पहिली गोष्ट जे सिनेप्रेमी चिक्कार सिनेमे पाहतात त्यांनी आजवर बऱ्याच प्रकारातले विषय आशय आणि जॉनर्स, थेरीज पाहिल्या आहेत, त्यावर चर्चा केल्यात... त्या सर्व गोष्टी बाजूला ठेऊन तुम्हाला कधी कधी आपल्याकडं साकार झालेल्या सिनेमांचं कौतुक करावंच लागतं, अश्यातच जर तो सिनेमा फक्त 20 कोटी बजेट मध्ये हलक्याफुल्या कथानकाचा मात्र इन डिटेल आणि सिनेमाच्या टाईमलाईन्स स्क्रिनप्लेचा सुंदर मिलाफ आणि अभिनयाची जबरदस्त जोड असलेला असेल तर कमाल अनुभव येतो. मी बोलतोय महाराजा सिनेमा बद्दल, हा सिनेमा आज प्रत्येकाच्या चर्चेचा विषय ठरतो आहे. कदाचित सिनेमा जसा सुरू होतो आणि सिनेमाच्या क्लायमॅक्स मध्ये कथानकातील धक्कातंत्र प्रेक्षकांच्या हृदयात हात घालणारा ठरल्यामुळे ते झालेलं असावं.
आता बहुतांश लोकांनी सिनेमा पाहिलाय असं गृहीत धरूया. यापैकी बऱ्याच प्रेक्षकांनी अश्या जॉनर्सच्या सिनेमात टाईमलाईन्सचा खेळ कित्येक सिनेमे, वेब सिरीज मधून अनुभवलेला आहे. मात्र आपल्याकडे हे पहिल्यांदा घडलंय का? तर बिलकुल नाही, बऱ्यापैकी बरेच सिनेमे झालेत जे मल्टिपल टाईमलाईन्स मध्ये असल्याचं आणि कधी कोणती टाईमलाईन पाहताय याचा अंदाज येत नाही अश्या रीतीने गणित मंडल्याचं पाहायला मिळतं, जो माल मसाला कालवलाय त्याची दाहकता क्लायमॅक्स मध्ये दिसून येईल, असाच एक नवा सिनेमा नेटफ्लिक्स वरती टॉप ट्रेंड करतोय तो म्हणजे "महाराजा".
सिनेमाची कथा सांगणे म्हणजे रिव्ह्यू नक्कीच नाहीये, त्यामुळे मी ती सांगणे टाळतोच सांगणारही नाही मात्र महाराजा का पाहावा? काय आवडलं नाही यावर जरा प्रकाश टाकूया...
सिनेमात काय पाहण्यासारखं?
विजय सेतुपतीचा हा पन्नासावा सिनेमा आहे, त्याच्या सिनेमांची 'फिफ्टी' सॉलिड लागलीय! शिवाय अनुराग कश्यपचा अभिनय, त्यांच्या सोबतच्या सहकलाकार यांचाही उत्तम अभिनय, सिनेमातल्या डिटेल्स, प्रत्येक फ्रेम मध्ये कलाकारी लपलीय ती दिसून येईल. स्क्रिनपले, डायलॉगबाजी, साहसदृश्ये उत्तम, बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा साजेसं... पोलीस यंत्रणेच् वास्तव रूप.
काय आवडलं नाही ?
सिनेमा संथ तर कधी फारच ओढलेला वाटतो, सिनेमात 2009 आणि 2023 अशी एकत्र टाईमलाईन पाहायला मिळते बाकी डिटेल्स मस्त उतरवल्या मात्र दोन्ही वेळी विजय आणि अनुराग हे बऱ्यापैकी सारखेच दिसले लूक मध्ये मेहनत कमी पडली. सिनेमा एक मेसेज देतो, मात्र मास्टरपीस बिलकुल नाही. टाईमलाईन जोडताना उगाचच विषय भरकटुन खेचला आहे.
काय काय आवडलं?
सिनेमा तुम्हाला पडकून ठेवतो, पुढं काय होणार या विचारात तुम्हाला सतत पडावं लागेल, सिनेमात जबरी व्हिलन साकारलाय तो अनुरागने,
दिग्दर्शन लेखन कसं आहे?
कथा एकदम साधी आहे मात्र ज्यापद्धतीने मांडली आहे त्याला तोड नाही. खरंतर दिग्दर्शक निथिलन स्वामीनाथन खूप मोठी कारकीर्द नक्कीच नाहीये मात्र अनुराग आणि विजय यांना एकत्र उभं करणं ही त्यांची मोठी कमाल म्हणावी लागेल. निथिलन स्वामीनाथन पुढेही जबरदस्त सिनेमे घेऊन येईल ही अपेक्षा आहे!
किती स्टार?
सिनेमा नेटफ्लिक्सवर आलेला आहे, सहज वेळ मिळे तसा पाहू शकता, मल्टिपल टाइमलाईन्सवरती बऱ्याच दिवसांनी असं काहीतरी पाहायला मिळालं, आवर्जून पाहायला हवाच असा सिनेमा आहे असं म्हणता येणार नाही, मात्र सिनेमातून छान संदेश किंवा धडा दिला गेलाय तो महत्वाचा आहे. अनुराग, विजय आणि निथिलन तिघांसाठी प्रत्येकी एक स्टार, मी या सिनेमाला देतोय तीन स्टार!
विनीत वैद्य यांचे अन्य Movie Reviews!
'कल्की 2898 एडी'
कसा आहे आवेशम..?
'मुंज्या' ब्रह्मराक्षसाची हॉरर कहाणी!
मनुष्यप्राणी की भक्षक; वाचा रिव्ह्यू!
कसा आहे थ्री ऑफ अस?