Winter Travel : हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत स्वर्गसुख अनुभवायचंय? भारतीय रेल्वेचे नोव्हेंबर-डिसेंबर टूर पॅकेज जारी, कमी बजेटमध्ये अशी करा बुकींग
Winter Travel : IRCTC कडून हिवाळी हंगामासाठी टूर पॅकेज आधीच जारी करण्यात आले आहेत. जर तुम्हाला नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये कुठेतरी जायचे असेल तर तुम्ही आधीच टूर पॅकेज बुक करू शकता.
Winter Travel : मान्सून आता परतीच्या वाटेवर आहे, ज्यामुळे अनेक ठिकाणी आता गुलाबी थंडी जाणवू लागली आहे, हिवाळ्यात विविध ठिकाणी फिरण्याची मजा काही औरच असते. अशावेळी तुम्हालाही हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत स्वर्गसुख अनुभवायचंय? तर आज आम्ही तुम्हाला भारतीय रेल्वेच्या (IRCTC) नोव्हेंबर-डिसेंबर टूर पॅकेजबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. अनेकदा विविध टूर पॅकेजसह सहलीचे नियोजन करताना प्रवाशांकडे अनेक पर्याय असतात. ते त्यांच्या सोयीनुसार लांब किंवा लहान टूर पॅकेजेस निवडू शकतात.
भारतीय रेल्वे टूर पॅकेजमधून प्रवास करण्याचा विचार करताय?
बरेचदा लोक लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी पॅकेजने प्रवास करणे पसंत करतात. कारण यामध्ये त्यांना रोजच्या प्रवासासाठी वेगळे नियोजन करावे लागत नाही. प्रवासाची संपूर्ण तयारी टूर ऑपरेटरकडून केली जाते. यासोबतच प्रवाशांना त्यांच्या दैनंदिन प्रवासाच्या योजनांचीही माहिती मिळू शकते. कारण प्रवासादरम्यान तुम्हाला कुठे नेले जाईल याची संपूर्ण माहिती दिलेली असते. जर तुम्ही भारतीय रेल्वे टूर पॅकेजमधून प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही नोव्हेंबर-डिसेंबरसाठी टूर पॅकेज बुक करू शकता.
नोव्हेंबरपासून सुरू होणारे टूर पॅकेजेस
गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग आणि श्रीनगर टूर पॅकेजेस – 7 नोव्हेंबरपासून तिकिटे बुक करता येतील.
लखनौ आणि अयोध्या टूर पॅकेज- 8 नोव्हेंबरपासून तिकीट बुक करता येईल.
अयोध्या, पोखरा, मुक्तिनाथ आणि काठमांडू टूर पॅकेज - 11 नोव्हेंबरपासून प्रवास सुरू होईल.
नैनिताल, अल्मोडा, मुक्तेश्वर आणि दिल्ली टूर पॅकेज- हा प्रवास 12 नोव्हेंबरपासून सुरू होईल.
दार्जिलिंग, गंगटोक आणि कालिम्पाँग टूर पॅकेज - तिकीट 16 नोव्हेंबरपासून बुक करता येईल.
आग्रा, दिल्ली आणि जयपूर टूर पॅकेज- 20 नोव्हेंबरपासून टूर सुरू होईल.
गंगटोक, दार्जिलिंग आणि न्यू जलपाईगुडी टूर पॅकेज - 30 नोव्हेंबरपासून टूर सुरू होईल.
डिसेंबरपासून सुरू होणारे टूर पॅकेजेस
गुवाहाटी, शिलाँग, चेरापुंजी, मावलिनाँग आणि काझीरंगा टूर पॅकेजेस - टूर 3 डिसेंबरपासून सुरू होईल.
भुज, कच्छ, जामनगर आणि राजकोट टूर पॅकेज - 21 डिसेंबरपासून तिकिटे बुक करता येतील.
पुष्कर, रणथंबोर, कुंभलगड, जयपूर आणि उदयपूर टूर पॅकेजेस - तुम्ही 24 डिसेंबरपासून तिकिटे बुक करू शकता.
तिरुपती, मदुराई, रामेश्वरम, कन्याकुमारी आणि पुडुचेरी टूर पॅकेज - 23 डिसेंबरपासून तिकीट बुक केले जाऊ शकते.
वडोदरा, भावनगर, सोमनाथ, द्वारका आणि राजकोट टूर पॅकेज - तुम्ही 6 डिसेंबरपासून तिकिटे बुक करू शकता.
भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून तिकीट बुक करण्याची प्रक्रिया सोपी आहे.
टूर पॅकेजमध्ये सुविधा उपलब्ध
- या टूर पॅकेजच्या फीमध्ये तुम्हाला जेवणाची सुविधा मिळते.
- अनेक पॅकेजेसमध्ये तुम्हाला नाश्ता किंवा दुपारच्या जेवणासाठी वेगळे पैसे द्यावे लागतील.
- पॅकेजमध्ये प्रवास करण्यासाठी बस आणि कॅबची सुविधाही उपलब्ध आहे.
- त्यामुळे शहरात फिरण्यासाठी वेगळे वाहन बुक करावे लागणार नाही.
- अनेक पॅकेजमध्ये तुम्हाला फ्लाइटने प्रवास करण्याचीही संधी दिली जाते.
- तुमचे राउंड ट्रिप तिकीट टूर ऑपरेटरद्वारे पॅकेज फीमध्ये समाविष्ट केले जाते.
- हॉटेल सुविधांचाही पॅकेज फीमध्ये समावेश आहे.
हेही वाचा>>>
Travel : सोमनाथ मंदिर..स्टॅच्यू ऑफ युनिटी..गुजरात फिरणं तुमचंही राहून गेलंय? भारतीय रेल्वेकडून एकाच वेळी अनेक ठिकाणं फिरायची संधी!
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )