Travel : गर्दीपासून दूर.. शांततेचे क्षण अनुभवा! महाराष्ट्रातील 'या' हिल स्टेशन्सला एकदा भेट द्या, नैसर्गिक सौंदर्य, हिरवळ, आल्हाददायक वातावरण..
Travel : रोजच्या जीवनातून थोडा निवांत वेळ हवा असेल तर महाराष्ट्रातील ही हिल स्टेशन्स तुम्हाला गर्दीपासून दूर शांततेचे क्षण देतील, नक्कीच एकदा सहलीची योजना करा.
Travel : सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) कडक उन्हाळा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या विविध शहरात उष्णतेची लाट निर्माण झाल्याने नागरिक घामाघून झाले आहेत. ज्यांना कामानिमित्त बाहेर जावं लागत असेल त्यांचा नाईलाज आहे. पण याच धावपळीच्या जीवनातून थोडा वेळ का होईना तुम्हाला सुखद गारवा आणि शांततेचे क्षण अनुभवण्यासाठी महाराष्ट्रातील या ठिकाणांना भेट द्यायला हवी, जिथे जाताच तुमचा थकवा निघून जाईल, सोबत मूडही फ्रेश होईल..
महाराष्ट्रातील सुंदर हिल स्टेशन्स, कुटुंबासोबत अमूल्य वेळ घालवा..
महाराष्ट्रात मुंबई व्यतिरिक्त महाराष्ट्रात पाहण्यासारखी अनेक खास ठिकाणे आहेत. तुम्हीही तुमच्या कुटुंबासह, मित्रमैत्रिणींसोबत किंवा तुमच्या जोडप्यासोबत महाराष्ट्रात कुठेतरी फिरण्याचा विचार करत असाल, तर महाराष्ट्रातील सुंदर हिल स्टेशन्सच्या सहलीपेक्षा चांगला पर्याय दुसरा असू शकत नाही. महाराष्ट्रातील प्रमुख हिल स्टेशन्स ही महाराष्ट्रात भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. जिथे तुम्ही वर्षाच्या कोणत्याही वेळी येऊ शकता आणि नैसर्गिक सौंदर्य, हिरवळ आणि आल्हाददायक वातावरणात तुमच्या कुटुंबासोबत संस्मरणीय वेळ घालवू शकता.
चिखलदरा - कॉफी, सुंदर तलाव, नयनरम्य दृश्य
चिखलदरा हिल्स स्टेशन, महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशन्सपैकी एक, प्रत्येकाला स्वतःकडे आकर्षित करते. हे ठिकाण कॉफीच्या उत्पादनासाठी खूप प्रसिद्ध आहे. इथे कॉफीच्या मळ्यांसोबतच चिखलदऱ्याचे सुंदर तलाव आणि नयनरम्य दृश्य सर्वांना आवडते.
इगतपुरी - जुने किल्ले, धबधबे, उंच पर्वत, ट्रेकर्ससाठी एक आवडते ठिकाण
इगतपुरी हिल स्टेशन, मुंबईपासून सुमारे 130 किलोमीटर अंतरावर, इगतपुरी हे एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. येथील दृश्य इतर ठिकाणांपेक्षा पूर्णपणे वेगळे आणि मनमोहक आहे. जुने किल्ले, भव्य धबधबे आणि उंच पर्वतांव्यतिरिक्त, इगतपुरी हे रॉक क्लाइंबिंग आणि ट्रेकिंग ट्रेकर्ससाठी एक आवडते ठिकाण आहे.
माथेरान - प्रेक्षणीय परिसर आणि शांतता
माथेरान हे सह्याद्रीच्या रांगेत वसलेले एक छोटेसे हिल स्टेशन आहे. हे मुंबईपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर आहे. येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. हे हिल स्टेशन पर्यटकांसाठी खूप लोकप्रिय आहे. जे प्रेक्षणीय परिसर आणि शांतता तुम्हाला सुखद अनुभती देईल.
महाबळेश्वर - प्राचीन मंदिरं, हिरवीगार घनदाट जंगले, धबधबे
महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सुंदर हिल स्टेशनपैकी एक आहे. आजूबाजूच्या भागातील लोक वीकेंडलाही येथे भेट देतात. मनमोहक दृश्यांमुळे हे डोंगरी शहर नेहमीच पर्यटकांची पहिली पसंती असते. प्राचीन मंदिरं, हिरवीगार घनदाट जंगले, धबधबे, डोंगर आणि दऱ्या पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.
पाचगणी - सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक
सह्याद्री पर्वताच्या पाच टेकड्यांमुळे महाराष्ट्रातील या हिल स्टेशनला पाचगणी असे नाव पडले आहे. तुम्ही कधी महाराष्ट्रात गेलात तर इथे एकदा नक्की जा कारण पाचगणी हे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>
Travel : निळाशार समुद्र, आकर्षक दृश्य, निसर्गसौंदर्य..! महाराष्ट्रातील 'अशी' ठिकाणं, बघताच क्षणी प्रेमात पडाल, फोटोग्राफीची आवड होईल पूर्ण