Women Health : 'महिलांनो..इतरांची काळजी घेता, पण स्वत:च्या आरोग्याचं काय?' वयाच्या चाळीशीनंतर 'अशी' काळजी घ्या, म्हातारपणा राहील दूर
Women Health : ज्या महिला दिवसभर घरातील कामं करताना आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. ज्या महिलांना वृद्धापकाळाचा त्रास होऊ नये, तर हा लेख फक्त तुमच्यासाठी आहे.
Women Health : आपण अनेकदा पाहतो. आपल्या घरातील महिला या स्वत:पेक्षा इतरांची काळजी घेण्यात गुंतलेल्या असतात. आयुष्यातील जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच नसतो. महिला कित्येक वेळेस आपल्या आरोग्याबाबत बेफिकीर असल्याचं दिसून येतं. पण तुम्ही हे लक्षात घेणं गरजेच आहे की, वाढत्या वयासोबत येणाऱ्या म्हातारपणाकडेही तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही. जर तुम्हालाही असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही गोष्टींची काळजी घेऊ शकता. या लेखात आम्ही तुमच्यासोबत वयाच्या 40 वर्षांनंतर अवलंबल्या जाणाऱ्या काही टिप्स शेअर करत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही काळजी घेऊ शकता..
आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे
वाढत्या वयाबरोबर आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषत: ज्या महिला दिवसभर घरातील कामे करताना आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. तुम्हालाही दीर्घायुष्य हवं असेल आणि वृद्धापकाळाचा त्रास होऊ नये, तर हा लेख फक्त तुमच्यासाठी आहे. येथे आम्ही तुम्हाला 40 वर्षांनंतर आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे सांगणार आहोत.
आहारात दुधाचा समावेश करा
तुम्हाला दूध प्यायला आवडत असो किंवा नसो, त्याच्या सेवनाने हाडांची घनता मजबूत होऊ शकते. दुधाशी मैत्री करून आणि त्याचा आहारात समावेश करून तुम्ही तुमची हाडे दीर्घायुष्यासाठी मजबूत ठेवू शकता.
व्यायाम
तुम्ही घरच्या कामात कितीही व्यस्त असलात तरी योग्य व्यायामासाठी थोडा वेळ काढणे फार महत्वाचे आहे. तुमच्या वेळापत्रकानुसार तुम्ही यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी कोणतीही वेळ निवडू शकता. यासाठी तुम्ही जिमचे सबस्क्रिप्शन घेतलेच पाहिजे असे नाही, तुम्ही योगा आणि चालण्याच्या माध्यमातून वृद्धापकाळातही स्वत:ला निरोगी ठेवू शकता.
फळे आणि भाज्या खा
ऋतूनुसार येणाऱ्या भाज्यांचा आहारात समावेश केलाच पाहिजे, असे ज्येष्ठांनी नेहमीच सांगितले आहे. अशात, जर तुम्ही ते खात नसाल तर ही सवय बदलणे खूप महत्वाचे आहे. याच्या मदतीने शरीरातील पोषक तत्वांची पुरेशी काळजी घेतली जाऊ शकते.
आहारात प्रोटीनची काळजी घ्या
निरोगी आयुष्यासाठी आहारातील प्रथिनांच्या गरजांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. शरीरातील त्याची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही दररोज एक वाटी दुग्धजन्य पदार्थ आणि कोरड्या फळांचा आहारात समावेश करू शकता.
हेही वाचा>>>
Health : सावधान! हे 3 'सायलेंट-किलर' आजार ठरू शकतात जीवघेणे, तुम्हाला तर लक्षणं नाही ना?
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )