Weight Loss : पोटाची चरबी वाढलीये? भोपळ्याचा ज्यूस ठरतो फायदेशीर, असा करा झटपट तयार
तुम्ही भोपळ्याची (Pumpkin) भाजी किंवा भोपळ्याचा हलवा खाल्ला असेल. पण भोपळ्याचा ज्यूस देखील आहे शरीरासाठी फायदेशीर
Health Benefits Of Drinking Pumpkin Juice : तुम्ही भोपळ्याची (Pumpkin) भाजी किंवा भोपळ्याचा हलवा खाल्ला असेल. भोपळ्यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. भोपळ्याचा ज्यूस प्यायल्याने तुमचे वजन झटपट कमी होईल. तसेच तुमच्या पोटाची चरबी (Belly Fat) देखील या ज्यूसने कमी होते. जाणून घेऊयात भोपळ्याचं ज्यूस तयार करण्याची पद्धत आणि या ज्यूसचे फायदे...
ज्यूस तयार करण्याची पद्धत-
भोपळ्याचा ज्यूस तयार करण्यासाठी भोपळ्याला किसून घ्या. भोपळा किसल्यानंतर तो ज्यूस एका ग्लासमध्ये गाळून घ्या. दररोज सकाळी अनोशापोटी हा ज्यूस प्या.
फायदे-
व्हिटॅमिन डी, कॉपर, आयर्न आणि फास्फोरस असते जे शरीरासाठी अत्यंत महत्वाचे आहे. लिव्हर आणि किडनीसाठी देखील हा ज्यूस चांगला आहे. ज्यांना किडनीस्टोनचा त्रास आहे, त्यांनी भोपळ्याचा ज्यूस दिवसातून 3 वेळा प्यावा. भोपळ्यामध्ये कॅलरीज कमी असतात. तसेच फायबरचे प्रमाण देखील भोपळ्यामध्ये जास्त असते. भोपळ्याचा ज्यूस प्यायल्याने तुम्हाला बराच वेळ भूक लागणार नाही. त्यामुळे तुमचे वजन झटपट कमी होईल.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी शरीरात पाण्याचे प्रमाण वाढवा
पाणी जास्त पिल्याने भूक कमी लागते. ज्यामुळे वजन कमी होते. सकाळी उठल्यानंतर लगेच पाणी पिल्याने शरीरातील अॅसिडीटी कमी होते. तसेच सकाळी पाणी प्यायल्याने पचन क्रिया देखील सुधारते. जर तुम्ही डायटिंग करत असाल तर तुम्ही साकाळी रिकाम्या पोटी पाणी पिले पाहिजे. त्यामुळे तुमच्या शरीरातील मेटाबॉलिक रेट वाढेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
Weight Loss Juice Recipe : झटपट वजन कमी करायचंय? काकडी-कोथिंबीरीचा ज्यूस ठरतो फायदेशीर
Weight Loss Tips : वजन नियंत्रणात ठेवायचंय? मग, नाश्ता करताना 'ही' काळजी घ्या, फॅट टू फिट होण्यासाठी होईल मदत