LIVE UPDATE | अयोध्या प्रकरणाचा निकाल लवकरच येण्याची शक्यता, अयोध्येत 144 कलम लागू

Background
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
1. विधानसभा प्रचाराचा शेवटचा आठवडा, उद्धव ठाकरेंच्या आज तब्बल सात सभा, मुख्यमंत्री, शरद पवारांचाही झंझावात, तर राजनाथ सिंह, मायावती, स्मृती इराणी महाराष्ट्रात
2. हिंमत असेल तर कलम 370 पुन्हा लागू करण्याची घोषणा करा, पंतप्रधान मोदींचं थेट आव्हान, तर कर्जमाफी, बेरोजगारी आणि मंदीवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
3. नटरंगासारखं वागणं जमत नाही, शरद पवारांच्या हातवाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर, तर कार्यकर्त्याला कोपर मारणाऱ्या पवारांच्या व्हिडीओचा नरेंद्र मोदींकडून समाचार
4. शिवसेनेवरुन नारायण राणेंच्या मुलांमध्ये दुफळी, नितेश राणेंची मवाळ भूमिका तर निलेश राणेंचा मात्र आक्रमक पवित्रा कायम
5. राम मंदिर प्रकरणात आजपासून शेवटच्या आठवड्याची सुनावणी, येत्या महिनाभरात निकाल येण्याची शक्यता, आयोध्येत कलम 144 लागू
6. पुणे कसोटीत टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर एक डाव आणि 137 धावांनी विजय, मायदेशात सलग अकरा कसोटी मालिका जिंकण्याचा टीम इंडियाचा पराक्रम























