एक्स्प्लोर

Women Health : जन्म बाईचा..! प्रसूतीनंतर तुम्हालाही तणावाचा सामना करावा लागतोय? घाबरू नका, 'अशा' प्रकारे सामोरं जा..

Women Health : स्त्रीच्या प्रसुतीनंतर Postpartum Depression ही यापैकी एक समस्या आहे, जी कधी कधी गंभीर स्वरूप धारण करू शकते. त्याला कसे सामोरे जायचे ते जाणून घ्या

Women Health : मुलाला 9 महिने पोटात वाढविणारी आई... जेव्हा तिच्या बाळाला जन्म देते अन् ते बाळ तिच्या हातात येते तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा असतो. एका स्त्रीसाठी आई होणे ही निःसंशयपणे आनंददायी अनुभूती असते, पण तुम्हाला माहित आहे का? मुलाच्या जन्मानंतर त्यांना अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. स्त्रीच्या प्रसुतीनंतर Postpartum Depression ही यापैकी एक समस्या आहे, जी कधी कधी गंभीर स्वरूप धारण करू शकते. त्याला कसे सामोरे जायचे ते जाणून घ्या

बाळाच्या जन्मानंतरही अनेक शारीरिक आणि मानसिक बदल

तुम्हाला हे माहिती आहे का? की दर पाचपैकी एक महिलेला गर्भधारणेदरम्यान किंवा प्रसूतीनंतर कोणत्या ना कोणत्या मानसिक आरोग्याशी संबंधित स्थितीतून जावे लागते. स्त्रीला केवळ गर्भधारणेदरम्यानच नाही तर बाळाच्या जन्मानंतरही अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होतात. अशा परिस्थितीत ती अनेकवेळा आत्महत्येसारखे धोकादायक पाऊलही उचलते. त्यामुळे प्रसूतीनंतर महिलांमध्ये होणाऱ्या या मानसिक बदलांची काळजी घेणे आणि त्यांना बरे होण्यास मदत करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या या समस्येपासून मुक्त होऊ शकतील.

प्रसूतीनंतरच्या मानसिक आरोग्याच्या स्थितीं अशाप्रकारे असू शकते

चिंता
नैराश्य
ऑब्सेसिव कंपल्सिव डिसऑर्डर
बायपोलर डिसऑर्डर
पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डर
साइकोसिस

स्त्रीमध्ये हार्मोनल बदलांमुळे विविध बदल होतात

मुलाच्या जन्मानंतर प्रत्येक आईचा आनंद गगनात मावेनासा असतोच. मात्र प्रसूतीनंतर स्त्रीमध्ये अनेक प्रकारचे शारीरिक आणि मानसिक बदल होतात. त्यांच्या शरीरात होत असलेल्या विविध हार्मोनल बदलांमुळे त्यांच्या मूडमध्ये विविध प्रकारचे बदल पाहायला मिळतात. शिवाय, एक स्त्री सतत जबाबदारी, कामाचा ताण, शारीरिक कमकुवतपणा आणि खूप अदृश्य मानसिक तणावातून जात असते. याचा परिणाम त्यांच्या प्रसूतीनंतरच्या आरोग्यावर होतो. प्रसूतीनंतरच्या मानसिक आरोग्याशी तडजोड केल्यामुळे, अनेक प्रकारची लक्षणे जाणवू शकतात, जसे की -

मूडी असणे
अस्वस्थ होणे
दोषी आणि लाज वाटणे
कमी किंवा जास्त खाणे
कमी किंवा जास्त झोप
थकवा
कोणत्याही गोष्टीवरून रडणे
कशातही रस नसणे
नेहमी नकारात्मक विचार येणे
अतिविचार
आत्महत्येचे विचार येणे

पोस्टपर्टम डिप्रेशनला कसे सामोरे जाल?

आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार अशा महिलांनी स्वत:च्या आरोग्यासाठी पावले उचलली पाहिजेत, जेणेकरून त्या स्वत:सोबतच त्यांच्या मुलांचेही भविष्य सुरक्षित करू शकतील. अशा परिस्थितीत महिलांनी काय करावे ते जाणून घेऊया-

-तुमच्या भावना तुमच्या आईला किंवा तुमच्या जवळच्या एखाद्या अनुभवी व्यक्तीसोबत शेअर करा. अशा परिस्थितींना तोंड देण्यासाठी ती तुम्हाला अनुभवी मार्ग देऊ शकते.

-जोडीदाराची मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका. घरातील काम असो किंवा मुलांचे काम असो, स्वतःची काळजी लक्षात घेऊन जोडीदाराची आवश्यक मदत घ्या.

-केअरटेकरची मदत घ्या. किंवा घरातील इतर कामासाठी एखाद्या गृहिणीची मदत घ्या, जेणेकरून तुमचा कामाचा ताण हलका होईल. यावेळी तुम्ही फक्त स्वतःचा आणि तुमच्या मुलाचा विचार करू शकाल.

-जुन्या जवळच्या मित्रांशी बोला. परंतु तुम्हाला चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील अशा लोकांशीच बोला. तुम्हाला हसवणाऱ्या मित्रांशी बोला. जे काही काळासाठी तुम्हाला तुमच्या बालपणात घेऊन जातील.

-जेव्हा काहीही परिणामकारक दिसत नाही आणि परिस्थितीत कोणतीही सुधारणा होत नाही, तेव्हा विलंब न करता मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

-या इतर पद्धतींचा अवलंब करून तुम्ही तुमच्या एका आईचे मानसिक तसेच शारिरीक आरोग्य सुधारू शकता -

निसर्गाशी कनेक्ट व्हा
ध्यान करणे
फेरफटका मारणे
आंघोळ करा 
एखादा लेख लिहा
प्रेरणादायी वाचा

हेही वाचा>>>

Women Health : महिलांनो.. थायरॉईडच्या समस्याचं प्रमाण वाढतंय, 'या' लक्षणांवरून ओळखा, अशी घ्या काळजी

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget