Travel : सौंदर्याच्या बाबतीत US, UK पेक्षा कमी नाही 'हा' देश! तुमच्या बजेटमध्ये फिरा, सौंदर्य तुम्हाला वेड लावेल
Travel : असा एक देश.. जो सौंदर्याच्या बाबतीत यूएस आणि यूकेपेक्षा कमी नाही. जिथे तुम्ही तुमची ट्रीप बजेटमध्ये पूर्ण करू शकता. बर्फाळ पर्वतांनी वेढलेला असा स्वच्छ देश, ज्याचे सौंदर्य तुम्हाला वेड लावेल.
Travel : सामान्य माणसाची एक इच्छा असते, की जीवनात एकदातरी परदेशवारी करावी, पण कौटुंबिक जबाबदारी, कामाचा ताण आणि बजेटअभावी ही ट्रीप शक्यतो पूर्ण होत नाही, परदेशात प्रवासाचा विचार करताना खूप उत्साह येतो, पण फ्लाईट आणि हॉटेलचे पैसे बघून प्लॅन कधीच पुढे सरकत नाही. अशात जर आठवडाभराचा प्लान केला तर संपूर्ण बजेट बिघडते. पण तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगतो, असा एक देश आहे जिथे तुम्ही तुमची सहल बजेटमध्ये पूर्ण करू शकता. सौंदर्याच्या बाबतीत तो यूएस आणि यूकेपेक्षा कमी नाही, इथे येऊन तुम्ही चांगला वेळ घालवू शकता.
या देशात फिरण्यासाठी जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही.
आम्ही ज्या देशाबद्दल बोलत होतो, तो देश भूतान आहे. बर्फाळ पर्वतांनी वेढलेला असा स्वच्छ देश, ज्याचे सौंदर्य तुम्हाला वेड लावेल. या वर्षी परदेश सहलीची योजना आखत असाल, पण तुमचे बजेट थोडे कमी असेल तर निराश होऊ नका. असे अनेक देश आहेत जिथे तुम्हाला भेट देण्यासाठी जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. भूतान हा असाच एक देश आहे. जिथे अद्भुत निसर्गसौंदर्य वसलेले आहे. येथे भेट देण्यासाठी उन्हाळा हा उत्तम सीझन मानला जातो. जाणून घ्या येथे कोणती ठिकाणे पाहण्यासारखी आहेत?
View this post on Instagram
भूतान मध्ये भेट देण्याची ठिकाणे
भूतान हा फार मोठा देश नसला तरी येथे भेट देण्याच्या ठिकाणांची कमतरता नाही, अशी काही ठिकाणे आहेत ज्यांची भेट तुम्ही अजिबात चुकवू नये. त्यांच्याबद्दल जाणून घ्या.
पारो
हे शहर पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. भूतानची राजधानी थिम्पू येथून 50 किमीचा प्रवास करून तुम्ही येथे पोहोचू शकता. पारोमध्ये भेट देण्यासाठी अनेक धार्मिक स्थळे आणि ऐतिहासिक वास्तू आहेत. पारो शहर हे दऱ्या आणि भव्य बौद्ध वास्तुकलेचा संगम आहे. नैसर्गिक सौंदर्याव्यतिरिक्त पारो शहर हे जुना किल्ला पारो झोंगसाठी देखील प्रसिद्ध आहे. लाकूड आणि दगडांनी बनवलेल्या या किल्ल्यात तुम्हाला कुठेही खिळे दिसणार नाहीत. या किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी तिकीट काढावे लागते. या किल्ल्याची वास्तू पर्यटकांना आकर्षित करते. याशिवाय छूजोम हे काही काळ राहण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. जिथे दोन नद्या डोंगराच्या मध्ये एकत्र येतात आणि एक सुंदर दृश्य दिसते. पारोचे मुख्य आकर्षण म्हणजे भूतानची ओळख असलेले टायगर नेस्ट. हा मठ बौद्ध भिक्खूंचे निवासस्थान आहे. इथे पोहोचण्यासाठी ट्रेक करावा लागतो. शिखरावर गेल्यावर तुम्हाला भूतानचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळेल.
View this post on Instagram
पुनाखा
हे ठिकाण भूतानच्या राजधानीपासून सुमारे 70 किमी अंतरावर आहे. जिथे नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरण पर्यटकांना आकर्षित करते. पूर्वी भूतानची राजधानी पुनाखा होती. राजधानी थिम्पू ते पुनाखा या मार्गावर भूतानची सर्वात प्रसिद्ध खिंड आहे - 'डोचुला'. जिथे तुम्हाला एक-दोन नव्हे तर 108 स्तूप एकत्र दिसतील. हे ठिकाण त्याच्या सौंदर्यामुळे जगभर प्रसिद्ध आहे. सुमारे 10,000 फूट उंचीवर असल्याने येथे खूप थंडी असते आणि हिवाळ्यात परिस्थिती आणखी वाईट असते.
थिंफू
थिंफू ही भूतानची राजधानी आहे, त्यामुळे तुम्हाला येथे सर्व सुविधा मिळतील. लक्झरी हॉटेल्सपासून ते रेस्टॉरंट्स, क्लबपर्यंत, परदेशात प्रवास करताना लोकांना अपेक्षित असलेल्या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. याशिवाय येथील 170 फूट बुद्ध मूर्ती ही देशाची शान आहे. जे थिम्पूमध्ये जवळपास सर्वत्र दिसते. डोंगरावर असल्याने लोक येथे ट्रेकिंगने जातात. तुम्हाला जुन्या गोष्टी जाणून घेण्याची आवड असेल तर तुम्ही हेरिटेज म्युझियमला भेट देऊ शकता. जिथे प्राचीन शस्त्रास्त्रांपासून ते कृषी उपकरणे आणि स्वयंपाकघरातील भांडीपर्यंतच्या गोष्टी पाहता येतात.
भूतानला भेट देण्यासाठी सर्वोत्तम सीझन
भूतानला भेट देण्याचा सर्वोत्तम हंगाम म्हणजे मार्च ते मे. मात्र, जूनमध्येही येथील वातावरण आल्हाददायक असते. येथे सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत थंडी असते, अशा परिस्थितीत प्रवास करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. उन्हाळ्याच्या महिन्यात येथील सौंदर्य शिखरावर असते.
हेही वाचा>>>
Travel : मान्सून येतोय...त्याआधीच महाराष्ट्रातील 'ही' ठिकाणं जाणून घ्या, जी पावसाळ्यात आणखीनच सुंदर दिसतात!
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )