(Source: Poll of Polls)
Yoga During Periods : मासिक पाळी दरम्यान पोटदुखी आणि क्रॅम्पचा त्रास होतोय? तर 'ही' योगासने करा
Yoga During Periods : जर तुम्हाला मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर मत्स्यासनाचा नियमित व्यायाम करा.
Yoga During Periods : जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान तीव्र पोटदुखी, पोटात जळजळ होणे, पाय दुखणे, ओटीपोटात दुखणे यांसारख्या समस्या जाणवत असतील तर, यावर वेदनाशामक औषधांऐवजी तुमच्या दिनचर्येत काही योगासन करा. थोडा वेळ सराव करून तुम्ही या सर्व समस्यांपासून मुक्त होऊ शकता. यामध्ये काही आसने फायदेशीर आहेत ही कोणती ते जाणून घेऊयात.
मत्स्यासन
जर तुम्हाला मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर मत्स्यासनाचा नियमित व्यायाम करा. मासिक पाळीच्या दरम्यान हार्मोन्समध्ये चढ-उतार झाल्यामुळे, पोट फुगणे, गॅस होणे, पोटदुखीचा त्रास, बद्धकोष्ठता आणि पचनाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत या सर्व समस्या दूर करण्यासाठी हे आसन फार प्रभावी ठरते. याशिवाय, पेल्विक भागात रक्त परिसंचरण देखील सुधारते. थायरॉईड ग्रंथीचे कार्य नियंत्रणात ठेवते.
धनुरासन
धनुरासन केल्याने पोटाच्या अंतर्गत अवयवांची चांगली मालिश होते. हे प्रजनन अवयवांना ताणते आणि टोन करते. यामुळे तुमच्या शरीरातील सगळे हे अवयव देखील सक्रिय होतात, ज्यामुळे या अवयवांमध्ये रक्त परिसंचरण चांगले होते.
वज्रासन
मासिक पाळी दरम्यान उद्भवणाऱ्या पचनाच्या समस्या दूर करण्याबरोबरच, वज्रासन हे आसन केल्यामुळे पाठदुखीच्या समस्येपासूनही आराम मिळतो. यामुळे शरीराच्या खालच्या भागात रक्त परिसंचरण वाढते. ज्यामध्ये ओटीपोटाचा भाग देखील समाविष्ट असतो. या आसनामुळे पोटदुखी आणि क्रॅम्पपासूनही बऱ्याच अंशी आराम मिळतो.
मालासना
मालासनाचा सराव केल्याने नितंबांचा भाग चांगला ताणला जातो, ज्यामुळे इथल्या वेदना कमी होतात. प्रजनन अवयवांमध्ये रक्त परिसंचरण सुधारते. हार्मोनशी संबंधित समस्याही हे आसन केल्याने बरे होतात.
शवासन
जरी हे आसन साधारणपणे योगाभ्यास केल्यानंतर शरीराला आराम देण्यासाठी केले जाते. पण, मासिक पाळी दरम्यान, या दोन आसनांसह काही काळ व्यायाम करा. कारण यामुळे तुमच्या शरीरातील जळजळ दूर होते. शरीराला विश्रांती मिळते आणि थकवा निघून जातो. मासिक पाळी दरम्यान तुम्हाला देखील निरोगी शरीरासाठी व्यायाम करायचा असेल तर तुम्ही ही आसनं अगदी घरच्या घरी अगदी सहज करू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.