एक्स्प्लोर

PMC Bank Fraud : खात्यातून रक्कम काढण्याची मर्यादा वाढून 50 हजारांवर, एटीएम सुविधा सुरु

'पीएमसी' बँकेतील 4 हजार 300 कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाल्यानंतर बँकेकडून हे निर्बंध लादण्यात आले होते. बँकेकडून लादण्यात आलेल्या या जाचक अटीनंतर संतप्त झालेल्या खातेदारांनी बँकेच्याविरोधात आंदोलन केले होते. आंदोलनानंतर खात्यातून रक्कम काढण्याची मर्यादा वाढवण्यात येत आहे.

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने पंजाब आणि महाराष्ट्र बँक (पीएमसी) खातेदारांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 'पीएमसी' बँकेच्या खातेदारांची पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे. आता बँकेचे खातेदार 50 हजार रुपयांपर्यंत रक्कम काढू शकतात. खातेदार पूर्वी खात्यातून 40,000 रूपये काढू शकत होते. पीएमसी बँक खातेदारांना खात्यातून रक्कम काढण्यासाठी एटीएम वापरण्याची मुभा दिली आहे. 'पीएमसी' बँकेतील 4 हजार 300 कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाल्यानंतर बँकेकडून हे निर्बंध लादण्यात आले होते. त्यानंतर खातेदारांना एटीएमने पैसे काढता येत नव्हते. घोटाळा उघडकीस आल्यानंतर आरबीआयने पहिल्यांदाच खातेदारांना एटीएम वापरण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे आता खातेदारांना एटीएमने पैसे काढण्यात येणार आहे.  खातेदारांनी  बँकेकडून लादण्यात आलेल्या या जाचक अटीनंतर संतप्त झालेल्या खातेदारांनी बँकेच्याविरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर बँकेकडून पैसे काढण्याची रक्कम वाढविण्यात आली आहे. पीएमसी बँकेचे सुमारे 17 लाख खातेदार आहेत, तर बँकेवर 11 हजार 500 कोटी रुपयांचं आर्थिक संकट आहे. बँकेत अनेकांची लाखो रुपयांची एफडी, सॅलरी अकाऊंट आहेत. पीएमसी घोटाळाप्रकरणी बँकेच्या खातेदारांनी पैसे परत मिळण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. बँकेच्या खातेधारकांच्या हिताचे रक्षण केले जाईल असा विश्वास आरबीआयच्या गव्हर्नरांनी आपल्याला दिल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. तसेच या प्रकरणाचा लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल असेही सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे. पैसे काढण्याची मर्यादा किती वेळा वाढवली? सर्वात आधी आरबीआयने पैसे काढण्याची मर्यादा केवळ 1000 रुपये निश्चित केली होती. त्यानंतर ती वाढवून 10,000 रुपये करण्यात आली होती. मग आरबीआयने 3 ऑक्‍टोबर रोजी बँक ग्राहकांना आपल्या खात्यातील जमा रकमेपैकी 25,000 हजार रुपये काढण्याची परवानगी दिली. यानंतर खातेदारांनी जोरदार गोंधळ घालत निषेध व्यक्त केल्याने आरबीआयने पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आणि ती 40 हजार रुपये केली. खातेदारांचा पैसा सुरक्षित : आरबीआय दरम्यान, बँकेच्या खातेदारांचा पैसा सुरक्षित आहे. 30 ऑक्टोबरला घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत खातेदारांना निर्णयाची माहिती देण्यात येईल, असं आरबीआयने सांगितलं. यानंतर मुंबईतल्या आझाद मैदानात सुरु असलेलं पीएमसी खातेदारांचं आंदोलन स्थगित करण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lalbaughcha Raja : लालबागच्या राजाला गणेशभक्तांचं भरभरुन दान,  5 कोटी 65 लाख जमा, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
लालबागचा राजाच्या चरणी 5 कोटी 65 लाख रोख रुपयांचं दान, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?',  विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?', विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
Bharat Gogavale : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Truck Accident पुण्यात ट्रक खड्ड्यात व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, पुणे समाधान चौकात नेमकं काय घडलं ?TOP 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : ABP MajhaRatnagiri : स्वप्नात डेडबॉडी पाहणारा 'तो' तरूण कुठे आहे? घटनेचा ऑनलाईन गेमशी संबंध? Special ReportSpecial Report Tirupati Balaji Prasad : तिरुपतीचा प्रसाद, राजकीय वाद; प्रसादात प्राण्यांची चरबी आली कुठून?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lalbaughcha Raja : लालबागच्या राजाला गणेशभक्तांचं भरभरुन दान,  5 कोटी 65 लाख जमा, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
लालबागचा राजाच्या चरणी 5 कोटी 65 लाख रोख रुपयांचं दान, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?',  विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?', विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
Bharat Gogavale : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
VIDEO : लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Shadashtak Yog : सूर्यावर पडली शनीची अशुभ दृष्टी; 'या' राशींना नोकरी-व्यवसायात येणार अडचणीच अडचणी, आरोग्यावरही होणार परिणाम
सूर्यावर पडली शनीची अशुभ दृष्टी; 'या' राशींच्या जीवनात येणार अडचणीच अडचणी, आरोग्यावरही होणार परिणाम
Embed widget