Safety Pin : रोजच्या वापरात येणारा 'सेफ्टी पिन'चा शोध कोणी लावला? वाचा सेफ्टी पिनची रंजक कथा...
Safety Pin : जेव्हा सेफ्टी पिन पहिल्यांदा बनवली गेली तेव्हा त्याला 'ड्रेस पिन' असे म्हणायचे.
Safety Pin : खरंतर सेफ्टी पिन (Safety Pin) ही खूप छोटी गोष्ट आहे, पण ही छोटी गोष्ट तुमच्या कपड्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. विशेषत: महिलांसाठी सेफ्टी पिन खूप गरजेची आहे. स्त्रिया जेव्हा साडी नेसतात तेव्हा हमखासपणे सेफ्टी पिनचाच वापर केला जातो. तसेच, फार पूर्वीच्या काळात पुरुष देखील कॉलरसाठी सेफ्टी पिनचा वापर करायचे. पण, तुमच्या घरात रोज वापरात येणाऱ्या या वस्तूचा तुम्ही कधी विचार केला आहे का? सेफ्टी पिनचा शोध कोणी लावला? त्याचं नाव कसं पडलं? सेफ्टी पिनची मुळात गरज कोणी समजून घेतली? या ठिकाणी आम्ही तुम्हाला याच सेफ्टी पिनची रंजक कहाणी सागणार आहोत.
सेफ्टी पिनचा शोध कोणी लावला?
1849 मध्ये, एक अमेरिकन माणूस अनेक लोकांच्या कर्जात बुडाला होता. त्याची परतफेड करण्यासाठी तो दररोज नवीन शोध लावत असे. या अमेरिकन माणसाचे नाव होते 'वॉल्टर हंट' (Walter Hunt). वॉल्टर हंट यांनी 1849 मध्ये सेफ्टी पिनचा शोध लावला आणि नंतर त्याचे पुन्हा पेटंट घेतले. पेटंट केल्यानंतर, जेव्हा त्यांनी ते विकले तेव्हा त्यांना त्या बदल्यात $ 400 मिळाले.
सेफ्टी पिनचा शोध का लागला?
सेफ्टी पिनचा शोध का लागला या संबंधित अनेक प्रकारच्या कथा आहेत. मात्र, ज्यची सर्वाधिक चर्चा आहे ती वॉल्टर हंटच्या पत्नीशी संबंधित आहे. ती कथा म्हणजे, एके दिवशी हंटची पत्नी काही कामानिमित्त बाजारात जात होती आणि त्या दरम्यान तिच्या ड्रेसचे बटण तुटले. यानंतर वॉल्टर हंटला काही समजले नाही तेव्हा त्याने वायरच्या तुकड्यापासून पिनसारखी वस्तू बनवली आणि बटणाच्या जागी लावली. अशा प्रकारे वॉल्टर हंटच्या मनात पहिल्यांदा सेफ्टी पिनचा विचार आला.
सेफ्टी पिन हे नाव कसे पडले?
वॉल्टर हंटने याचा शोध लावला, तोपर्यंत लोक याला 'ड्रेस पिन' म्हणायचे. मात्र, सुरुवातीला सेफ्टी पिनचे स्वरूप आज दिसते तसे नव्हते, नंतर ते वॉल्टर हंटने अशा प्रकारे बनवले की ते लावताना हाताला दुखापत होणार नाही. तसेच, कपडे देखील चांगले सेट आणि सेफ राहतील. यावरून नंतर 'ड्रेस पिन' हे 'सेफ्टी पिन' म्हणून ओळखले जाऊ लागले.
महत्त्वाच्या बातम्या :