Pushpa 2 The Rule Movie Review : तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच
पहिला पुष्पा फारच आवडला, त्याचा रुबाब, टशन आणि त्याच्या 'श्रीवल्लीची झलक अशरफी!'
इथून तिथून सारेच फॅन्स झाले... दाढीवरून हात फिरवू लागले, पाय घासत नाचू लागले!
तिथंच पुष्पा ब्रॅण्ड झाला आणि अल्लू अर्जुन घराघरात पोहोचला!
कसा आहे Pushpa 2 The Rule?
जिथे सिनेमाच्या पहिला भाग संपतो तिथूनच दुसऱ्या भागाला सुरुवात होते!
तो आता रक्तचंदनचोर सिंडिकेट चालवतोय, नॅशनल नाही तर इंटरनॅशनल
डॉन झालाय! ज्याला पैश्याची फिकीर ना ताकदीची भीती! त्यात पुष्पाचं लग्न झालंय,
श्रीवल्ली सोबत फीलिंग्स जास्तच फायर झाल्यात, पुष्पा दरमजल करत
भल्या भाल्यांची वाट लावताना, मोठमोठी आव्हानं अंगावर घेत पुष्पा पुढे जाताना मात्र
शेखावत मध्ये अडकून पडलेला दिसतोय!
एकंदरीत दिग्दर्शक सुकुमारला (Sukumar) गवसलेली सिनेमाची एक लाईन म्हणजे 'फिलिंग' आहे!
मग ती पुष्पाची असो किंवा शेखावत, श्रीवल्ली, पुष्पाचा सावत्र भाऊ आणि त्यांचा फॅमिली फंडा,
बायको श्रीवल्लीच्या इच्छेखातर CM बदलणारा पुष्पा PM पर्यंत येऊन थांबतो!
दाक्षिणात्य सिनेमांचं कौतुक करावं तेव्हढं कमी असत कारण नात्यागोत्यात असा प्लॉट गुंतून सोडतात की
साडेतीन-चार तास सिनेमे बघताना दोन तीन कथानक एकत्र करतात ज्यात
सिनेमा कुठवर चांगला होता आणि कुठे रटाळ वाटला हे ठरवणं कोणालाही जमणार नाही!
काय नाही आवडलं?
पुष्पाचा जास्तच उंच झालेला खांदा, अतिशयोक्ती साहस दृश्य, कॉमेडी, स्क्रिनप्ले मध्ये घुसवलेली गाणी,
वायरफ्रेम वर्क, चंदनतस्करीचे सिक्वेन्स. कथानकांची गुंफण सपशेल फसली आहे. मधेच संथ होतो तर
मधेच घाईघाईत उरकला आहे. पुष्पाचे रुल्स खरंच दमदार होते का यावर शंका येते!
कांतारा पाहिल्यावर पुष्पाच्या अंगात देवी आल्यानंतरचा रौद्रावतार सौम्य वाटला!
आणि शेवटचा टिपिकल फॅमिली Climax!
काय आवडलं?
अल्लू-फहाद फासिलचा तगडा अभिनय, कलरपॅलेट, संवाद-डायलॉग्स, पार्श्वसंगीत (BGM)
सिनेमेटोग्राफी, एडिटिंग, हत्तीचं आणि चॉपरचं CGI VFX, वेशभूषा कॉस्टयूम
काय मिसिंग?
दर्जेदार गाणी, खरंतर पहिल्या भागातील गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठावर आहेत! आणि भाग दोन मध्ये एकही गाणं ओठी रेंगाळेल असं वाटत नाही!
श्रीवल्ली म्हणजेच रश्मीका सॊबतची अल्लुची केमेस्ट्री, पुष्पा स्वतःच्याच धुंदीत असल्याचं दिसलं! पुष्पा आणि त्याच्या फॅमिलीचा विषय ज्याप्रकारे
पहिल्या भागात होता तो दुसऱ्या भागात भावला नाही!
काय काय पाहण्यासारखं आहे?
रोमांचित करणारे डायलॉग्स, पुष्पाचा स्वॅग, सुकुमारचे दिग्दर्शन, मारामारी,
पुष्पाच्या अंगात देवी आल्यावरच्या सिक्वेन्सची सिनेमॅटोग्राफी!
पैसा वसूल की पश्चाताप...?
सिनेमा पैसावसूल नक्कीच आहे, ज्यांनी पहिला भाग पाहिला नाही त्यांनाही थेट दुसरा भाग आवडेल!
सिनेमा तुम्हाला जागेवर धरून ठेवतो. मात्र साऊथ स्टाईल भावनिक कौटुंबिक गोष्टी नकोश्या वाटतात.
दिग्दर्शकाला जर प्रेक्षकांची नस ओळखता आली असती तर, आज पुष्पा २ वेगळा बांधला गेला असता.
मात्र ते झालं नाही! एक सिनेरसिक या नाते माझ्या अपेक्षांचा भंग मात्र या सिनेमाने केलाय!
पुष्पा ३ मध्ये इंटरनॅशनल लॉजिकल तस्करी पाहायला आवडेल!
किती स्टार?
पुष्पा बक्कळ कमाई करतोय. सध्या सिनेमाला सुगीचे दिवस नक्की आहेत! कारण दुसरा पर्याय कोणताही नाहीये!
बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा'ची दहशत असली तरी एक परफेक्ट पॅकेज सिनेमा म्हणून मी या सिनेमाकडे पाहत नाही!
Pushpa 2 : The Rule या सिनेमाला मी देतोय अडीच स्टार!
विनीत वैद्य यांचे अन्य Movie Reviews!
कसा आहे महाराजा?
'कल्की 2898 एडी'
कसा आहे आवेशम..?
'मुंज्या' ब्रह्मराक्षसाची हॉरर कहाणी!
मनुष्यप्राणी की भक्षक; वाचा रिव्ह्यू!
कसा आहे थ्री ऑफ अस?