Pakistani Model Roma Michael : गेल्या काही दिवसांत पाकिस्तानची मॉडेल रोमा मायकल ही चांगलीच चर्चेत आहे. ही मॉडेल ऑक्टोबर महिन्यात पार पडलेल्या मीस ग्रँड इंटरनॅशनल 2024 स्पर्धेत चक्क बिकिनीवर दिसली होती. पाकिस्तानमध्ये अशा प्रकारचे कपडे परिधान करणे गैर मानले जाते. असे असताना तिने थेट बिकिनी परिधान करून स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेनंतर मात्र आता या मॉडेलचं जगणं मुश्कील होऊन बसलं आहे. या मॉडेलला पाकिस्तानमधून थेट जिवे मारण्याची धमकी मिळत आहे. भारतातून मात्र तिच्यावर कामाच्या ऑफर्सचा पाऊस पडतोय.
मैत्रिणींनी सांगितलं पाकिस्तानात येऊ नको
मॉडेल रोमा मायकेलने तिला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचं सांगितलं. एका पॉडकास्टमध्ये तिने हे सांगितलं आहे. "आपण पाकिस्तानी लोक फार मागे आहोत. दुनिया खूप पुढे गेली आहे. पाकिस्तानमध्ये शिक्षणाचा अभाव आहे. मी बिकिनी परिधान केल्यानंतर तू सध्यातरी पाकिस्तानमध्ये येऊ नको, असं मला माझ्या मैत्रिणींनी सांगितले. तुझ्यासोबत काही वाईटही होऊ शकतं, असं मला माझ्या मैत्रिणींनी सांगितलं. त्यानंतर मी खूप काळ पाकिस्तानध्ये गेली नाही," असं ती म्हणाली.
मला शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली गेली
मला माझ्या घरी जायचं होतं. त्यामुळे तोंडाला मास्क लावून घरी जावं का? असा मी विचार केला. यापुढे पाकिस्तानमध्ये राहणं माझ्यासाठी कठीण होऊ शकतं. काम करणंही कठीण होऊ शकतं. कारण पाकिस्तानच्या ड्रामासाठी (मालिका) वेगळ्या पद्धतीने ऑडिशन्स असतात. पाकिस्तानमध्ये अभिनेत्र्या अशा प्रकारचे कपडे परिधान करू शकत नाहीत. लोक शिव्या देतात. सोशल मीडियावर माझ्याविरोधात मोहीम राबवली गेली. अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची, अशा प्रकारचे कपडे परिधान करण्याची हिंमत यानंतर कोणत्याही मुलीची होता कामा नये, असं या मोहिमेत सांगितलं जात होतं. माझ्याविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही केली गेली," असंही रोमा मायकेलने सांगितले.
भारतातून कामाच्या भरपूर ऑफर्स येत आहेत
तसेच, "मला भारतात कामाच्या खूप साऱ्या ऑफर्स येत आहेत. भारतात जाण्याची माझी इच्छा आहे. पण आमचे संबंध सध्या तेवढे चांगले नाहीत. बॉलिवूडमध्ये काम करण्याची, आंतरराष्ट्रीय शो करण्याची माझी इच्छा आहे," अशी इच्छाही तिने व्यक्त केली आहे.
हेही वाचा :