Bhakshak Movie review :  दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणं, दुःखी होणं आपण विसरलो आहोत का? आजही आपण आपली गणना मनुष्यप्राण्यात करतो आहोत? की भक्षक झालो आहोत? 'भक्षक' (Bhakshak) सिनेमाची नायिका वैशाली सिंग एक पत्रकार आहे, ती सिनेमाच्या अगदी शेवटी  हे प्रश्न प्रेक्षकांना विचारते, आपल्या जीवनात एवढ्या बऱ्याच महत्वाच्या गोष्टी आहेत-असतात. आपण दैनंदिन आयुष्यात वृत्तपत्र, चॅनेल्स च्या माध्यमातून अनेक  गोष्टींचा आढावा घेत असतो, आपल्याला आजूबाजूला असलेल्या कित्येक घडामोडी, राजकीय मसाला बातम्यांच्या पलीकडे सुद्धा घडणाऱ्या अन्यायाच्या, अत्याचाराच्या, लहान मुली, आया-बहिणींवर महिलांवर होणाऱ्या क्रूर अत्याचाराच्या घटनांकडे बातम्याकडे लक्ष देयला वेळच कुठेय आपल्याकडे?


त्या त्या वेळी, सोशल मीडियावर पॉट टाकून राग व्यक्त करतो, मात्र त्या घटनेच्या दोषींच्या कठोर शिक्षेसाठी, न्यायाचा लढा देण्यासाठी किंवा आपलं आयुष्य चांगलं सुरू आहे, आपल्या घरात काही घटना घडलेली नाहीये म्हणून शांत बसणाऱ्या मंडळीचा खरपूस समाचार 
या सिनेमातून दिग्दर्शक पुलकित याने घेतला आहे.  


अगदी काही महिन्यांपूर्वी 'अजमेर 92' हा अश्याच धाटणीचा सिनेमा आलेला ज्यात जगातील मोठया अत्याचारा मध्ये मोजल्या घटनेवर हा सिनेमा होता. जो आज कोणालाही माहीतच नाहीये. जवळपास अडीचशे अत्याचार झाले असल्याचं म्हणलं आहे, एवढंच काय तर 5-6 वर्षांपूर्वी समोर आलेल्या मुजफ्फरपुर च्या बालिका आश्रमातील लहान लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या सत्य घटनेवर आधारित असा हा शाहरुख खान च्या रेड चिलीज प्रॉडक्शन मध्ये  नेटफ्लिक्स वरती गेल्या आठवड्यात भक्षक हा नवा सिनेमा आला आहे. 


'भक्षक' पाहताना हे मात्र नक्की जाणवलं, अश्या धाटणीचे सिनेमे येतात, नंतर ते गायब होतात, कित्येक घटना घडतात त्यातले आरोपी मोकाट सुटतात... मात्र पूर्वीपेक्षा आज उत्तर प्रदेश, बिहार मधील परिस्थिती अजूनही म्हणावी अशी बदलली नाहीये,  तिथे हजारो बाहुबली नराधमांचा खात्मा झालाय, बऱ्याच गुन्हेगारांच्या विरोधात बोलायला कोणी समोर येत  नसल्याचं चित्र दिसतं.  


मुजफ्फरपुर मध्ये घडलेल्या सत्य घटनेवर आधारित 'भक्षक' सिनेमा तसा या आठवड्यात टॉप लिस्ट वरती नक्कीच आहे मात्र,
दोन तासाचा हा सिनेमा सुरुवातीला प्रेक्षकांना घट्ट पकडून राहतो मात्र नंतर हीच पकड सुटत जाताना दिसते. 


सिनेमातील नायिका वैशालीच्या महत्वाच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलायचं झालं तर, पत्रकार 'वैशाली' गंभीर प्रश्नांना साद घालणारं, लग्न करून स्वतःचं पत्रकारितेतील पॅशन पूर्ण झाल्याशिवाय मुल जन्माला न घालण्याचा विचार करणारं पात्र आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) ने उभं केलं आहे. भूमीचा नुकताच Thank you for coming सिनेमा आलेला, ज्यातली तिची भूमिका बोल्ड होती. शिवाय गंभीर आशयाच्या सिनेमाचं गांभीर्य वेगळं आसताना 'भक्षक; मधली भूमी गोंधळून गेल्याचं, अस्वस्थ असल्याचं जाणवलं.   


सिनेमामध्ये जेवढी भूमी ची व्यक्तिरेखा महत्वाची होती तशीच सिनेमाच्या खलनायकाची होती तो म्हणजे CID फेम आदित्य श्रीवास्तव  (Aditya Srivastava) यांनी त्याला उत्तम न्याय दिलाय, अगदी शोभणारा व्हिलन म्हणावं लागेल. आदित्य ने उत्तम तगडा खलनायक उभा केलाय आणि त्यापुढं वैशाली फिकी पडल्याचं जाणवलं.  


हा सिनेमा आहे की डॉक्यु फिल्म हे पाहताना लक्षात येत नाही, काही ठिकाणी फारच संथ, काही ठिकाणी गती जाणवली. 
सिनेमाचा प्लॉट जसजसा पुढं सरकत जातो त्यात आजून एक ओळखीचा मराठी चेहरा समोर येतो, एक उल्लेखनीय व्यक्तिरेखा जीचा उल्लेख या रिव्ह्यू मध्ये हवाच. 'सई ताम्हणकर' (Sai Tamhankar) सईचा अभिनय बघून त्या कथेचं गांभीर्य अजूनच दूर गेल्याचं जाणवलं.  SSP. जस्मित कौर एका अधिकाऱ्याची भूमिका साकारताना त्यात दम नसल्याचं जाणवलं. 


भक्षक सिनेमा वेल मेड आहे, सिनेमाचा प्लॉट महत्वाच्या मुद्द्याची गोष्टींला अधोरेखित करताना समाज आणि शासन व्यवस्थेवरील वेगवेगळ्या मानसिक विचारांच्या व्यक्तीतरेखा समोर घेऊन येण्यात दिग्दर्शकाने घिसाड घाई करत का सिनेमाचा प्लॉट बऱ्यापैकी  गुंफला आहे.


सिनेमाचं BGM एवढं खास नाही, मात्र सिनेमा पाहताना हे माझ्या मनात नक्की सुरू होतं की असे बालिका, लहान मुलींवर ज्या क्रूरतेने आत्याचार झाले असतील, त्या तिथं कसं जीवन जगल्या असतील या विचारांच्या ओघात तो सिनेमा पटकन संपतो देखील. आजून वेळ घेऊन छान पध्दतीने हा विषय सर्वांच्या पर्यंत पोहोचवता आला असता एवढं मात्र नक्की. असे सिनेमे नक्कीच समाज माध्यमांवर प्रभाव टाकतात, एक सोशल संदेश देतात. वाईट प्रवृत्ती च्या लोकांचे कारनामे समोर येतात, मात्र असे विषय घेऊन येताना दिग्दर्शक असो वा या सिनेमातील प्रत्येक कलाकारांची एक जबाबदारी असते की असे प्रोजेक्ट करताना वेळ घेऊन तो चांगला तयार करावा, खास करून मोठं बॅनर सोबत असताना. मात्र सिनेमा निराशाजनक ठरला!


या सिनेमाला मी देतोय अडीच स्टार.

विनीत वैद्य यांचे अन्य Movie Reviews!

Hanu Man Movie Review : कसा आहे 'हनुमान'?
Three Of Us Movie Review: कसा आहे थ्री ऑफ अस?