Work Load : ऑफिसचं काम, डोक्याला ताप! तुम्हालाही तणाव वाटतोय? तज्ज्ञांकडून जाणून घ्या मुक्त होण्याचे मार्ग
Work Load : जर तुम्हाला ऑफिसच्या कामामुळे खूप तणावाचा सामना करावा लागत असेल तर, तुम्ही येथे दिलेल्या तज्ज्ञांच्या टिप्सचे पालन केले पाहिजे.
Work Load : सध्या ऑफिसचं काम खूप आहे रे..! ऑफिस मीटींग सुरू आहे माझी..! हा Work load झेपत नाही बुवा आता..! काय करू? जॉब सोडून देऊ का? आजकाल असे विविध वाक्य आपण नोकरी करणाऱ्या लोकांच्या तोंडून ऐकत असतो. सुटीनंतर सोमवार आला का जीव नकोसा होतो. एक तर शहरातील ट्राफिकचा सामना करत कुठे ऑफिसला पोहचत नाही, तोपर्यंतच विविध प्रकारचं काम ऑफिसमध्ये आपली वाट पाहत असते. सोमवारी ऑफिसला जावं लागलं की, प्रत्येकाला थोडा आळशीपणा वाटतो. याचे कारण म्हणजे बहुतेक लोक ऑफिसच्या ताणामुळे त्रस्त असतात. हर जिंदगी वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, आर्टेमिस हॉस्पिटलचे मुख्य मानसोपचार तज्ज्ञ आणि मेंटल हेल्थ अँड बिहेवियरल सायन्सेसचे चीफ कन्सल्टंट डॉ. राहुल चांडोक यांच्याकडून जाणून घेऊया, अशाच काही गोष्टी, ज्यामुळे तुम्हीही ऑफिसच्या कामाचा ताण टाळू शकता. कसं ते जाणून घ्या..
प्रत्येक क्षेत्रात कार्यालयीन कामाचा ताण
क्षेत्र कोणतंही असो.. कार्यालयीन कामाचा ताण कमी-अधिक प्रमाणात ठिकठिकाणी असतो. या तणावात काही लोक असेही दिसतात, ज्यांना कामाचा कोणताही ताण नसतो, तसेच त्यांची कामगिरीही चांगली असते. अशावेळा मनात एकच प्रश्न येतो, या लोकांनी मानसिक तणावातून मुक्त होण्यासाठी कोणती पद्धत अवलंबली असेल? जाणून घ्या
वर्कलोडसाठी स्वतःला आधीच तयार करा
कामाचा ताण टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्याची आगाऊ तयारी करणे. बहुतांश कार्यालयीन कामांची रचना ठरलेली असते. उद्या कोणते काम करायचे आहे ते आधीच माहीत असते. अशा स्थितीत कर्मचारी आगामी कार्याची प्राथमिक तयारी अगोदरच करतात. यामुळे काम मोजकेच करावे लागते, तसेच गोंधळ आणि घाईचा सामनाही करावा लागत नाही.
संस्थेच्या अपेक्षा समजून घ्या
कार्यालयीन जबाबदाऱ्या दिवसेंदिवस बदलत असतात, परंतु सर्वसाधारणपणे कामाचे स्वरूप निश्चित असते. संस्थेला तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. याबाबत काही शंका असल्यास वरिष्ठांशी बोलून भूमिका स्पष्ट करा. भूमिका समजून घेतल्यास त्यासाठी तयार राहणे सोपे जाते. कधी कधी आपल्याला कोणते काम करायचय हे माहीत नसल्यावर कामावर सर्वाधिक ताण येतो.
कार्यालयीन वातावरण तणावमुक्त करा
कार्यालयीन ताणतणावांमध्ये शारीरिक ताणही मोठी भूमिका बजावते. म्हणून, कामाची जागा आनंददायी ठेवा. कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या शारीरिक ताणाचा सामना करावा लागणार नाही, असे वातावरण राखण्याची जबाबदारीही व्यवस्थापनाची आहे. उदाहरणार्थ, उन्हाळ्यात, एसीचे योग्य कार्य करणे आणि प्रत्येकासाठी थंड पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
हे चंकिंगचे युग आहे, मल्टीटास्किंगचे नाही.
एक काळ असा होता जेव्हा मल्टीटास्किंग हे मोठे कार्य मानले जात असे. पण कालांतराने हे समजू लागले की मल्टीटास्किंग फारसे चांगले नाही. जर तुम्ही फोन एका कानाला लावला आणि दुसऱ्या कानावर आकडेमोड केली तर चूक होण्याची शक्यता वाढते. त्यामुळेच आता चंकिंग करण्याची वेळ आली आहे. चंकिंग म्हणजे कमी वेळेत तुकड्यांमध्ये काम करणे, म्हणजेच एका दिवसात करावयाच्या कामाचे तुकड्यांमध्ये विभाजन केले जाते आणि प्रत्येकासाठी ठराविक वेळ निश्चित केली जाते. उदाहरणार्थ, जर ते फार महत्वाचे नसेल, तर दिवसभरात वारंवार ईमेल तपासण्याऐवजी, सर्व ईमेल एका ठराविक वेळी तपासा. त्याचप्रमाणे इतर कामांसाठीही वेळ द्या. त्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होईल.
तणावापासून मुक्त होण्यासाठी स्वतःला बक्षीस द्या
नेहमी कामावर सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा आणि जेव्हा तुम्ही तुमच्या अपेक्षा पूर्ण करता तेव्हा स्वतःची पाठ थोपटा. स्वतःला प्रेरित करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. अनेकवेळा आपण अपेक्षा करतो की, कोणीतरी आपल्या कामाची स्तुती करेल, पण स्वतःला कधीच प्रोत्साहन देत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही तुमचे सर्वात जवळचे मित्र आहात.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Happiness : 'जगी सर्व सुखी असा कोण आहे? जगात 'या' 9 देशांचे लोक सर्वाधिक दु:खी, भारताचा क्रमांक वाचून आश्चर्यचकित व्हाल...