(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Travel : आजकाल कपल्स मालदीवकडे का आकर्षित होतायत? काय आहे खास? 5 दिवसांच्या ट्रीप संबंधित सर्व माहिती जाणून घ्या
Travel : जर तुम्ही जोडप्यांना त्यांच्या हनीमून डेस्टीनेशन बद्दल विचारले तर, मालदीव नक्कीच त्यांच्या बकेट लिस्टमध्ये असेल. काय आहे कारण? जाणून घ्या...
Travel : लग्नानंतरचा पहिला हनिमून खूप खास असतो..हा आयुष्यातील असा एक क्षण आहे, जिथे जोडीदार आपला मौल्यवान वेळ एकमेकांच्या सानिध्यात घालवतात. आजकाल विविध ट्रॅव्हल कंपनी विविध दरात हनिमून पॅकेज देऊ लागले आहेत. ज्यामुळे कपल्सना वेगवेगळे पर्याय उपलब्ध होऊ लागले आहेत. हनिमूनला जाण्यासाठी भारताबाहेर तसेच भारतात अशी विविध ठिकाणं आहेत. जिथे तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात, सर्व सोयी-सुविधांसह आरामात हनिमून ट्रीप करू शकता, पण सध्या जर तुम्ही बऱ्याच जोडप्यांना त्यांच्या हनीमून डेस्टीनेशन बद्दल विचारले तर, मालदीव हे ठिकाण नक्कीच त्यांच्या बकेट लिस्टमध्ये असते. काय आहे यामागील कारण? जाणून घ्या...
जोडप्यांना मालदीवचे इतके आकर्षण का आहे?
हनिमून स्पॉट किंवा हनिमून डेस्टिनेशन म्हणून मालदीवची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अनेकांना वारंवार मालदीवला भेट द्यायची इच्छा असते. शेवटी, जोडप्यांना मालदीवचे इतके आकर्षण का आहे? याबद्दल आज आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत.
अप्रतिम रिसॉर्ट्स
मालदीव येथील अप्रतिम रिसॉर्ट्समुळे मालदीवमधील जोडपे सर्वाधिक आकर्षित होतात. एकांत आणि शांततेने परिपूर्ण रिसॉर्टमध्ये गेल्यानंतर तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराशिवाय तेथे कोणीही डिस्टर्ब करणारे नाही. रिसॉर्टमधील मोठा पूल सर्व प्रकारच्या सुविधा आणि लक्झरी जीवनशैलीची अनुभूती देतो. खरंच हे ठिकाण तुम्हाला स्वर्गासारखं वाटेल. त्यामुळे लोकांना येथे रोमँटिक ट्रीपसाठी यायला आवडते.
संस्कृती आणि परंपरा खास!
असे बरेच लोक आहेत, ज्यांना इतर देशांमध्ये प्रवास करायला आवडते, कारण त्यांना त्यांची संस्कृती जाणून घ्यायची असते. मालदीव हे रोमँटिक डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाते, इथे बघण्यासारखे आणि जाणून घेण्यासारखे बरेच काही आहे. यातील सर्वात खास म्हणजे मासेमारीचे गाव. येथे आल्यानंतर अनेकदा लोक या गावाला भेट देतात.
मालदीवचे समुद्र आणि वॉटर रिसॉर्ट
मालदीवचे सर्वात खास सौंदर्य म्हणजे येथील समुद्र. स्वच्छ निळे पाणी पाहून तुम्ही निळ्या आकाशात असल्याचा भास होतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला जास्त पर्यटक दिसणार नाहीत. त्यामुळे तुम्ही येथे आरामात तासन्तास घालवू शकता. त्यामुळे जोडपी या ठिकाणी जाण्यास प्राधान्य देत आहेत.
मालदीवच्या 5 दिवसांच्या ट्रीपची अंदाजे किंमत
मालदीवच्या हनिमून ट्रिपचा खर्च तुमच्या बजेटच्या बाहेर असू शकतो.
दिल्लीहून मालदीवचा विमानप्रवास महाग आहेत.
तुम्हाला एकेरी तिकिटासाठी 60,000 ते 70,000 रुपये मोजावे लागतील.
येत्या काही महिन्यांत अनेक तारखांना फ्लाइट देखील स्वस्त आहेत,
त्यामुळे तुमची तिकिटे बुक करताना हे लक्षात ठेवा.
एकट्या विमानाच्या तिकिटावर 2 जणांचा खर्च लाखाच्या जवळपास येत आहे.
तुम्ही रिसॉर्ट बुक केल्यास, तुम्हाला फक्त एका रात्रीसाठी 20,000 ते 50,000 रुपये द्यावे लागतील.
तसे, जर तुम्ही 5 दिवस राहण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला ते खूप महागात पडणार आहे.
अशा प्रकारे मालदीवमध्ये प्रेक्षणीय स्थळांचा काही खर्च 2 लोकांसाठी 5 ते 6 लाखांपर्यंत येऊ शकतो.
हेही वाचा>>>
Travel : 15 ऑगस्टच्या लाँग वीकेंडला फिरायचा केलाय प्लॅन? भारतीय रेल्वेकडून सुवर्णसंधी.. खाणं-राहणं सर्व सुविधा..सोबत नैनितालचं सौंदर्य अनुभवा
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )