Weight Loss : रोज सकाळी प्या Garlic Water; झटपट कमी होईल वजन
Weight Loss : लसूण टाकलेले पाणी (garlic water) दररोज सकाळी प्यायल्याने तुमचे वजन झटपट कमी होऊ शकते
Weight Loss Diet : फिट राहण्यासाठी लोक जिममध्ये जाऊन वर्कआऊट करतात. काही लोक वेगवगेळ्या प्रकारचे डाएट फॉलो करतात. हिवाळ्यात (Winter) अनेकांचे वजन वाढते. थंडीत जर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही लसूण टाकलेले पाणी दररोज सकाळी पिले पाहिजे. जाणून घ्या गार्लिक वॉटर (garlic water) तयार करण्याची सोपी पद्धत-
गार्लिक व्हॉटर तयार करण्याची पद्धत-
एक ग्लास गरम पाणी घ्या. त्यामध्ये लिंबाचा रस टाका. त्या पाण्यामध्ये बारीक कापलेला लसूण टाका. आता हे मिश्रण दररोज सकाळी नश्ता करण्याआधी प्या. या गालिक वॉटर मुळे तुमचे वजन कमी होईल. लसूण टाकलेल्या पाण्यामध्ये फायबर, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन सी आणि मँगनीज असते. तसेच गार्लिक वॉटरमुळे तुम्हाला भूक कमी लागेल आणि शरीरातील कॅलरीज बर्न होतात. तुमच्या शरीरातील चरबी देखील गार्लिक वॉटर प्यायल्याने कमी होईल. तसेच लसूण खाल्याने शरीरातील मेटॅबोलिज्मचे प्रमाण देखील वाढते तसेच गार्लिक वॉटर प्यायल्याने तुमची पचन क्रिया देखील सुधारेल.
गरम पाणी प्या- वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्यायल्याने तुमचे वजन कमी होईल. गरम पाणी प्यायल्याने पचन क्रिया चांगली होते. आयुर्वेदात असेही म्हटले आहे की सकाळी 2 कप कोमट पाणी प्यायल्याने शरीरात उर्जा निर्माण होते. कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिक्स करून प्यायल्याने बेली फॅट्स कमी होतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
इतर बातम्या :
Health Tips : शुद्ध तुपाचा आहारात समावेश केल्याने होतील 'हे' फायदे
belly fat : पोटाची चरबी कमी करायचीये? फॉलो करा या सोप्या टिप्स