LIVE BLOG | बाळासाहेब थोरातांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड, 5 कार्याध्यक्षांचीही नियुक्ती

Background
1. पूर्वलक्षी प्रभावाने मराठा आरक्षणाची अंमलबजावणी नाही, सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण, पुढच्या सुनावणीपर्यंत मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार
2. चीनच्या सैनिकांकडून भारतीय हद्दीत घुसखोरी, विरोधानंतर माघार, तर भारताने लढाऊ विमानं मागे घेतली तरच हवाई मार्ग खुला करणार, पाकचा आडमुठेपणा
3. काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेते संपर्कात असल्याचा राधाकृष्ण विखे पाटलांचा दावा, कर्नाटक-गोव्यानंतर भाजपने महाराष्ट्र काँग्रेसकडे मोर्चा वळवल्याची चर्चा
4. उघड्या गटारात वाहून गेलेल्या चिमुकल्याचा शोध थांबवला, 48 तासांनंतरही दिव्यांश न सापडल्याने महापालिकेच्या आपत्कालीन विभागाचा निर्णय
5. औरंगाबादच्या गंगापूरमध्ये आगळ्या-वेगळ्या अळीची चर्चा, झुंडीने चालताना सापाप्रमाणे दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती, कृषी अधिकारीही अचंबित
6. गणेशोत्सवात ध्वनी प्रदुषणाचा नियम मोडणाऱ्या मंडळांना अनोखी शिक्षा, 39 मंडळांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड, कोर्टाच्या आवारात एक-एक रोपटं लावण्याचेही आदेश
























