(Source: ECI/ABP News/ABP Majha)
World Cancer Day 2024 : स्वयंपाकघरातील 'या' गोष्टी कर्करोगापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त; आजपासूनच आहारात समावेश करा
World Cancer Day 2024 : कॅन्सर हा स्वयंपाकघरातील काही गोष्टींचा आहारात समावेश केल्यानेही कमी करता येऊ शकतो हे फार कमी लोकांना माहीत आहे.
World Cancer Day 2024 : जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day) हा दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. कर्करोगा संबंधित जनजागृती करणे आणि या जीवघेण्या आजाराचा (Health) धोका कमी करणे हे या दिनाचं मुख्य उद्दिष्ट आहे. कर्करोग हा खरंतर एक प्रकारचा नसून यामध्ये अनेक प्रकार आढळतात. जसे की, फुफ्फुसाचा कर्करोग, स्तनाचा, गर्भाशयाच्या मुखाचा, डोके आणि मान आणि कोलेस्ट्रॉल इ. यामध्ये प्रत्येक प्रकारचा कर्करोग हा कसा असतो? आणि त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो. हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. तरंच, या आजाराचं प्रमाण कमी करता येतं.
युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल (UICC) च्या नेतृत्वाखाली UN-मान्यताप्राप्त असा हा दिवस आहे. हा दिवस दरवर्षी एका अनोख्या थीमसह साजरा केला जातो. त्यानुसार, यावर्षीची थीम 'कॅन्सर केअर गॅप कमी करणे' अशी आहे. मात्र, कॅन्सर हा स्वयंपाकघरातील काही गोष्टींचा आहारात समावेश केल्यानेही कमी करता येऊ शकतो हे फार कमी लोकांना माहीत आहे.
कॅन्सर टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात असलेल्या या गोष्टींचा आहारात समावेश करू शकता.
1. लसूण (Garlic)
लसणात असलेले सल्फर संयुगे कोलन, स्तन, फुफ्फुस आणि प्रोस्टेट कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यास मदत करतात. कर्करोग टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात लसणाचा समावेश करू शकता.
2. कांदा (Onion)
कांद्यामध्ये क्वेर्सेटिन आणि अँथोसायनिन मुबलक प्रमाणात असते, जे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात. जे शरीरात कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखण्यास मदत करू शकतात.
3. हळद (Turmeric)
हळद हा स्वयंपाकघरातील एक मसाला आहे जो दररोज जेवणात वापरला जातो. हळद हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. हळद हे कॅन्सरवर नैसर्गिकरीत्या सर्वात मजबूत औषध म्हणून ओळखले जाते. हळद कर्करोगाच्या केमोथेरपीचा प्रभाव वाढवण्याचे काम करते. हळद तेल आणि काळी मिरी मिसळून वापरल्याने अधिक फायदा होतो.
4. आले (Ginger)
चहाची चव वाढवण्यासाठी आपण सर्वजण सामान्यतः आल्याचा वापर करतो. अदरक कर्करोगासाठी फायदेशीर मानले जाते कारण आल्यामध्ये काही विशेष गुणधर्म असतात जे कर्करोगाच्या पेशींशी लढतात. आल्याचा रस केमोथेरपी किंवा रेडिओथेरपीमुळे होणाऱ्या समस्यांपासून मुक्त होण्यास देखील मदत करू शकतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Health Tips : 100 दिवसांहूनही जास्त खोकला राहतो का? 'हे' आहे गंभीर आजाराचं लक्षण; वाचा कारणं आणि उपचार
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )