Women Health: महिलांनो...थायरॉईडचा 'हा' प्रकार भविष्यात बनेल हानिकारक! अजिबात दुर्लक्ष करू नका, महिलांवरील होणारा परिणाम थक्क व्हाल
Women Health: थायरॉईडशी संबंधित समस्या कोणालाही होऊ शकतात, मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो. काही प्रकरणांमध्ये, ही स्थिती बहुतेक स्त्रियांना अधिक त्रास देते.
Women Health: जसं जसं वय वाढत जातं. तसं महिलांना अनेक शारिरीक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. आजकालची बदलती जीवनशैली, कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या यासारख्या गोष्टींमुळे अनेक महिला त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करताना दिसतात, ज्याचा परिणाम विविध गंभीर आजार त्यांना होण्याची शक्यता असते. थायरॉईड असा एक आजार आहे. जो प्रामुख्याने महिलांना आपल्या जाळ्यात ओढतो. जर तुम्हाला थायरॉईड संबंधित काही लक्षणं जाणवत असतील तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण भविष्यात ते इतर अनेक समस्यांचे कारण बनू शकते
प्रसूतीनंतर महिलांना धोका जास्त
गेल्या काही वर्षांत थायरॉईडचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. थायरॉईडचे दोन प्रकार आहेत, एक हायपोथायरॉईडीझम आणि दुसरा हायपरथायरॉईडीझम. दोन्ही परिस्थिती वेगवेगळ्या प्रकारे आरोग्याला हानी पोहोचवतात. बहुतेक महिलांना हायपोथायरॉईडीझमचा त्रास होतो. हायपोथायरॉडीझम हा असा टप्पा आहे, जो थायरॉईड ग्रंथीमधून थायरॉईड हार्मोन्सच्या अपूर्ण उत्पादनामुळे होतो. प्रसूतीनंतर आयोडीनच्या कमतरतेमुळे किंवा थायरॉईडीझममुळे देखील हे होऊ शकते. ही अशी स्थिती आहे, जी बहुतेक स्त्रियांना प्रभावित करते. कधीकधी ते अनुवांशिक देखील असते. जर तुम्हाला थायरॉईड ग्रंथीमध्ये काही गडबड जाणवत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण भविष्यात ते इतर अनेक समस्यांचे कारण बनू शकते.
हायपोथायरॉईडीझम म्हणजे काय?
थायरॉईड ग्रंथी थायरॉईड हार्मोन्सच्या सामान्य प्रमाणापेक्षा कमी उत्पादन करते, तेव्हा हायपोथायरॉईडीझम उद्भवते. यामुळे अनेक शारीरिक कार्ये मंदावतात. हायपोथायरॉईडीझम ही एक अशी स्थिती आहे, ज्यावर उपचार केले जाऊ शकतात.
View this post on Instagram
हायपोथायरॉईडीझमची लक्षणे
- थकवा आणि असंतुलित वाटणे
- जडपणा किंवा वजन वाढणे
- थंड हात आणि पाय
- चिकट त्वचा, कोरडे केस आणि तुटलेली नखे
- बद्धकोष्ठता आणि गॅस सारख्या पचन समस्या
- मासिक पाळी समस्या
- मानसिक ताण, विस्मरण आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण
- घसा सुजणे, दुखणे आणि घसा खवखवणे
- मूड बदल, उदासीनता आणि दुःख
- श्वसन समस्या
हायपोथायरॉईडीझम कसे टाळाल?
नियमित तपासणी
तुमची थायरॉईड स्थिती नियमितपणे तपासणे फार महत्वाचे आहे.
निरोगी आहार
सकस आणि संतुलित आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. अंडी, भाज्या, फळे, कडधान्ये, अक्रोड आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये तुमच्या आहारात आयोडीन, सेलेनियम, जस्त, व्हिटॅमिन डी आणि बी12 चांगले असले पाहिजेत.
नियमित व्यायाम
थायरॉईडसाठी नियमित व्यायाम फायदेशीर ठरू शकतो.
योग्य वेळी औषध घेणे
कोणतेही औषध डॉक्टरांनी सांगितले असेल तर ते योग्य वेळी घ्या.
तणाव कमी करा
तणाव कमी करण्यासाठी ध्यान, योगा आणि विश्रांतीची गरज आहे.
वेळेवर उपचार
तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हेही वाचा>>>
Men Health: सावधान! लॅपटॉपमुळे शुक्राणूंची संख्या कमी होतेय? कारण जाणून घ्या, कसं टाळाल?
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )