेरी' या सिनेमाचे कथानक हलके-फुलके आहे. पण या सिनेमात गरज नसताना काही पात्रांची भर पडलेली आहे. सिनेमा पाहताना हे ठळकपणे जाणवते. सिनेमात अगदी सहजपणे जेरी ड्रग्ज पेडलरचे काम करत असल्याचे दाखवले आहे. यासाठी दिग्दर्शकाचं कौतुक. दीपक डोबरियालचे विनोद प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करतात.
'गुड लक जेरी' सिनेमात साधेपणावर भर देण्यात आला आहे. विकेंड चांगला घालवण्यासाठी प्रेक्षक एका चांगल्या सिनेमाची प्रतीक्षा करत असतील तर 'गुड लक जेरी' हा चांगला ऑप्शन आहे. सिनेमात जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहे. जान्हवीसह दीपक डोबरियाल, सुशांत सिंह, नीरज सूद, सौरभ सचदेवा, जसवंत सिंह दलाल या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.
जान्हवीने जीगरबाज तरुणीची भूमिका साकारली आहे. पंकज मेहता यांनी 'गुड लक जेरी' या सिनेमाचं लेखन केलं आहे. या सिनेमात कल्पनेच्या पलीकडच्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा सिनेमा काही मंडळींना खटकतो. सिद्धार्थ सेन दिग्दर्शित 'गुड लक जेरी' या सिनेमाची निर्मिती आनंद एल रायच्या येलो प्रोडक्शन, लायका प्रोडक्शन आणि महावीर जैन यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)