एक्स्प्लोर

Winter Health Tips : थंडीत मन उदास राहते, हिवाळ्यातील नैराश्याने त्रस्त आहात का? वाचा यावरचा सोपा उपाय

Winter Health Tips : हिवाळ्यात बरेच दिवस सूर्यप्रकाश मिळत नाही. याचा थेट परिणाम आपल्या मनःस्थितीवर होतो.

Winter Health Tips : सर्दीमुळे शरीरातील आळस वाढतो. जेव्हा जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा त्याचा मूडवरही परिणाम होतो. काही लोकांमध्ये हे नैराश्याचे रूप घेऊ शकते. खरंतर, हिवाळ्यात बरेच दिवस सूर्यप्रकाश हवा तितका मिळत नाही. त्याचा थेट परिणाम आपल्या मनस्थितीवर होतो. या काळात अनेकांना चिडचिड होऊ लागते, त्यांना वाईट वाटते आणि प्रत्येक गोष्टीचा राग येऊ लागतो. याला हिवाळ्यातील उदासीनता म्हणतात. एका अभ्यासानुसार, सूर्यप्रकाशामुळे असे घडते, कारण त्याचा मूडशी खोल संबंध आहे. यामुळेच हिवाळ्याच्या दिवसांत जेव्हा सूर्यप्रकाश पडतो तेव्हा मूड चांगला होतो आणि जेव्हा सूर्यप्रकाश पडत नाही तेव्हा मूड खराब होतो. अशा परिस्थितीत हिवाळ्यातील नैराश्य म्हणजे काय आणि ते टाळण्याचे उपाय जाणून घेऊयात.

हिवाळ्यातील उदासीनता आणि त्याची कारणे

हिवाळ्यात आपल्या शरीराच्या बदल होणं सामान्य आहे. कमी सूर्यप्रकाशामुळे, सेरोटोनिनची पातळी कमी होते, ज्यामुळे हिवाळ्यात नैराश्याची समस्या उद्भवते. आपल्या देशात दरवर्षी सुमारे 1 कोटी लोक थंडीच्या दिवसांत नैराश्याला बळी पडतात. मेंदूला जागृत आणि सतर्क राहण्यासाठी सकाळचा सूर्यप्रकाश अत्यंत महत्त्वाचा असल्याचे तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

सकाळचा सूर्यप्रकाश महत्वाचा का आहे?

हिवाळ्यात सकाळचा सूर्यप्रकाश आवश्यक मानला जातो. याचं कारण असे की आपला मेंदू तणाव संप्रेरक कॉर्टिसॉल सोडतो, जो आपल्याला जागृत आणि सतर्क राहण्यास तयार करतो. सकाळचा सूर्यप्रकाश शरीराला निरोगी कॉर्टिसॉल प्रदान करतो आणि नैराश्य टाळतो. सकाळच्या सूर्यप्रकाशात आनंदी संप्रेरक डोपामाईन देखील सोडले जाते, ज्यामुळे मन प्रसन्न होते. यामुळे मनालाही चालना मिळते.

हिवाळ्यातील नैराश्य टाळण्यासाठी काय करावे?

हिवाळ्यात सकाळचा सूर्यप्रकाश आरोग्यासाठी चांगला मानला जातो. हे मानसिक आरोग्यासाठीही चांगले आहे. हिवाळ्यात सूर्यप्रकाश टाळण्यापेक्षा थोडा वेळ उन्हात घालवावा. मोकळ्या उन्हात बसल्याने शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता भासणार नाही आणि थकवा, चिडचिड, आळस आणि मूड बदलणे यांसारखे हंगामी भावनिक विकार टाळता येतात.

हे मानसिक आरोग्यासाठीही चांगले आहे. हिवाळ्यात सूर्यप्रकाश टाळण्यापेक्षा थोडा वेळ उन्हात घालवावा. यामुळे तुम्हाला नैराश्याची भावना उद्भवणार नाही तसेच तुमची चिडचिड न होता तुमचा मूड फ्रेश राहील.

महत्त्वाच्या बातम्या :

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

Health Tips : 'हायपरथर्मिया' म्हणजे काय? शरीरातील उष्णता मर्यादेपलीकडे वाढण्याचं कारण नेमकं काय? वाचा लक्षणं आणि उपाय

महत्त्वाच्या बातम्या

Ear Wax : कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
Corona Virus Update: आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
Health: IVF प्रक्रियेत तीन वेळा अपयश आले? मग आता पुढे काय? मूल होणार की नाही? डॉक्टरांची महत्त्वाची माहिती...
IVF प्रक्रियेत तीन वेळा अपयश आले? मग आता पुढे काय? मूल होणार की नाही? डॉक्टरांची महत्त्वाची माहिती...
Health Tips : दप्तरांच्या ओझ्याने शाळकरी मुलांना मणक्याच्या समस्या; वाचा लक्षणं आणि तज्ज्ञांचा सल्ला
दप्तरांच्या ओझ्याने शाळकरी मुलांना मणक्याच्या समस्या; वाचा लक्षणं आणि तज्ज्ञांचा सल्ला

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
Embed widget