Maharaj Review : श्रद्धा अन् अंधश्रद्धेचा खेळ, पत्रकाराच्या लेखणीत उभा राहिलेला इतिहास; कसा आहे आमिरच्या लेकाचा 'महाराज'?
Maharaj Review : करसनदास मुळजी आणि स्वतःला कृष्णाचा वंशज समजणाऱ्या जेजे याच्यात 1862 च्या चाललेल्या खटल्याची ही कथा आहे.
Siddharth P.Malhotra
Junaid Khan, Sharvari Wagh, Shalini Pandey
OTT
Maharaj Review : आपल्या या समाजात वावरताना अनेक धार्मिक, सामाजिक प्रथा परंपरांची ओळख आपल्याला होते. यातल्या बऱ्याच प्रथांचं आपण अनुकरण करत असतो, काहींच्या मागे वैज्ञानिक दृष्टीकोन असतो, तर काही फक्त ‘शास्त्र असतं ते’ म्हणून त्या आपण सुरू ठेवत असतो. पण यात गफलत होते ती, श्रद्धा आणि अंश्रध्दा ओळखण्यात. यावरच भाष्य करणारा आणि देवाची भक्ती करण्यासाठी आपल्याला कुठल्या मध्यस्तांची गरज आहे का? याच प्रश्नाचा शोध घेणारा, ‘महाराज’ हा चित्रपट आहे.
मुंबईतली 1862 सालची ही गोष्ट आहे. देशातल्या कित्येक समाज सुधारकांप्रमाणे ज्यांचं कार्य हे दुर्लक्षित राहिलं अशा करसनदास मुळजींची. लहानपणापासूनच जिज्ञासू वृत्ती, प्रश्न विचारण्याची सवय, यांमुळेच करसन दास यांचं व्यक्तीमत्त्व हे चळवळ्या वृत्तीचं आहे, हे दर्शवतात. समाजातील एका प्रचलित प्रथे विरोधात आवाज उठवतांना करसन दास यांनी केलेलं कार्य कथेतून, लोकांपर्यंत पोहचवलं गेलं . ही गोष्ट आहे 1862 सालची, देशातील कित्येक समाज सुधारकांप्रमाणे ज्याचं कार्य दुर्लक्षीत राहिलेल्या करसनदास मुळजी यांची.देशातील कित्येक समाज सुधारकांप्रमाणे ज्याचं कार्य दुर्लक्षीत राहीलेल्या करसनदास मुळजी यांची.
करसनदास मुळजी आणि स्वतःला कृष्णाचा वंशज समजणाऱ्या जेजे याच्यात 1862 च्या चाललेल्या खटल्याची ही कथा आहे. धर्मगुरु असलेला जेजे लोकांच्या, विषेशतः महिलांच्या श्रध्देचा अनादर करत धार्मिक प्रथेच्या नावाखाली महिलांचे शोषण करत असतो. करसनदासची प्रेयसी या अनिष्ठ प्रथेची बळी पडते. त्यानंतर आपली श्रध्दा पायदळी तुडवण्यात आली हे समजताच ती आत्महत्या करते, तिथूनच कथा सुरू होते.
या घटनेनंतर करसनदास प्रस्थापितांविरोधात आवाज उठवतो, हातातल्या लेखणीच्या सह्याने जेजेचं सत्य जगा समोर मांडतात. त्यानंतर जेजे मानहानीचा खटला दाखल करतो आणि इथेच सत्य जगासमोर आणण्यासाठी करसनदासच्या हातात आयत कोलीत मिळतं. त्यानंनतर असत्याचा सत्यावर विजय दर्शवणारी साधी कथा आहे.
पण काय गंडलय?
प्रेक्षकांना स्क्रिन पकडून ठेवायला लावेल असा कुठलाच सीन दिसून येत नाही. ‘रूको पिक्चर अभी बाकी है’ असं म्हणायला कुठेच सस्पेन्स दिसून येत नाही. कथेत पाहिजे तसे ट्विस्ट नाही. लक्षात राहतील असे डायलॉग नाहीत. दिग्दर्शनावर देखील बोट ठेवायला जागा आहे. ही संपूर्ण कथा 1862 च्या काळातील मुंबईची आहे. पण चित्रपटात मुंबईचा कुठलाच कनेक्ट देण्यात आला नाही. सीन्स देखील मोजक्याच जागी शूट करण्यात आले आहेत. ही कथा अजून चांगल्या प्रकारे सादर करता आली असती, असं वाटतं. थोडक्यात काय, ‘पैसा कम था, पर कहानी मैं दम था’ असा सीन आहे.
कलाकार आणि अभिनय
करसनदासच्या भूमिकेत आमिर खानचा मुलगा जुनैद खान याने पदार्पण केलं. पदार्पणातच जुनैदने भुमिकेला न्याय दिल्याचं दिसून येतं. त्यासाठी त्याने घेतलेली मेहनत दिसून आली. अर्थात जुनैद सारख्या स्टार किड्सचं कुठल्याही प्रमोशन शिवाय, एवढ्या शांततेत पर्दापण होणं, सगळ्यांसाठीच आश्चर्याचा धक्काच होता. पण जेजेच्या भूमिकेत असलेला जयदीप अहलावतने, शरिरावर घेतलेल्या मेहनतीच्या तुलनेत भूमिकेसाठी थोडी कमी मेहनत घेतल्याच दिसून येतं. नकारात्मक भूमिकेत असलेल्या जेजे अर्थात जयदीपला पाहिजे तशी नकारात्मकता अभिनयात आणता आली नाही. बाकी शालिनी पांडेचे काम चांगलं आहे, शर्वरीने उत्तम काम केले. मुंज्याच्या यशानंतर तिच्या कडून प्रेकक्षकांना मोठ्या अपेक्षा होत्या. त्या तिने पूर्ण देखील केल्या.
महाराज का पहायचा?
एक असे व्यक्ती, असे समाजसुधारक ज्यांनी समाजातल्या अनिष्ठ प्रथांच्या विरोधात आवाज उठवला. आज स्त्रीयांना असलेल्या स्वातंत्र्यासाठी करसनदास यांचं मोठं योगदान आहे. याचसोबत श्रध्देचा अट्टाहास धरतांना पाऊलं कशी नकळत अंधश्रध्देचा हात धरतात हे समजून घेण्यासाठी हा सिनेमा पहावा. तसेच एक सामाजिक प्रश्न जो-या-ना त्या स्वरूपात आज देखील आहेच. त्यावरचं हे चित्रण जरी थेटर मध्ये जाऊन वेळ आणि पैसा घालून पाहण्या सारखं नसलं,तरी ओटीटीवर पाहण्या सारखं आहे. म्हणूनचं हा चित्रपट नेटफ्लिक्स वरच प्रदर्शीत झाला असावा. म्हणून मी या सिनेमाला दोन स्टार्स देतो.