Viral: दृष्ट काढणे योग्य की अयोग्य? भक्ताचा प्रश्न, प्रेमानंद महाराजांच्या उत्तराने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या, सोशल मीडियावर व्हायरल
Viral: प्रेमानंद महाराजांच्या सत्संगाच्या वेळी एका भक्ताने त्यांना वाईट नजरेशी संबंधित प्रश्न विचारला तेव्हा महाराजांनी असे काही उत्तर दिले, उपस्थितही आश्चर्यचकित झाले
Viral: आपल्या समाजात अशा काही परंपरा आहेत, ज्या अनेक वर्षांपासून चालत आल्या आहेत, ज्यांना काही लोक अंधश्रद्धा म्हणतात, परंतु काही लोकांना श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजत नाही, आणि अशांना सतत प्रश्न पडत असतात. अशा लोकांना नेहमी अशा संतांचा सहवास हवा असतो, जे त्यांचे प्रश्न लक्षपूर्वक ऐकून, प्रश्नांची अशी उत्तरे देतात की त्या व्यक्तीला समाधान मिळते. जेणेकरून ते आपल्या जीवनाच्या आणि भक्तीच्या मार्गावर पुढे जाऊ शकतात. अनेक भक्त प्रेमानंदजी महाराजांना भेटल्यानंतरही असे प्रश्न विचारतात, ज्यांचे उत्तर देणे प्रत्येकाला शक्य नसते. महाराजांच्या सत्संगाच्या वेळी एका भक्ताने त्यांना दृष्ट काढणे, तसेच वाईट नजरेसंबंधी प्रश्न विचारला असता महाराजांनी काय उत्तर दिले. जाणून घ्या
भक्ताकडून असा प्रश्न विचारण्यात आला
प्रेमानंद जी महाराजांना भेटण्याऱ्या भक्ताला त्याच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे असते. महाराजही भक्ताच्या मनातील कोंडी शांत करण्याचा प्रयत्न शांततेने आणि त्यांच्या आध्यात्मिक ज्ञानानुसार करतात. सत्संगाच्या वेळी, एका भक्ताने त्यांना असाच एक प्रश्न विचारला, ज्याचे उत्तर कदाचित प्रत्येकाला जाणून घ्यायला आवडेल. त्या व्यक्तीने महाराजांना विचारले की यशोदा मैया सुद्धा भगवान श्रीकृष्णाची दृष्ट काढत होती, त्यामुळे लहान मुलांना वाईट नजर का लागते? असा प्रश्न महाराजांना विचारला.
महाराजांनी हे उत्तर दिले
भक्ताचा प्रश्न ऐकून महाराजांनी सांगितले की, जी व्यक्ती आपल्याला खूप प्रिय आहे, त्याच्याबद्दल आपल्या मनात नेहमीच भीती असते की, त्या व्यक्तीबाबत काही वाईट घडू शकते आणि त्यामुळे लोक या भीतीपोटी आणि त्या व्यक्तीवरच्या प्रेमापोटी दृष्ट काढतात. आणि देवाकडे मागणं मागतात, हे असे केले जाते कारण देव सर्वांवर प्रेम करतो, पण काही लोक त्याची दृष्ट सुद्धा काढतात.
मनाचा भ्रम?
महाराजांनी त्या व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर देताना असेही सांगितले की हा सर्व मनाचा भ्रम आहे, जर आपण हा विचार आपल्या मनात ठेवला की त्या व्यक्तीची दृष्टी खूप वाईट आहे आणि त्याने आपल्याला पाहिले तर आपले वाईट होईल. . ही गोष्ट आपल्या मनात स्थिर होईल आणि आपल्याला काही झाले तर आपण असे समजू की ज्याची दृष्टी खराब आहे त्या व्यक्तीमुळे हे घडले आहे, परंतु महाराजांचा विश्वास आहे की कोणत्याही व्यक्तीच्या कोणत्याही व्यक्तीच्या वाईट नजरेत इतकी शक्ती नाही, की तो कोणाचे नुकसान करू शकतो.
हेही वाचा>>>
Viral: कर्मचाऱ्याचा झाला अपघात, बॉसने सोडली माणुसकी! 'असा' मेसेज पाठवला की भडकले नेटकरी, संभाषणाचा स्क्रीनशॉट व्हायरल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )