एक्स्प्लोर

Women Health : महिलांनो तुमचं हृदय जपा! पुरुषांपेक्षा महिलांना हृदयविकाराचा त्रास अधिक? सर्वात मोठं कारण समोर, तज्ज्ञ सांगतात...

Women Health :  पुरुषांपेक्षा महिलांना हृदयाशी संबंधित आजारांचा धोका जास्त असतो. याची अनेक कारणे आहेत. आरोग्य तज्ज्ञांकडून सविस्तर जाणून घ्या..

Women Health : सध्या महिलासुद्धा चूल आणि मूल पर्यंत मर्यादित न राहता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नोकरी करत आहे, आपलं करिअर बनवत आहेत. अशात बदलती जीवनशैली, कामाचा ताण, मुलांचं संगोपन, शारिरीक समस्या आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे महिलेला सुद्धा मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. हृदयाची समस्या हे जगभरात मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का की पुरुषांपेक्षा महिलांना हृदयाशी संबंधित आजारांचा धोका जास्त असतो. याची अनेक कारणे आहेत. आरोग्य तज्ज्ञांकडून सविस्तर जाणून घ्या..

महिलांमध्ये मृत्यूचे प्रमुख कारण म्हणजे हृदयविकार!

जगभरात साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा उद्देश त्यांना त्यांच्या आरोग्याबाबत जागरुक करणे आहे. एका अभ्यासानुसार, भारतात हृदयविकार हे महिलांमध्ये मृत्यूचे प्रमुख कारण बनत आहे. मानसिक तणाव, खराब जीवनशैली आणि आहार हे हृदयाच्या समस्यांचे सर्वात मोठे कारण मानले जाते. शहरी भागात राहणाऱ्या महिलांना या दोन गोष्टींकडे लक्ष देणे कठीण आहे, ज्यामुळे त्यांना हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते, परंतु ग्रामीण भागातील महिलांमध्येही हा धोका फारसा कमी नाही. हृदयविकाराची तशी अनेक कारणे आहेत, त्यात मुख्य म्हणजे उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, मधुमेह, धूम्रपान, मद्यपान, अस्वास्थ्यकर आहार, कमी शारीरिक हालचाली आणि मानसिक ताण.

स्त्रियांमध्ये हृदयाच्या समस्या वाढण्याचे कारण काय?

एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीनुसार, कार्डिओलॉजिस्ट डॉ. सुखबिंदर सिंग सिबिया म्हणतात, 'महिलांमध्ये हृदयविकाराच्या वाढत्या प्रमाणाचे एक प्रमुख कारण म्हणजे 'अति जबाबदारीचे ओझे'. जे तणाव वाढवण्याचे काम करते. कौटुंबिक आणि ऑफिसमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करत असताना ती तिच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत असते. वयानुसार निरोगी राहण्यासाठी, आपल्या आहाराकडे लक्ष देणे आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे अनेक आजार वेळेत ओळखून आवश्यक उपचारांनी बरे होऊ शकतात.

हृदयविकाराची लक्षणे

स्त्रियांमध्ये हृदयविकाराची लक्षणे पुरुषांपेक्षा वेगळी असू शकतात, जसे की छातीत दुखण्यापेक्षा थकवा, श्वास घेण्यास त्रास, पाठ किंवा जबडा दुखणे. ज्याकडे सामान्य समस्या समजून दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अनेक वेळा हृदयविकार वेळेत सापडत नाहीत.

हृदयरोग टाळण्यासाठी उपाय

आहाराकडे लक्ष द्या

महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी काही महत्त्वाची पावले उचलली जाऊ शकतात. यासाठी सर्वप्रथम आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या आहारात संपूर्ण धान्य आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांसह हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करा. यासोबतच सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट, सोडियम आणि साखरेचे पदार्थ यांचे सेवन कमी करून खराब कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो आणि हृदयविकार टाळता येतात.

शारीरिक Activity महत्वाची

दुसरं महत्त्वाचं म्हणजे नियमित शारीरिक Activity. दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा. चालणे, जॉगिंग, सायकलिंग, कार्डिओ हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. व्यायाम केल्याने वजन नियंत्रणात राहते. यामुळे हृदयाच्या समस्यांबरोबरच मधुमेहाचा धोकाही कमी होतो.

धूम्रपान सोडणे

धूम्रपान आणि मद्यपानावर नियंत्रण ठेवणे देखील खूप महत्वाचे आहे. धूम्रपानाची सवय सोडून दिल्यास हृदयाशी संबंधित आजारांचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो. याशिवाय मद्यपान मर्यादित प्रमाणात करा, जास्त मद्यपान केल्याने रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयविकाराचा धोकाही वाढतो.

तणावापासून दूर राहा

महिलांनी मानसिक आरोग्याकडेही लक्ष दिले पाहिजे, कारण तणाव आणि नैराश्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. नियमित योग, ध्यान आणि पुरेशी झोप यामुळे मानसिक ताण कमी होण्यास मदत होते.

हेही वाचा>>>

Women Health : महिलाच सहजपणे 'थायरॉईडच्या' बळी का होतात? असे का घडते? कारणं आणि सुरुवातीची लक्षणे तज्ज्ञांकडून जाणून घ्या.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Embed widget