Winter Skin Care Tips : थंडीत अति गरम पाण्याने आंघोळ करताय? त्वचा आणि टाचांना तडे जाऊ शकतात; जाणून घ्या कसे टाळाल?
Winter Skin Care Tips : थंडीच्या दिवसांत जेव्हा हवा जास्त कोरडी असते तेव्हा ही समस्या आणखी गंभीर होऊ शकते. यामध्ये आपल्या टाचांवर लगेच परिणाम होतो
![Winter Skin Care Tips : थंडीत अति गरम पाण्याने आंघोळ करताय? त्वचा आणि टाचांना तडे जाऊ शकतात; जाणून घ्या कसे टाळाल? Winter Skin Care Tips skin and heels start cracking due to use of too hot water know how to avoid it marathi news Winter Skin Care Tips : थंडीत अति गरम पाण्याने आंघोळ करताय? त्वचा आणि टाचांना तडे जाऊ शकतात; जाणून घ्या कसे टाळाल?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/02/17437c98826845af07b8a82504fca56c1706845516181358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Winter Skin Care Tips : थंडीच्या दिवसांत (Winter Season) गरम पाण्याने आंघोळ करणं यासारखा सुखद अनुभव नसतो. पण, असं असलं तरी जास्त गरम पाण्याने आंघोळ करणं आपल्या त्वचेसाठीच (Skin Care Tips) तसेच पायांच्या टाचांसाठी फार नुकसानकारक ठरू शकतं. गरम पाणी आपल्या त्वचेवरील आवश्यक तेल काढून टाकतं. ज्यामुळे आपली त्वचा कोरडी पडू लागते आणि टाचांना भेगा पडतात. विशेषत: थंडीच्या दिवसांत जेव्हा हवा जास्त कोरडी असते तेव्हा ही समस्या आणखी गंभीर होऊ शकते. यामध्ये आपल्या टाचांवर लगेच परिणाम होतो कारण त्यांना सहज भेगा पडतात. या समस्येपासून जर सुटका हवी असेल तर तुम्ही हा उपाय निवडू शकता.
कोमट पाण्याचा वापर करा
आंघोळीसाठी तुम्ही जास्त गरम पाण्याऐवजी तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता. कोमट पाणी त्वचेसाठी चांगलं असते तसेच यामुळे तुमची त्वचा सौम्य राहते. यामुळे त्वचा कोमल राहते. याकरता तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करू शकता.
आंघोळीची वेळ ठरवा
गरजेपेक्षा जास्त काळ पाण्यात राहिल्याने देखील तुमच्या त्वचेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे तुमची त्वचेचा पोत निघून जातो. आंघोळीसाठी तुम्ही 5 ते 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ देऊ नका. तसेच, तुम्ही तुमच्या टाचांना जास्त घासू नका यामुळे देखील तुमच्या टाचांना भेगा पडू शकतात.
मॉईश्चरायझरचा वापर करा
त्वचेची कोमलता टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही मॉईश्चरायझरचा देखील वापर करू शकता. यासाठी आंघोळीनंतर तुमची त्वचा जेव्हा कोमल असते तेव्हा मॉईश्चरायझर लावा. असे केल्याने मॉईश्चरायझर तुमच्या शरीरात खोलवर मुरते. आणि तुमच्या त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करतं. यामुळे तुमची त्वचा सॉफ्टही राहते. यासाठी आंघोळीनंतर लगेच मॉईश्चरायझर लावा.
नैसर्गिक तेलाचा वापर करा
त्वचेची कोमलता टिकवून ठेवण्यासाठी खोबरेल तेलासारख्या नैसर्गिक तेलाचा वापर करा. हे तेल तुमच्या शरीरात खोलवर पोषण देते. तसेच, भेगा पडलेल्या त्वचेला भरून काढण्यास मदत होते.
भरपूर पाणी प्या
हायड्रेट राहिल्याने त्वचा चांगली आणि कोमल राहते. यासाठी दिवसातून साधारण 2 ते लीटर पाणी पिणं गरजेचं आहे. भरपूर पाणी प्यायल्याने आपली त्वचा, केस आणि शरीराला चांगलं पोषण मिळतं.
टाचांची काळजी घ्या
टाचांचा कोरडेपणा आणि भेगा पडलेल्या त्वचेपासून सुटका हवी असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या टाचांना मॉईश्चरायझर किंवा पेट्रोलियम जेलीचा वापर करा. मॉईश्चरायझर तुम्ही तुमच्या पायांना साधारण 5 ते 10 मिनिटं लावून ठेवल्याने खूप आराम मिळतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Health Tips : 'या' 7 लोकांच्या आहारात माशांचा समावेश नक्की असावा; हाडांच्या तंदुरुस्तीसह अनेक आजारही होतील दूर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)