World Cancer Day: कॅन्सरचा सर्वात गंभीर प्रकार आहे ब्रेन ट्यूमर; जाणून घ्या लक्षणं
भारतात दरवर्षी हजारो लोकांचा कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराने मृत्यू होतो. 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कॅन्सर दिवस साजरा करण्यात येतो. कॅन्सरसारख्या गंभीर आणि जीवघेण्या आजाराबाबत जागरूकता पसवण्यासाठी अनेक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतं.
मुंबई : कॅन्सर म्हणजे, जीवघेणा आणि गंभीर आजार. भारतात दरवर्षी हजारो लोकांचा या जीवघेण्या आजाराने मृत्यू होतो. काही दिवसांपूर्वी सादर करण्यात आलेल्या नॅशनल हेल्थने जारी केलेल्या एका अहवालानुसार, कॅन्सरच्या रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कॅन्सर दिवस साजरा करण्यात येतो. कॅन्सरसारख्या गंभीर आणि जीवघेण्या आजाराबाबत जागरूकता पसवण्यासाठी अनेक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतं.
डॉक्टरांचं म्हणणं आहे की, कॅन्सरची माहिती जर सुरूवातीच्या टप्प्यातच समजली तर हा आजारापासून पूर्णपणे सुटका करणं सहज शक्य आहे. तसं पाहायला गेलं तर कॅन्सर सारख्या आजाराची सर्वच लक्षणं जीवघेणी आणि गंभीर आहेत. परंतु, सर्वात घातक कॅन्सरच्या प्रकारांपैकी एक म्हणजे, ब्रेन ट्यूमर.
It's #WorldCancerDay DYK: In 2018, over 18 MILLION people around 🌏🌍🌎 had #cancer, and 10 MILLION people died from the disease.https://t.co/4LFMaV6OqH Let's beat cancer! Let's beat cancer! Let's beat cancer! Let's beat cancer! Let's beat cancer! pic.twitter.com/C2GEHiSQZA
— World Health Organization (WHO) (@WHO) February 3, 2020
कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 2 टक्के ब्रेन ट्यूमरचे रूग्ण
कॅन्सरमुळे मृत्यू होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी जवळपास 2 टक्के मृत्यू हे ब्रेन ट्यूमरमुळे होतात. 2018मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका ग्लोबल रिपोर्टनुसार, भारतात दरवर्षी जवळपास 28142 लोक ब्रेन ट्यूमरसारख्या गंभीर आजाराने ग्रस्त होते. या आजारामुळे रूग्णाच्या जीवनावर आणि त्याच्या कुटुंबावर नकारात्म परिणाम दिसून येतात.
ब्रेन ट्यूमरच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये अचानक मेंदूचा भाग वाढू लागतो. मेंदूच्या पेशी आणि नसांमध्ये ट्यूमर झाल्यामुळे असं होतं. परंतु, हे होण्यामागे कॅन्सर किंवा इतरही कारणं असून शकतात. नॉन कॅन्सरिक ट्यूमर असेल तर ऑपरेशन करून ट्यूमर काढता येऊ शकतो. तसेच कॅन्सरचा ट्यूमर असेल तर त्याची वाढ वेगाने होत असते. त्याचबरोबर हा ट्यूमर वेगाने शरीराच्या इतर भागांमध्येही पसरत असून हे जीवघेणं ठरू शकतं. दरम्यान, 70 टक्के ब्रेन ट्यूमर नॉन-कॅन्सरस असतात.
कसा होतो ब्रेन ट्यूमर?
ब्रेन ट्यूमर होण्यामागील योग्य कारण सांगणं तसं फार अवघड आहे. दरम्यान, अनेकदा ब्रेन ट्यूमर जीवघेणा ठरत नाही. फक्त काही प्रकरणांमध्ये ही स्थिती घातक ठरते.
- ब्रेन ट्यूमरबाबत असं दिसून आलं आहे की, अनेकदा हा ट्यूमर वाढणाऱ्या वयानुसार वाढत जातो. - रेडिएशनसोबत ब्रेन ट्यूमरचा धोकाही वाढतो. विशेषतः लहान मुलांमध्ये या आजाराचा धोका वाढण्याची शक्यता अधिक असते. - ब्रेन ट्यूमरचा धोका अनुवांशिक असतो. जर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला हा आजार झाला असेल तर इतरांनाही हा आजार होण्याचा धोका असतो. - ब्रेन ट्यूमर होण्याच्या इतर कारणांमध्ये मोबाइल फोन रेडिएशन, हार्मोनल फॅक्टर, कम फ्रीक्वेंसी असलेलं चुंबकीय क्षेत्र किंवा औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना याचा अधिक धोका असतो.
ब्रेन ट्यूमरची लक्षणं :
ब्रेन ट्यूमरची लक्षणं त्याचं स्थान, विकासाचा दर आणि आकारावर अवलंबून असतो. ही आहेत काही घातक लक्षणं :
- ब्रेन ट्यूमरच्या अधिकाधिक रूग्णांना डोकेदुखीच्या तक्रारींचा सामना करावा लागतो. तसेच उलटी होणं, मळमळणं यांसारख्या समस्याही उद्भवतात. - शरीराच्या एखाद्या भागात गाठ असणं. - ब्रेन ट्यूमरच्या रूग्णांना शरीराच्या कोणत्याही भागात गाठ येणं हे सामान्य लक्षण आहे. याव्यतिरिक्त पाहण्यासाठी आणि बोलण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
ब्रेन ट्यूमरवर उपचार
ब्रेन ट्यूमरवर उपचा न्यूरोसर्जरी, रेडिएशन आणि औषधांमार्फत करण्यात येतात. आजाराच्या लक्षणांच्या आधारावरच उपचार करण्याची पद्धत निवडण्यात येते. सुरुवातीला कीमोथेरपीमार्फत उपचार करण्यात येतात. तर त्यानंतरच्या स्टेजमध्ये ऑपरेशन आणि रेडियोथेरपीची पद्धत वापरण्यात येते. दरम्यान, या आजारांपासून बचाव करण्यासाठी आपण जागरूक असणं अत्यंत आवश्यक आहे. शरीरात होणारे बदल आणि लक्षणं लक्षात घेतली तर उपचारांच्या मदतीने या आजारापासून पूर्णपणे बरं होणं शक्य आहे.
संबंधित बातम्या :
Corona virus | कोरोना व्हायरसवर औषध सापडलं; थायलंडमधील डॉक्टरांचा दावा
Health Tips : ब्लड प्रेशरची समस्या दूर करण्यासाठी 'हे' उपाय करतील मदत
Health Tips : हिवाळ्यात आइस्क्रिम खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
वजन कमी करायचंय?; दररोज करा आवळ्याच्या ज्यूसचं सेवन, होतील फायदेच फायदे