एक्स्प्लोर

Women Health : मासिक पाळीचा तुमच्या त्वचेवर कसा परिणाम होतो? तज्ज्ञांनी सांगितलेल्या गोष्टी वाचून आश्चर्यचकित व्हाल

Women Health : मासिक पाळीच्या काळात त्वचेच्या आरोग्यावर खूप परिणाम होतो. या काळात त्वचेची काळजी कशी घ्यावी? असे का होते? त्वचेमध्ये कोणते बदल होतात? जाणून घ्या..

Women Health : महिलांनो.. प्रत्येक वयानुसार आपल्या शरीरात अनेक प्रकारचे बदल होतात, हे तर सर्वांनाच माहित आहे. परंतु मासिक पाळी दरम्यान देखील त्वचेमध्ये अनेक प्रकारचे बदल होत जातात. हे तुम्हाला माहित आहे का? मासिक पाळीच्या काळात त्वचेच्या आरोग्यावर खूप परिणाम होतो. एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अपराजिता लांबा यांनी याबाबत माहिती दिलीय. त्यांनी यावेळी मासिक पाळी दरम्यान त्वचेची काळजी कशी घ्यावी? असे का होते? त्वचेमध्ये कोणते बदल होतात? हे देखील सांगितलंय. 

मासिक पाळी दरम्यान त्वचेची काळजी कशी घ्यावी?

मासिक पाळीच्या दरम्यान त्वचेमध्ये अनेक प्रकारचे बदल होतात. महिलांमध्ये हे बदल इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स कमी झाल्यामुळे हे घडते. त्यामुळे या काळात त्वचेच्या आरोग्यावर खूप परिणाम होतो. महिलांच्या शरीरात दर महिन्याला हार्मोनल बदल होतात. हे मासिक पाळीच्या चक्रामुळे होते, जे पूर्णपणे नैसर्गिक आहे. मासिक पाळीच्या ३-५ दिवसांपासून ते ओव्हुलेशन आणि ओव्हुलेशननंतरच्या टप्प्यापर्यंत, हार्मोन्समध्ये बरेच बदल होतात, ज्यामुळे सूज येणे, मूड बदलणे यासारखी लक्षणे दिसतात. पण तुम्हाला माहीत आहे का की मासिक पाळीच्या काळात तुमच्या त्वचेत अनेक बदल होतात. या काळात हार्मोन्समध्ये होणारे बदल त्वचेवरही परिणाम करतात. 

मासिक पाळीत चार टप्पे असतात

डॉ. लांबा यांनी सांगितले की, मासिक पाळीत चार टप्पे असतात. फॉलिक्युलर टप्पा पहिल्या दिवसापासून तेराव्या दिवसापर्यंत (1-13 दिवस) होतो. 14-16 व्या दिवसापासून ओव्हुलेशन टप्पा, 17-24 व्या दिवसापासून ल्यूटियल टप्पा आणि नंतर मासिक पाळी. या टप्प्यांमध्ये हार्मोनल चढउतारांमुळे, कधी आपली त्वचा चमकणारी दिसते तर कधी कोरडी आणि निर्जीव दिसते. फॉलिक्युलर फेज- पहिल्या 13 दिवसांना फॉलिक्युलर फेज म्हणतात. या काळात इस्ट्रोजेन हार्मोनमध्ये हळूहळू वाढ होते. त्यामुळे या दिवसांमध्ये त्वचा सुरुवातीला खूप कोरडी वाटते, कारण इस्ट्रोजन हार्मोन कमी प्रमाणात बाहेर पडतो. पण हळूहळू त्याची पातळी वाढू लागते आणि त्वचा कमी कोरडी दिसू लागते.

ओव्हुलेशन फेज - ओव्हुलेशन सायकलच्या 14-16 व्या दिवसाच्या दरम्यान होते, म्हणजेच अंडाशय अंडी सोडते. या काळात, गर्भाशय गर्भधारणेसाठी तयार होते आणि इस्ट्रोजेनची पातळी त्याच्या उच्च पातळीवर असते. त्यामुळे या दिवसात त्वचा चमकदार आणि मुलायम दिसते. यावेळी, त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या कमी सामान्य आहे. त्यामुळे यावेळी जर तुम्ही लक्ष दिले असेल तर चेहऱ्यावर एक अप्रतिम चमक दिसून येईल.

ल्युटल फेज- ल्युटल फेजमध्ये इस्ट्रोजेनची पातळी कमी होऊ लागते आणि प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढू लागते. या हार्मोनमुळे त्वचेचा तेलकटपणा वाढू लागतो. त्यामुळे मुरुमे, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स यासारख्या समस्या उद्भवू लागतात.

मासिक पाळी - या टप्प्यात मासिक पाळी सुरू होते, जी 3-5 दिवस टिकते. यावेळी प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन या दोन्हींची पातळी कमी होऊ लागते. या काळात त्वचा बऱ्यापैकी निस्तेज दिसते. यावेळी त्वचेची संवेदनशीलताही वाढते. त्यामुळे पुरळ आणि लालसरपणाची समस्या असू शकते.

त्वचेची काळजी कशी घ्यावी?

मासिक पाळीचे टप्पे समजून घेऊन त्यानुसार त्वचेची काळजी घेता येते.

फॉलिक्युलर फेज- यावेळी जर तुमची त्वचा इस्ट्रोजेनच्या कमतरतेमुळे कोरडी आणि निर्जीव दिसत असेल तर हायलुरोनिक ऍसिड वापरा. यामुळे त्वचेला खूप मदत होते. तसेच, सौम्य क्लिन्झर वापरा.

ओव्हुलेशन फेज- यावेळी त्वचेचे आरोग्य पूर्णपणे चांगले राहते. म्हणून, यावेळी आपण आपल्या सामान्य त्वचेच्या काळजीचे पालन केले पाहिजे. त्यामुळे सौम्य क्लिन्झर, कोलेजन बूस्टिंग मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरा.

ल्युटेल फेज- यावेळी त्वचा बऱ्यापैकी तेलकट होते. त्यामुळे या वेळी सॅलिसिलिक ॲसिडसारख्या तेल कमी करणाऱ्या उत्पादनांचा वापर करा. त्वचेला एक्सफोलिएट आणि मॉइश्चरायझ करा.

मासिक पाळी- या काळात पुरळ येण्याची शक्यता असते. त्यामुळे सॅलिसिलिक ॲसिड, टी ट्री ऑइल इत्यादींचा वापर करा. तसेच, तुमच्या त्वचेला भरपूर मॉच्शराईज्झ करा. 

हेही वाचा>>>

Health : सावधान! हे 3 'सायलेंट-किलर' आजार ठरू शकतात जीवघेणे, तुम्हाला तर लक्षणं नाही ना?

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Astronaut Sunita Williams : भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स अंतराळात का अडकून पडल्या? आतापर्यंत काय काय घडलं अन् परतीचा प्रवास कसा असणार??
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स अंतराळात का अडकून पडल्या? आतापर्यंत काय काय घडलं अन् परतीचा प्रवास कसा असणार??
उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी 71 हजारांची वर्गणी पाठवा, नाहीतर अधिवेशनात तुमचा... 'त्या' फोनमुळे तहसीलदार टेन्शनमध्ये
उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी 71 हजारांची वर्गणी पाठवा, नाहीतर अधिवेशनात तुमचा... 'त्या' फोनमुळे तहसीलदार टेन्शनमध्ये
Vidhan Parishad Election 2024: मिलिंद नार्वेकरांमुळे काँग्रेसचा उमेदवार धोक्यात, पुन्हा घात होणार? शिंदे गटाच्या आमदाराचं सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
मिलिंद नार्वेकरांमुळे काँग्रेसचा उमेदवार धोक्यात, पुन्हा घात होणार? शिंदे गटाच्या आमदाराच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
Pimpari News : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
मोठी बातमी : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Assembly Session : दानवेंंचं निलंबन ते मुंबईतील पाणीपुरवठा; विधानसभेत काय काय घडलं?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट : 03 July 2024Ambadas Danve Mumbai : विधान परिषदेतील आक्षेपार्ह वक्तव्यावरून अंबादास दानवेंची दिलगीरीCM Eknath Shinde On Rahul Gandhi : हिंदू संयमी; योग्यवेळी राहुल गांधींना उत्तर मिळेल - एकनाथ शिंदे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Astronaut Sunita Williams : भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स अंतराळात का अडकून पडल्या? आतापर्यंत काय काय घडलं अन् परतीचा प्रवास कसा असणार??
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स अंतराळात का अडकून पडल्या? आतापर्यंत काय काय घडलं अन् परतीचा प्रवास कसा असणार??
उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी 71 हजारांची वर्गणी पाठवा, नाहीतर अधिवेशनात तुमचा... 'त्या' फोनमुळे तहसीलदार टेन्शनमध्ये
उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी 71 हजारांची वर्गणी पाठवा, नाहीतर अधिवेशनात तुमचा... 'त्या' फोनमुळे तहसीलदार टेन्शनमध्ये
Vidhan Parishad Election 2024: मिलिंद नार्वेकरांमुळे काँग्रेसचा उमेदवार धोक्यात, पुन्हा घात होणार? शिंदे गटाच्या आमदाराचं सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
मिलिंद नार्वेकरांमुळे काँग्रेसचा उमेदवार धोक्यात, पुन्हा घात होणार? शिंदे गटाच्या आमदाराच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
Pimpari News : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
मोठी बातमी : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
''ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेच्याच माणसांचा''; ओबीसी आंदोलक वाघमारेंचा गंभीर आरोप, दिलं 'हे' कारण
''ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेच्याच माणसांचा''; ओबीसी आंदोलक वाघमारेंचा गंभीर आरोप, दिलं 'हे' कारण
साप वनात चावत नाही तर तुमच्या घरी येऊन चावतो, विश्वजीत कदमांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर
साप वनात चावत नाही तर तुमच्या घरी येऊन चावतो, विश्वजीत कदमांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर
Mirzapur 3 Relaese Date Time OTT Platform : 'मिर्झापूर -3' साठी काही तासांची प्रतीक्षा, किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम? जाणून घ्या सगळं काही...
'मिर्झापूर -3' साठी काही तासांची प्रतीक्षा, किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम? जाणून घ्या सगळं काही...
Telly Masala : मिर्झापूर-3  किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम ते  'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
मिर्झापूर-3 किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम ते 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Embed widget