(Source: Poll of Polls)
Twice Born Baby: दोनवेळा जन्माला आलेलं जगातलं पहिलं बाळ! आईच्या गर्भातून काढून पुन्हा ठेवलं गर्भात, विज्ञानाच्या चमत्काराची जगभर चर्चा
सहाव्या महिन्यात जन्माला आलेल्या लिसाच्या गोंडस बाळानं काही काळानंतर नवव्या महिन्यात जन्म घेतला. या बाळाचं नाव लिसानं लुका असं ठेवलं आहे.
Twice Born Baby: कोणत्याही गर्भवती महिलेला तिचं बाळ सुरक्षित जन्माला यावं यापेक्षा कोणती मोठी इच्छा असेल? प्रसुतीच्या काळात झालेल्या गुंतागुंतीमुळं एकच बाळ दोनदा जन्माला आलं असं म्हटलं तर! इंग्लंडमध्ये एका प्रसुतीदरम्यान असाच प्रकार घडलाय, ज्याची चर्चा जगभरात होतेय. लिसा कॉफी या २३ वर्षीय महिलेनं तिच्या मातृत्वाचा विलक्षण अनुभव सांगितला आहे. याच लिसानं सहाव्या महिन्यात आणि नवव्या महिन्यात आई होण्याचा अनुभव घेतलाय. सहाव्या महिन्यात लिसाची प्रसुती झाली आणि बाळ गर्भाशयातून बाहेर यशस्वीरित्या काढण्यात आलं. पण लिसावर या बाळाचा जन्म होण्याआधी एक शस्त्रक्रीया झाली होती ज्यामुळं बाळाचा मणका आणि पाठीचा कणा गर्भात योग्यरित्या विकसित होत नव्हता. ज्यामुळं बाळाच्या अवयवांमध्ये दोष होता. मग डॉक्टरांनी बाळाला परत आईच्या गर्भात ३८ आठवड्यांसाठी ठेवले. आणि नवव्या महिन्यात पुन्हा एकदा या बाळाचा जन्म झाला.
विज्ञानाच्या ताकदीनं हे बाळ कोणत्याही गुंतागुंतीशिवाय जन्माला आलं. विशेष म्हणजे या बाळात आता कोणताही दोष नाही. जर तेंव्हाच बाळ जन्माला आलं असतं तर ते कधीच चालू शकले नसते. पण फिजिओथेरपी आणि जीवनरक्षक शस्त्रक्रीया केल्यानं त्याची गुंतागुंत दूर झाली. प्रसुतीनंतर लिसानं तिच्या प्रसुतीचा भावनिक प्रवास सांगितला. जगभरात या घटनेची चर्चा होत आहे.
लिसानं या बाळाचं नाव लुका असं ठेवलंय
सहाव्या महिन्यात जन्माला आलेल्या लिसाच्या गोंडस बाळानं काही काळानंतर नवव्या महिन्यात जन्म घेतला. या बाळाचं नाव लिसानं लुका असं ठेवलं आहे. लुका हे जगातलं एकमेव बाळ आहे जे दोनदा जन्माला आलंय. लुकाचा जन्म हा एक वैज्ञानिक चमत्कारच म्हणावा लागेल.
आईच्या गर्भातच लुकाला झाला दुर्मिळ आजार
आईच्या गर्भात असताना बाळाला जर आजार झाला तर अनेकवेळा बाळ दगावते किंवा कुठल्यातरी दोषानं जन्माला येते. लुकाला स्पिना बिफिडा नावाचा दुर्मिळ आजार आईच्या पोटात असतानाच झाला होता. या आजारामुळं लुकाच्या मणक्यात आणि पाठीच्या कण्यात अंतर पडले होते. अशा स्थितीतच जर गर्भ वाढला असता तर हे बाळ अपंग झालं असतं. हे होऊ नये म्हणून शस्त्रक्रीया करून भ्रूण पुन्हा लिसाच्या गर्भात टाकण्यात आले. यानंतर ३८ आठवडे या बाळाची पूर्ण वाढ झाल्यानंतर लिसाची पुन्हा प्रसुती करण्यात आली. बाळाच्या जन्मानंतरही लिसावर उपचार सुरु आहेत.