एक्स्प्लोर

Women Health : आईचे दूध बाळाला बाटलीतून पाजता? असं करणं योग्य की अयोग्य? बालरोगतज्ज्ञांकडून जाणून घ्या..

Women Health :तुमच्या बाळाला बाटलीतून आईचे दूध देत असाल. तर प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञांनी यासंदर्भात काही महत्त्वाची माहिती दिली आहे.

Women Health : ते म्हणतात ना, आईचे दूध हे बाळासाठी अमृतच आहे. आई आपल्या बाळाला जे दूध पाजते, त्यातून बाळाचा शारिरीक, मानसिक विकास तर होतोच, सोबत रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. आईचे दूध मुलासाठी सर्वात महत्वाचे आहे. पण आजकाल आईही नोकरी करत असल्याने तिला दूध पाजण्यासाठी बाळासोबत सतत उपस्थित राहता येत नाही. त्यावेळी ती तिचे दूध काढून मुलासाठी बाटलीत साठवते. बाळाला बाटलीतून आईचे दूध पाजताना अनेकदा विचार होतो की असे करणे योग्य आहे की मुलाच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते? बालरोगतज्ज्ञांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिलीय. जाणून घेऊया..

बाटलीतून आईचे दूध देऊ शकतो का?

एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार बालरोगतज्ञ डॉ. पुनीत आनंद यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करून असे करणे योग्य आहे की नाही हे सांगितले आहे. डॉक्टर पुनीत सांगतात की, दुधाच्या बाटल्यांचे स्तनाग्र सिलिकॉनचे असते. मुलाला ते चोखणे सोपे आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला बाटलीचे दूध पाजल्यानंतर स्तनपान करता तेव्हा बाळ फक्त स्तनाग्र शोषते आणि एरोला नाही, ज्यामुळे निप्पल कन्फ्युजन निर्माण होतो.

काय केले पाहिजे?

या कारणास्तव डॉक्टर महिलांना सल्ला देतात की, त्यांनी आपल्या मुलाला लवकर बाटलीने दूध पाजू नये. निप्पल कन्फ्युजनमुळे लॅक्‍टेशन फेलियर होऊ शकते आणि मूल आईच्या दुधापासून वंचित राहू शकते.

बाटलीने दुध पाजण्याचे तोटे

बाटलीतील दूध प्यायल्यास बाळाला संसर्ग, उलट्या आणि पोटशूळचा त्रास होऊ शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या कारणास्तव, मुलाला बाटलीने आहार देणे टाळले पाहिजे. आईचे दूध बाळासाठी सर्वात फायदेशीर आहे. आपण या गोष्टीचे पालन केले पाहिजे. हे आई आणि बाळ दोघांसाठीही फायदेशीर आहे.

इतर कोणते तोटे आहेत?

क्वीन्सलँड सरकारमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखानुसार, जर बाळाला बाटलीतून दुधाचा प्रवाह नियंत्रित करता आला नाही, तर त्याला दूध गिळणे कठीण होऊ शकते आणि प्रक्रियेत त्याचा श्वास घेण्यास अडचण निर्माण होऊ शकते. जर एखाद्या मुलाने प्लास्टिकच्या बाटलीतून दूध प्यायले तर त्याला कानात संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. तसेच मुलाच्या तोंडाच्या मागच्या बाजूला दूध आणि बॅक्टेरिया जमा होऊन कानात गेल्यामुळे असे होऊ शकते. बाळाला नेहमी सरळ स्थितीत दूध पाजावे.

वाडगा किंवा चमच्याने दूध देऊ शकता

डॉक्टर सांगतात की, तुम्ही बाळाला वाटी आणि चमच्याने आईचे दूध पाजू शकता पण हे लक्षात ठेवा की स्तनपान हे सर्वोत्तम आहे.

हेही वाचा>>>

Women Health : रांधा.. वाढा.. उष्टी काढा..! पुरुषांपेक्षा स्त्रिया अधिक तणावग्रस्त का असतात? समोर आलं कारण..

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident News : जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
Pune Crime: कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
Egg Price : सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
Elephanta Boat Accident : मुंबईतील बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी आरीफ बामणे ठरले 'देवदूत', उद्धव ठाकरेंकडून विशेष कौतुक, मातोश्रीवर केला सन्मान
मुंबईतील बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी आरीफ बामणे ठरले 'देवदूत', उद्धव ठाकरेंकडून विशेष कौतुक, मातोश्रीवर केला सन्मान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :24  डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9 AM : 24  डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Bhondekar : शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या राजीनामानाट्यानंतर यूटर्नTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24  डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident News : जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
Pune Crime: कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
Egg Price : सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
Elephanta Boat Accident : मुंबईतील बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी आरीफ बामणे ठरले 'देवदूत', उद्धव ठाकरेंकडून विशेष कौतुक, मातोश्रीवर केला सन्मान
मुंबईतील बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी आरीफ बामणे ठरले 'देवदूत', उद्धव ठाकरेंकडून विशेष कौतुक, मातोश्रीवर केला सन्मान
आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
आमचा राग संपलाय,राजीनामा नाट्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा युटर्न, म्हणाले, 'काही दिवस थांबा..'
IPO Update : DAM Capital च्या आयपीओवर गुंतवणूकदारांचा पैशांचा वर्षाव, 81.88 पट बोली लागली, GMP कितीवर?
IPO Update : DAM Capital च्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांची रांग, GMP किती टक्क्यांवर? 
Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर पोलिसांच्या तावडीत, हरिद्वार
लातुरातील बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
Embed widget