Women Health: काय सांगता! मासिक पाळीनंतरही वाढू शकते उंची? 'हे' घरगुती उपाय करा, आयुर्वेदिक डॉक्टर सांगतात...
Women Health: मासिक पाळीनंतर मुलींची उंची वाढत नाही असे लोकांचे मत असते. पण आयुर्वेदाने हे मान्य केलेले नाही. जाणून घेऊया मासिक पाळीनंतर उंची कशी वाढू शकते?
Women Health: असे म्हणतात, उंचीमुळे लोकांच्या व्यक्तिमत्त्वात मोलाची भर पडू शकते. उंची चांगली असल्याने लोकांमध्येही विश्वास वाढतो. पण अनेकदा मासिक पाळी सुरू झाल्यानंतर मुलींची उंची वाढत नाही, असे म्हटले जाते. यात काही तथ्य आहे का? तर आयुर्वेद यावर विश्वास ठेवत नाही. आयुर्वेद सांगते की, होय.. मासिक पाळीनंतरही मुलींची उंची वाढू शकते. परंतु हे मुलीच्या वयावर आणि तिची वाढ किती वेगाने होते यावर अवलंबून असते. साधारणपणे मासिक पाळी सुरू झाल्यानंतरही मुलींची उंची 2-3 वर्षे वाढू शकते. आयुर्वेदिक डॉक्टरांनी याबाबत खुलासा केला आहे.
आयुर्वेदिक डॉक्टरांचे मत काय आहे?
एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार आयुर्वेदिक डॉक्टर उपासना वोहरा यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत, त्यांच्या मते, मासिक पाळीनंतरही मुलींची उंची वाढू शकते. त्या सांगतात की, आयुर्वेदात उंची वाढीबाबत असे सांगितले आहे की, तरुणींची उंची साधारण 20 ते 21 वर्षांपर्यंत वाढू शकते. यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.
आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मते 'या' टिप्सच्या मदतीने उंची वाढवू शकता
चांगला आहार- सकस आहार घेऊन उंची वाढवता येते. तुम्ही तुमच्या आहारात ताज्या भाज्या, फळे आणि दुग्धजन्य पदार्थ समाविष्ट करू शकता. हे खाल्ल्याने उंची वाढीवर कोणताही परिणाम होत नाही आणि मासिक पाळीनंतरही तुमची उंची वाढलेली दिसेल.
स्ट्रेचिंग करा- व्यायाम करून, विशेषतः दररोज सूर्यनमस्कार आणि बॉडी स्ट्रेचिंग व्यायाम करून उंची वाढवता येते. तुम्ही बॅक साइड, एक साइड, वर आणि डाउन असे हलके व्यायाम करू शकता.
पपई खा - पपईमध्ये ग्रोथ एन्झाईम्स असतात, जे शरीरात ग्रोथ हार्मोन्स सोडतात. त्यामुळे तुम्ही रोज पपई खाऊ शकता. पपई शरीरातील विषारी घटक देखील काढून टाकते.
चुना खा - उंची वाढवण्यासाठी शरीरात कॅल्शियमचे सेवन करणे देखील आवश्यक आहे, कॅल्शियम हाडांच्या वाढीस मदत करते. यामध्ये चुना तुम्हाला मदत करू शकतो पण तुम्हाला रोज चुना खाण्याची गरज नाही. चुना खाण्याचा योग्य मार्ग म्हणजे तो 2 चमचे दह्यात चिमूटभर मिसळून खाणे. तुम्हाला ते 2 महिने सतत खावे लागेल, त्यानंतर ते खाणे बंद करा.
चांगली झोप - तुम्हाला पुरेशी झोप (7-9 तास) घेणे देखील आवश्यक आहे कारण रात्री वाढीचे हार्मोन्स जास्त सक्रिय असतात.
हेही वाचा>>>
Women Health: मासिक पाळीमध्ये Menstrual कप वापरणं कितपत सुरक्षित? यामुळे संसर्ग होऊ शकतो का? जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )