World Radio Day : Gooood Morningg...Mumbai म्हणत तुमच्या दिवसाची सुरुवात प्रसन्न करणाऱ्या रेडिओचा इतिहास माहीत आहे का?
World Radio Day : समाजाच्या उत्क्रांतीत रेडिओचे महत्त्व आणि योगदान याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक रेडिओ दिवस साजरा केला जातो.
World Radio Day : आजच्या प्रमाणे इंटरनेटचा विकास न झालेल्या काळात रेडिओ हेच एक मनोरंजन आणि शिक्षणाचं माध्यम होतं. पूर्वी माहिती, संप्रेषण आणि गाण्यांच्या माध्यमातून मनोरंजनाचे महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून रेडिओचा उपयोग केला जात असे. पण टेलिव्हिजन आणि मोबाईल यांसारख्या साधनांचा विकास झाल्यानंतर रेडिओ पूर्वीप्रमाणे तितका वापरला जात नाही. असे असले तरीही आजही रेडिओचे महत्त्व मात्र, अबाधित आहे.
आजही रेडिओ हे माहिती पसरविण्याचे सर्वात शक्तिशाली माध्यम म्हणून याकडे पाहिले जाते. 13 फेब्रुवारी 1945 रोजी संयुक्त राष्ट्र रेडिओचे पहिल्यांदा प्रसारण झाले. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस जागतिक रेडिओ दिन (World Radio Day) म्हणून साजरा केला जातो. ‘ऑल इंडिया रेडिओ’ला (All India Radio) ‘आकाशवाणी’(Aakashwani) हे नाव म्हैसूरच्या एम. व्ही. गोपालस्वामी यांनी दिले. भारतात रेडिओची सुरुवात 1923 साली रेडिओ क्लब इथे झाली.1936 साली त्याला ‘ऑल इंडिया रेडिओ’ हे नाव मिळाले.
ऑल इंडिया रेडिओ हे जगातील सर्वात मोठे रेडिओ नेटवर्क आहे. आकाशवाणीच्या अनेक भाषांमध्ये अनेक सेवा आहेत. प्रामुख्याने दिल्ली, मुंबई, कोलकत्ता, चेन्नई, लखनौ आणि तिरूचिरापल्ली या ठिकाणी आकाशवाणीची प्रमुख केंद्र आहेत.
रेडिओचा शोध कोणी लावला ?
19व्या शतकाच्या उत्तरार्धात इटालियन शोधक आणि विद्युत अभियंता गुग्लिएल्मो मार्कोनी यांनी रेडिओचा शोध लावला. पहिला जागतिक रेडिओ दिन औपचारिकपणे 2012 मध्ये साजरा करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या :
- Hug Day 2022 : नातं अधिक घट्ट करणाऱ्या Hug Day चे जाणून घ्या अनेक फायदे...
- Happy Promise Day 2022 : आज 'प्रॉमिस डे'; पार्टनरला द्या 'हे' वचन
- Chocolate Day: कुछ मिठा हो जाये... नात्यातील गोडवा टिकवायचा असेल तर 'चॉकलेट डे'ची संधी सोडू नका
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha