Beauty Tips : सुंदर आणि चमकदार त्वचा हवीय? मग 'मिल्क आइस क्यूब' आहे रामबाण उपाय
Dark Skin Remedy : जर तुम्हांला सुंदर आणि डागरहित त्वचा हवी असेल, तर आज आम्ही तुम्हांला एक स्वस्त आणि सोपा उपाय सांगणार आहोत.
Milk Ice Cube Lighten Skin Tone : आपण सुंदर दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. नितळ, सुंदर आणि डागरहित त्वचा (Skin Care Tips) प्रत्येकाला हवी असते. तुम्हीही जर त्वचेच्या समम्यांपासून त्रस्त आहात, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. उन्हाळा संपून आता पावसाची चाहूल लागली आहे. जर उन्हामुळे तुमचीही त्वचा काळवंडली असेल, तर यावर एक सोपा आणि स्वस्त उपाय आहे. तुमच्या किचनमधील एक पदार्थ तुमची ही समस्या दूर करेल.
मिल्क आइस क्यूब वापरून पाहा
दूध आरोग्यासाठीतर खूप फायदेशीर आहेच, त्यासोबत हे त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळण्यासाठी उपयुक्त आहे. दुधाचे त्वचेसाठीही अनेक फायदे आहेत. दुधामध्ये असलेलं लॅक्टिक ॲसिड त्वचेला दुरुस्त करण्याचं काम करते आणि तुमच्या त्वचेवरील ग्लो परत मिळवण्यास फायदेशीर आहे. तुम्ही चेहऱ्यावर मिल्क आइस क्यूब (Milk Ice Cube) वापरून अनेक समस्यापासून सुटका मिळवू शकता. जाणून घ्या याचे फायदे
ग्लो
चेहऱ्यावर दूध लावल्याने त्वचा चमकदार होते. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. रक्ताभिसरणात सुधारणा होऊन त्वचेवर ग्लो येतो. बर्फामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड आणि प्रथिने त्वचेला तजेलदार बनवण्यास मदत करतात.
टॅनिंग
उन्हाळ्यात टॅनिंगची समस्या असली तरी कच्च्या दुधापासून बनवलेल्या आइस क्यूबने चेहऱ्याची मसाज करू शकता. दुधामध्ये प्रोटीन बी 12 आणि झिंक असते, ज्यामुळे त्वचा चमकदार बनते.
डार्क सर्कल
तुम्हाला डार्क सर्कलची समस्या असली तर तुम्ही मिल्क आइस क्यूब लावू शकता. यामुळे डार्क सर्कलची समस्या दूर होईल आणि त्वचा चमकदार होईल.
मुरुम
तुम्हाला जर पिंपल्स म्हणजे मुरुमांची समस्या आहे, तर हा एक उत्तम उपाय आहे. मिल्क आइस क्यूब चेहऱ्यालर लावल्याने मुरुमांची समस्याही सहज दूर होते. मिल्क आइस क्यूबमुळे सेबमचे उत्पादन कमी होते, त्यामुळे मुरुमांची समस्या दूर होते.
कोरडी त्वचा
तुमची त्वचा कोरडी झाली असली तरी तुम्ही मिल्क आइस क्यूबने फेशियल मसाज करू शकता. दुधात बायोटिनसह अनेक मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात. हे चेहऱ्यावर लावल्याने भेगा, कोरड्या, आणि निर्जीव झालेल्या त्वचेला पूर्ण पोषण मिळते.
एक्सफोलिएट
मिल्क आइस क्यूब लावल्याने त्वचा एक्सफोलिएट होण्यास मदत होते. कच्च्या दुधात बीटा हायड्रॉक्सी ऍसिड नावाचा एक्सफोलिएटिंग एजंट असतो. हे तुमची त्वचा एक्सफोलिएट करण्यात मदत करते आणि मृत पेशी तसेच ब्लॅकहेड्स काढून टाकते.
मिल्क आइस क्यूब तयार करण्याची पद्धत
एका भांड्यात दूध घ्या आणि त्यात एक चमचा मध घाला. 1 ते 2 मिनिटे नीट मिक्स केल्यानंतर, बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा आणि आता हा ट्रे 2 ते 3 तास फ्रीजमध्ये. तुमचा मिल्क आइस क्यूब तयार आहे. तुम्ही हे मिल्क मिल्क आइस क्यूब तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.