(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Viral : भारत फिरला पण ढसाढसा रडला! एक चूक अन् ब्रिटीश इन्फ्लुएंसर थेट पोहचला रुग्णालयात, नेमकं काय घडलं?
Viral : भारतात फिरायला आलेल्या एका ब्रिटीश इन्फ्लुएंसरसोबत असे काही घडले की, त्याला थेट रुग्णालयात दाखल करावे लागले.
Viral : भारत (India) हा विविधतेने समृद्ध असा देश आहे, हा देश प्रामुख्याने सांस्कृतिक वारसा, अध्यात्मिक अनुभव आणि विविध खाद्यपदार्थांसाठी ओळखला जातो. याचाच अनुभव घेण्यासाठी परदेशी नागरिक मोठ्या संख्येने येतात. पण, भारतात फिरायला आलेल्या एका ब्रिटीश इन्फ्लुएंसरसोबत (British Influencer) असे काही घडले की, त्याला थेट रुग्णालयात दाखल करावे लागले. सॅम पेपर नावाच्या या इन्फ्लुएंसरचे म्हणणे आहे की, त्याने भांगचे सेवन केले होते, त्यानंतर त्याची तब्येत बिघडली आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. सॅमने आता त्याचा भारताचा प्रवास थांबवला आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर ब्रिटीश इन्फ्लुएंसर सॅमच्या एका पोस्टमध्ये, तो एका दुकानात भांग पिण्याचा प्रयत्न करताना दिसतो. तो भांग कोणत्या ठिकाणी प्यायला त्याची माहिती समोर आलेली नाही. पण, व्हिडीओमध्ये एक वृद्ध भारतीय भांग तयार करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये सॅम पेपर देखील भांग पिताना खूप उत्साही दिसत आहे. पण, भांगचे सेवन केल्यावर त्याच्या सर्व उत्साहाचे दुःखात रूपांतर झाले. वेदना एवढ्या वाढल्या की, त्याला थेट दवाखान्यात न्यावे लागले.
This drink put Sam in hospital and the India tour is on hold for now, this is how it all unfolded 🇮🇳 pic.twitter.com/FK2TdbYcEZ
— Sam Pepper Clips (@SamPepperClips) September 22, 2024
हॉस्पिटलच्या बेडवर तो धाय मोकलून रडला..!
ऑनलाइन व्हायरल झालेल्या सॅमच्या एका व्हिडिओमध्ये तो हॉस्पिटलच्या बेडवर पडलेला दिसत आहे. तो रडत आहे आणि दावा करत आहे की परिचारिकांनी त्याचा IV ड्रिप व्हॉल्व्ह उघडा सोडला, ज्यामुळे त्याला त्रास झाला. तो परिचारिकांवर रडताना आणि रागवताना दिसतो आणि परिचारिका शांतपणे उभ्या राहून ऐकत आहेत.
Sam has a melt down and starts crying when the Indian nurses leave his drip valve undone pic.twitter.com/wNlaTbVlhJ
— Sam Pepper Clips (@SamPepperClips) September 22, 2024
सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया
सॅमने आणखी एक व्हिडीओ देखील पोस्ट केला ज्यामध्ये तो हॉस्पिटलच्या बेडवर पडलेला दिसतो. यामध्ये तो वाईट पद्धतीने ओरडताना दिसत आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. एका यूजरने लिहिले की, भारतात उपलब्ध असलेले खाद्यपदार्थ प्रत्येकासाठी बनवले जात नाहीत. दुसऱ्या यूजरने लिहिले की, ही भांग हृदयाच्या अशक्तपणासाठी नाही. त्याचवेळी एका यूजरने त्याला पुढच्या वेळी भारतात फक्त चहाच पित जा असा सल्ला दिला.
हेही वाचा>>>
Trending : अजबच..12 वर्षांपासून फक्त 30 मिनिटांचीच झोप! जपानी व्यावसायिकाच्या यशाचे रहस्य काय? लाईफस्टाईल चर्चेत
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )