साऊथ सिनेमा हल्ली नेहमीच एक पाऊल पुढं राहिला आहे, एक झालं की एक धमाकेदार सिनेमे अक्षरशः प्रेक्षकांना वेड लावून सोडत असल्याचं पाहायला मिळतं...  
यामध्ये मग मंजुम्मल बॉयज (Manjummel Boys),  प्रेमाळू (Premalu) असो किंवा ब्रह्मयुगम (Bramayugam) सारख्या मल्याळम सिनेमांनी यावर्षी तुफान बॅटिंग केली आहे...


रणबीर च्या  'ॲनिमल' Animal ने हवा केली पण तो काही आपल्या माणसाचा सिनेमा नव्हता, 
संदीप वांगा रेड्डी हा तेलुगू दिग्दर्शक कबीर सिंग आणि 'ॲनिमल' (Animal) मधून हिंदीत उतरला,  
विषय तो नाहीये... मुद्दा असाय की बॉलिवूड वन टाईम वॉच देतात पण साऊथ वाले एनी टाईम वॉच सिनेमे देतात, 
जेवण करताना, ट्रॅव्हल करताना... मॅक्सीमम वॉच टाईम हा एकतर साऊथ, अनिमे, इंग्लिश सिरीजने घेतलाय....


'आवेशम'  (Aavasham) केव्हाच रिलीज झालाय 11 एप्रिल तर OTT वर 9 मेच्या दरम्यान आला, 
लोकसभा निवडणुकीत या तोडफोड सिनेमाकडे कमालीचे दुर्लक्ष झालं, मात्र आवेशम रिल मात्र चांगलंच हिट ठरलं...
मल्याळम सिनेमा इतर भाषेत नसल्याने सर्वदूर पोहोचला नसावा, 
मात्र मी उशिरा का असेना सबटायटल्स सहित एकदा नाही तर दोनदा पाहिला....

कसा आहे आवेशम..?
एकदम सॉलिड, तोडफोड, हिंदीत यायची वाट पाहिली नाही तरी चालेल, पण आवर्जून पहावा असाच आहे.  
कॉलेज गँगवार ते अस्सल गँगवार हा प्रवास जबदस्त ॲक्शन्स, कॉमेडी, कुठेही संथ ना घाईगडबडीत उरकलेला सिनेमा आहे. 
मस्त वेळ घेऊन अडीच तास तुम्हाला खेळवून ठेवेल.. 
'आवेशम' नाही पाहिला, तर अस्सल मनोरंजनाला मुकाल... 

कसा आहे सिनेमाचा प्लॉट..?
बंगळूर च्या कॉलेजमध्ये शिकायला आलेले तीन मित्र, त्यांचं कॉलेज लाईफ, त्यांच्या आईवडिलांची स्वप्नं, 
तर दुसरीकडं कॉलेज रॅगिंग, सिनिअर्स चा त्रास, बदल्याची भावना, मैत्री, फ्रेंडशिप, गॅंगस्टर लोकांची टोळी, त्यांचे  अनेक किस्से... 
आणि गॅंगस्टर रंगा सोबतची या कॉलेज तरुणांची खासम खास मैत्री आणि त्यातले रुसवे-फुगवे, मैत्री साठी काहीपण ही भावना, इमोशन्स आणि मग तुफान राडा आणि हॅप्पी एंडिंग....


जबरी अभिनय..
फहाद फासिल (Fahadh Faasil) याने जबरदस्त स्क्रिन पकडून ठेवल्याचं दिसत, फहादने ज्या प्रमाणे गॅंगस्टर 'रंगा' अभिनयातून जिवंत केलेलं पात्र आहे त्याबद्दल करावं तेवढं कौतुक कमीच पडेल,  
फहाद फासिलने आतापर्यंत त्याच्या कित्तेक सिनेमा मधून दर्जेदार काम केलंय,  पुष्पा मध्ये त्याला तुम्ही नक्की पाहिलं असेलच. 
सोबतच सिनेमातील कोवळी पोरं, अजू, बीबी आणि साथंन  आणि त्यांचा वैरी कुट्टी यांचे अभिनय आणि प्रत्येक दिसणारं कॅरेक्टर उत्तम रित्या भावनिक गुंफलेले आहे...  


काय-काय बघण्यासारखं..
फहाद फासिल (Fahadh Faasil) चा अभिनय, जीतू माधवन (Jithu Madhavan)चं दिग्दर्शन... सिनेमेटोग्राफी उत्तम चित्रीकरण, 
जबरदस्त ॲक्शन सीन्स, मजेदार कॉमेडी सीन्स, जेवढा हलकफूलका तेवढाच अंगावर काटा आणणारी कथा... 
'गाणी' भले ती कळत नसतील तरी मस्त आहेत, नाचायला लावणारी आहेत.   सोबत सिनेमाचा म्युजिक स्कोर सुद्धा हिट आहे... 
लोकेशन्स, पात्रांचे कपडे, त्यांचं स्टायलिंग... त्यांचा रुबाब.... सारं काही टकाटक... 
अभिनय करणाऱ्या प्रत्येकाची पत्रावर असलेली पकड.


काय मिसिंग..
हिंदी भाषेत डबिंग हवं होतं...
सेकंड हाफ उत्तरार्ध जरा कमजोर वाटला, थोडीफार अतिशयोक्ती... 
पण त्याशिवाय साऊथ सिनेमे पूर्णच होऊ शकत नाहीत.


किती स्टार..
या सिनेमाला देता येतील तेवढे स्टार कमीच पडतील, 
मात्र थोडं हातचे राखले तर मी देतोय तब्बल साडेचार स्टार!  
सिनेमा OTT वर उपलब्ध आहे...अवश्य बघाच... 
फहाद चा अभिनय नक्की प्रेमात पाडेल...

विनीत वैद्य यांचे अन्य Movie Reviews!
'मुंज्या' ब्रह्मराक्षसाची हॉरर कहाणी!
मनुष्यप्राणी की भक्षक; वाचा रिव्ह्यू!
कसा आहे थ्री ऑफ अस?