एक्स्प्लोर

Bhoot Bangla: अक्षय, परेश अन् राजपाल, त्रिमुर्तींचा खास 'भूत बंगला'; प्रियदर्शनची तीच जुनी स्टाईल, हॉरर- कॉमेडीचा ओव्हरडोस

Bhoot Bangla Review: 'भूत बंगला' हा हॉरर - कॉमेडी मिक्स असलेला सिनेमा आहे.

Bhoot Bangla Movie Review: अक्षय कुमारचा (Akshay Kumar) चित्रपट म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी जणू पर्वणीच.  जर तुम्ही अक्षय कुमार आणि प्रियदर्शन (Priydarshan) यांच्या सिनेमाचे कट्टर फॅन्स असाल तर, हा चित्रपट खास तुमच्यासाठी.  अक्षय कुमारच्या जुन्या चित्रपटातील शैली आणि अंदाज प्रेक्षकांना आवडते. तीच शैली आपण पाहू इच्छित असाल तर, तुम्हाला अक्षयचा आगामी चित्रपट नक्कीच आवडेल.  'धुरंधर'नंतर (Dhurandhar)फॅमिलीसोबत पाहता येईल, अशा एका हलक्या फुलक्या चित्रपटाची (Movie Review) गरज होती. 'धुरंधर' चित्रपट लहान मुलांसोबत (Entertainment) पाहता आले नाही.   यामुळे काही प्रेक्षक प्रचंड नाराज झाले होते.  यामुळे अनेकांना दुसरा चित्रपट पाहण्यासाठी दुसऱ्या सिनेमागृहात जावे लागले होते. दरम्यान,  अक्षय कुमारच्या चित्रपटामुळे  सिनेमागृहात जाऊन फॅमिलीसोबत सिनेमा पाहण्याची चिंता मिटली. 'भूत बंगला' हा सिनेमा आपल्याला नक्की आवडेल.

'भूत बंगला' या चित्रपटाची स्टोरी काय? (Bhoot Bangla movie review and rating)

 या चित्रपटाची स्टोरी अर्जून आचार्य (अक्षय कुमार) भोवती फिरते.   आपल्या बहिणीचं लग्न लावून देण्यासाठी  अर्जून आपल्या वडिलोपार्जित महालात  लंडनहून  भारतात परततो.  परंतु, तिथे वधू सूर नावाच्या एका राक्षसाची दहशत पाहायला मिळते.  जो वधूंचे अपहरण करतो.  हे लग्न नेमके पुढे कसे होते? वधूंना अपहरण का केले जाते? याचे उत्तर आपल्याला सिनेमा पाहिल्यानंतर मिळेल. यासाठी आपल्याला हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन पाहावा लागेल. 

'भूत बंगला'  हा सिनेमा नेमका आहे कसा? (Akshay Kumar Comedy Film)

'भूत बंगला'  हा ठीकठाक फिल्म आहे.  विशेष चांगला नाही आणि  विशेष वाईटही नाही. अक्षय कुमार आणि प्रियदर्शनने आपली शैली कायम जपली आहे. हा चित्रपट तुम्हाला नक्कीच 'भुल भुलैया' आणि 'जानी दुश्मन' या चित्रपटांची आठवण करुन देईल. चित्रपटाच्या स्टोरीमध्ये काही नवीन नाही.  फर्स्ट हाल्फमध्ये मनोरंजन आहे. इंटरव्हल चांगल्या ठिकाणी संपतो. सेकेंड हाल्फमध्ये हॉरर आहे, यामुळे चित्रपटाची रंगत वाढते. या  चित्रपटाचा क्लायमॅक्स भयंकर आहे.  

हा चित्रपट बऱ्याचदा खूप मनोरंजक वाटते, तर कधी कंटाळवाणा वाटतो.  या चित्रपटातील बऱ्याच सीन्समध्ये लॉजिक लागत नाही, त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी  आपल्याला जास्त डोकं लावावं लागत नाही.  सेकंड हाल्फ पाहत असताना,  चित्रपट  अजून लहान करण्यात आला असता, असं वाटतं. चित्रपटातील व्हिएफएक्स अजून चांगले झाले असते. म्युझिक इतके खास नाही.  'राम जी भले करेंगे' हे गाणं जबरदस्त आहे.  ज्यांना जुन्या शैलीतील कॉमेडी चित्रपट आवडतात, त्यांना हा सिनेमा नक्कीच आवडेल.  परंतु, आताच्या जनरेशनला हा चित्रपट इतका आवडू शकत नाही. फॅमिलीसोबत आपण हा सिनेमा पाहू शकतो.

'भूत बंगला चित्रपटात किती कलाकार?' (Priyadarshan Akshay Kumar comedy movie)

अक्षय कुमारने या चित्रपटात उत्तम काम केलं आहे.   अक्षयच्या चाहत्यांची बऱ्याच काळापासून  मागणी असलेली भूमिका त्याने साकारली आहे. राजपाल यादव अप्रतिम आहे, त्याची कॉमिक टायमिंग चांगली आहे. परेश रावल यानं उत्तम काम केलं आहे. अक्षय, राजपाल आणि परेश रावल ही त्रिमूर्ती या चित्रपटाचे प्राण आहे. असरानी साहेबांना शेवटी पडद्यावर पाहणं आनंददायी वाटतं. तब्बू प्रत्येक फ्रेममध्ये अप्रतिम दिसत आहे. तर, वामिका गब्बी चित्रपटात कमी आणि प्रोमोशनवेळी जास्त दिसली.  जिस्शू सेन गुप्ता आणि मिथिला पार्कर यांनी उत्तमरित्या आपली भूमिका साकारली आहे. 

'भूत बंगला' या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले असून,  आकाश कौशिक यांनी  या चित्रपटाची स्टोरी लिहिली आहे. या चित्रपटात खास नाविन्य नाही.   प्रियदर्शन यांनी जुन्या शैलीमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. परंतु, ही स्टाईल आताच्या जनरेशनला आवडेलच असं नाही. जर, तुम्ही अक्षय कुमारचे फॅन  असाल तर, तुम्हाला हा सिनेमा नक्कीच आवडेल. 

रेटिंग - 3.5.

View More
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार;  शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
Janhavi Kapoor:‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ
‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ
Shriram Nene on Madhuri Dixit:बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
Kranti Redkar On Sameer Wankhede: 'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'
'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; ्
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
Embed widget