Domestic Violence : पत्नीने आपले कर्तव्य बजावले नाही तर घरगुती हिंसा योग्य? पुरूषांसह काही महिलांनाही मान्य, NFHS आकडेवारी, निष्कर्ष सांगतो...
Domestic Violence : निष्कर्षातून आलेली धक्कादायक बाब म्हणजे, पत्नीने पतीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यास ती शारीरिक अत्याचारास पात्र आहे, असे काही भारतीय नागरिकांना वाटले.
Domestic Violence : नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NFHS) मधील आकडेवारी दर्शवते की , कर्नाटकातील बहुसंख्य पुरुष तसेच स्त्रिया असे मानतात की, पत्नींनी त्यांची कर्तव्ये पार पाडली नाहीत, तर त्यांच्यावर घरघुती हिंसा करणे योग्य आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, जवळजवळ निम्म्या भारतीय पुरुष आणि स्त्रियांचे विचार याबाबत सारखे आहेत. कर्नाटकात, यामध्ये 76.9 टक्के महिला आणि 81.9 टक्के पुरुषांचा समावेश आहे. तर देशभरात, 45 टक्के महिला आणि 44 टक्के पुरुष या गोष्टीशी सहमत होते.
पत्नीला मारणे अगदी सामान्य बाब?
डेटासेटच्या निष्कर्षामध्ये देखील नागरिकांनी सहमती दर्शवली की, पत्नीला मारणे अगदी सामान्य बाब आहे. दरम्यान, डेटासेटच्या माध्यमातून भारतातील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची लोकसंख्या, आरोग्य आणि पोषण पॅरामीटर्सशी संबंधित माहिती देण्यात येते. याच्या निष्कर्षातून आलेली धक्कादायक बाब म्हणजे, पत्नीने पतीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यास ती शारीरिक अत्याचारास पात्र आहे असे काही भारतीय नागरिकांना वाटले. तर सुमारे 11 टक्के महिला आणि 9.7 टक्के पुरुष नागरिकांना असे वाटते की लैंगिक संबंधास नकार दिल्याने पत्नीला मारहाण केली पाहिजे.
निष्कर्षातून वेगवेगळे मत समोर
महिलांवरील घरघुती हिंसाचारासाठी 32 टक्के स्त्रिया, 31 टक्के पुरुषांना सासरचा अनादर हे प्राथमिक कारण आहे असे वाटले. तर घर आणि मुलांकडे पत्नीचे दुर्लक्ष होते असे 28 टक्के महिला आणि 22 टक्के पुरुषांना वाटले. दुसरे कारण म्हणजे पतीशी वाद घालणे, तर 22 टक्के स्त्रिया आणि 20 टक्के पुरुषांचा असा विश्वास होता की, असे करण्यासाठी स्त्रीला मारहाण करणे आवश्यक आहे. 20 टक्के स्त्रिया आणि 23 टक्के पुरुषांनी घरगुती कामात निष्ठा नसल्याचे सांगितले.
पत्नीला-मारहाण करण्याचे प्रमाण वाढले?
सध्याचा ट्रेंड असं दर्शवितो की, पुरुषांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बिघडला आहे. NFHS-4 डेटासेटमध्ये सूचीबद्ध केलेल्या सात कारणांपैकी कोणत्याही कारणासाठी पत्नीला-मारहाण करण्याचे प्रमाण वाढले आहे, निष्कर्ष हे देखील सूचित करतात की, तेलंगणा (83.8 टक्के महिला आणि 70.8 टक्के पुरुष), आंध्र प्रदेश (83.6 टक्के महिला आणि 66.5 टक्के पुरुष), आणि तामिळनाडू (78.3 टक्के महिला आणि 56.2 टक्के पुरुष) यांचा समावेश आहे. तसेच दक्षिण भारतातील अधिक नागरिकांचा असा विश्वास देखील आहे,
शहरी भागात महिलांवर कमी शारीरिक हिंसा
त्याचप्रमाणे, ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात कमी शारीरिक हिंसाचार होते. 5 वर्षांपेक्षा कमी शालेय शिक्षण घेतलेल्या महिलांमध्ये 53 टक्के आणि 5 वर्षांपेक्षा कमी शालेय शिक्षण घेतलेल्या पुरुषांमध्ये 51 टक्क्यांवरून महिलांमध्ये हे प्रमाण 38 टक्क्यांपर्यंत घसरल्याचे निष्कर्षांवरून दिसून आले आहे. तसेच 12 किंवा त्याहून अधिक वर्षे शालेय शिक्षण घेतलेल्या पुरुषांमध्ये 39 टक्के प्रमाण असल्याचे दिसून आले.
निष्कर्षांच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह
सेंटर फॉर सोशल रिसर्चच्या रंजना कुमारी म्हणाल्या की, हे निष्कर्ष समाजात स्त्रियांवर अत्याचार करणे किती सामान्य आहे हे दर्शविते, परंतु त्यांनी अशा निष्कर्षांच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "समस्या ही आहे की समाजाला नियम म्हणून हिंसा मान्य आहे, डेटा संकलनाची पद्धत संशयास्पद आहे. महिलांना घरगुती हिंसाचार कायद्याबद्दल माहिती हवी” कुमारी म्हणाल्या.