Winter Health Tips : तुम्हाला इतरांपेक्षा जास्त थंडी जाणवतेय? 'कोल्ड इनटॉलरेंस' असण्याची शक्यता; वाचा लक्षणं आणि उपचार
Winter Health Tips : कमी रक्ताभिसरणामुळे, शरीराच्या सर्व भागांमध्ये रक्त योग्य प्रमाणात पोहोचत नाही. अशा वेळी तुम्हाला थंडी जास्त जाणवू शकते.
Winter Health Tips : कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकजण आपापल्या घरात थंडीपासून (Winter Health Tips) सुटका मिळविण्यासाठी अनेक उपाय करताना दिसतात. गरमागरम पदार्थांचे सेवन करणे, गरम पाण्याने आंघोळ करणे, तसेच उबदार कपडे घालणे असे अनेक प्रयत्न केले जातात. मात्र, काहींना हे सगळे प्रयत्न करूनदेखील थंडी जाणवते. तुमच्याबरोबरही असेच काहीसे होत असेल तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. थंडी (Winter Season) जास्त किंवा कमी लागण्याचा संबंध तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर तसेच लाईफस्टाईल आणि शरीराच्या अंतर्गत क्षमतेशी असतो. म्हणूनच या समस्येपासून वेळीच सुटका करणे आवश्यक आहे. या ठिकाणी आम्ही या संदर्भात काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुमची ही समस्या दूर होईल.
'Cold Intolerance' म्हणजे काय?
डॉक्टरांचा असा विश्वास आहे की, जर एखाद्या व्यक्तीला खूप थंडी जाणवत असेल किंवा एखादी व्यक्ती थंड तापमानासाठी खूप संवेदनशील असेल तर या स्थितीला 'Cold Intolerance' म्हणतात. केवळ हिवाळ्यातच नाही तर अशा लोकांना कूलर, एसी किंवा वाऱ्याजवळ बसल्यावरही थंडी जाणवते. कधी कधी ही थंडी न सहन होणारी असते.
'Cold Intolerance' ची समस्या कधी उद्भवते?
आपल्या शरीराचे तापमान वेगवेगळ्या यंत्रणांद्वारे नियंत्रित केले जाते, असं तज्ज्ञांचं मत आहे. मेंदूमध्ये उपस्थित हायपोथालेमस शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी थर्मोस्टॅटचे काम करते. हे मेंदूला संदेश पाठवते ज्याच्या मदतीने शरीरातील उष्णता किंवा थंड उत्पादन नियंत्रित केले जाते. तसेच, कधी तुमचा थायरॉईड बिघडला तर जास्त थंडी जाणवते. याशिवाय, कमी रक्ताभिसरणामुळे, शरीराच्या सर्व भागांमध्ये रक्त योग्य प्रमाणात पोहोचत नाही. अशा वेळी तुम्हाला थंडी जास्त जाणवू शकते. योग्य झोप न लागणे हे देखील जास्त थंडी लागण्यामागचं एक कारण असू शकतं. तसेच, तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होत असेल तरी सुद्धा तुम्हाला जास्त थंडी जाणवू शकते. त्याचप्रमाणे, तुमचे वजन तुमच्या उंचीच्या प्रमाणात कमी असले तरी तुम्हाला इतर लोकांपेक्षा जास्त थंडी जाणवू शकते.
आजपासून 'या' सवयी बदला
जर तुम्हाला थायरॉईड असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. रक्त पातळ झाल्यामुळे अनेक वेळा माणसाला जास्त थंडी जाणवते. यासाठी आपल्या आहारात आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे. हिरव्या भाज्या आणि प्रोटीनयुक्त पदार्थ खा. तज्ज्ञांच्या मते, तापमान खूप कमी झाल्यास शरीरातील अनेक अवयव काम करणे बंद करतात. थंडीत घरात राहण्याचा प्रयत्न करा आणि फक्त गरम प्रभाव असलेले पदार्थ खा. सध्या कडाक्याची थंडी आहे, अशा परिस्थितीत रात्रीच्या जेवणात विशेषतः अंडी खा. तसेच तुम्ही हलदीचे दूध आणि ड्रायफ्रूट्सचा देखील आहारात समावेश करू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :
Winter Health Tips : हिवाळ्यात व्यायाम करावासा वाटत नाही? मग घरच्या घरी 'हे' उपाय करा; फिट राहाल