Women Health : बाळा गाऊ कशी अंगाई.. 'वर्किंग मॉम्स' चं मुलांकडे दुर्लक्ष होतंय? ऑफिस, घर, मुलं यांच्यात कसा राखाल समतोल?
Women Health : ऑफिस आणि घराच्या गडबडीत मुलांकडे दुर्लक्ष होत आहे का? काम करणाऱ्या मातांनी 'अशा' प्रकारे मनोबल वाढवले पाहिजे.
Women Health : आजकाल महिलाही चूल-मूल या गोष्टींमध्ये फारशा न अडकता पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून आपलं करिअर घडवत आहेत. मुलांच्या भविष्याची जबाबदारी ही केवळ पुरूषावरच नसून दोघांची आहे या उद्देशाने घरातील स्त्री ऑफिस, घर, मुलांचे संगोपन अशा विविध जबाबदाऱ्या एकत्रितपणे पार पाडत असते. तसं ऑफिस, घर आणि मुलं यांच्यात समतोल राखणं हे सोपं काम नाही, ऑफिसच्या गडबडीत घर आणि मुलांकडे दुर्लक्ष तर होत नाही ना? असा प्रश्न सतत वर्किंग मॉमच्या मनात येत राहतो. पण जर तुमच्याकडे योग्य प्लॅन असेल तर तुमचं आयुष्य बऱ्याच अंशी सोपं होऊ शकतं. येथे आम्ही तुम्हाला सांगत आहोत की तुम्ही व्यस्त असतानाही तुमच्या मुलाची योग्य काळजी कशी घेऊ शकता?
दिनचर्या पाळा
जर तुम्ही तुमचा वेळ व्यवस्थित मॅनेज करायला शिकलात, तर तुम्ही प्रत्येक कामासाठी वेळ काढू शकता. यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वतःसाठी आणि आपल्या मुलांसाठी एक दिनचर्या बनवणे आणि त्याचे पालन करणे.
स्वत:ची काळजी घ्याल, तरच इतरांचीही काळजी घ्याल
जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घ्याल, तेव्हाच तुम्ही तुमच्या कुटुंबाची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकाल. यासाठी तुम्ही तुमचा व्यायाम, ध्यान, छंद इत्यादींसाठी वेळ काढणे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे तुम्ही आनंदी राहू शकाल आणि मुलांशी शांततेने वागू शकाल.
स्वतःला सुपर मॉम समजू नका!
अनेकदा असं होतं की घरातील महिला एखाद्या सुपर मॉम प्रमाणे सर्व जबाबदाऱ्या एकत्रितपणे पार पाडण्याचा प्रयत्न करते, तिला वाटते कोणाचीही मदत घेऊ नये. जर तुमच्या स्वतःकडून मोठ्या अपेक्षा असतील तर ते तुमच्यासाठी अधिक समस्या निर्माण करू शकते. तुम्ही सुपर मॉम बनण्याचा प्रयत्न न करता प्रत्येक काम तुमच्या क्षमतेनुसार हाताळा हेच बरे होईल.
सपोर्ट सिस्टीम तयार करा
हे आवश्यक नाही की तुम्ही सर्व काही स्वतः कराल किंवा ते करू शकत नसल्याची खंत मनात ठेवाल, अशावेळी तुम्ही लोकांची मदत घ्यायला शिकलात तर बरं होईल. तुम्ही व्यस्त असाल तर मित्र आणि कुटुंबीयांची मदत घ्या. आवश्यक असल्यास, ऑफिस मॅनेजरशी बोला किंवा डेकेअरची व्यवस्था करा.
व्यवस्थापन शिका
मुलं तुमचं भविष्य आहेत, पण तुमचे भविष्य घडवायचे असेल तर ऑफिसची कामंही करणं आवश्यक आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकासाठी प्राधान्याने नियोजन केले पाहिजे, चित्रपटासाठी वेळ काढा, एकत्र खेळा, किमान 20 मिनिटे मनमोकळेपणाने बोला आणि प्रत्येक कामासाठी एक डायरी ठेवा. कोणते काम कधी पूर्ण करायचे आहे याची दर महिन्याला यादी तयार करा. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक काम शांततेने पूर्ण करू शकाल.
मुलांना शिकवा
लहानपणापासून मुलांना स्वच्छता, वस्तू योग्य ठिकाणी ठेवणे, स्वच्छता, लोकांना मदत करणे इत्यादी प्रशिक्षण द्या. त्यांना हे देखील शिकवा की जर काही महत्वाची बाब किंवा कोणतीही समस्या किंवा समस्या शेअर करायची असेल, अशावेळी तुम्ही जवळपास नसाल तर त्यांनी संदेश पाठवून किंवा पत्र लिहून त्यांचे मत तुमच्यापर्यंत पोहोचवावे. अशा प्रकारे, तुमच्यामध्ये संवाद कायम राहील.
दिवसाची सुरुवात हसतमुखाने करा
जर तुम्ही सकाळी मुलांशी हसत हसत बोललात तर त्यांच्या दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने होईल आणि तुम्ही दोघेही दिवसभर आनंदी राहाल. सकाळी एकत्र तयार होऊन रागावण्यापेक्षा किंवा शिव्या घालण्याऐवजी हसत दिवस घालवणे चांगले. अशाप्रकारे, तुम्ही तुमच्या मुलांची चांगल्या नित्यक्रमाने काळजी घेऊ शकाल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Women Health : ''अगं..गर्भधारणा टाळण्यासाठी वारंवार गोळ्या घेतेस? जरा थांब, ही बातमी वाच..'' 'हे' आजार होऊ शकतात, डॉक्टर म्हणतात...